Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Shorts | Group B and...

MPSC Shorts | Group B and C | Geography | महाराष्ट्रातील लोकजीवन

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण महाराष्ट्रातील लोकजीवन बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय Geography (भूगोल)
टॉपिक महाराष्ट्रातील लोकजीवन

लोकजीवन म्हणजे काय?

लोकांचा आहार, पोशाख, घरे, राहणीमान, भाषा, सण, उत्सव इत्यादी घटकांवर तेथील भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होतो. त्यानुसार प्रदेशातील लोकांची वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती तयार होते. यालाच लोकजीवन म्हणतात. ग्रामीण व शहरी लोकजीवनांत बराच फरक आढळतो. शहरी भागात लोकवस्ती दाट असते. शहरात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

शहरातील लोकांचे राहण्याचे व कामाचे ठिकाण यांत अंतर असते. त्यामुळे वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक असते. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात पाणीपुरवठा, वाहतूक व इतर सार्वजनिक सुविधांवर ताण पडतो. ग्रामीण भागातील व्यवसाय निकटच्या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारलेले असतात. या भागातील लोकवस्त्या लहान असतात. यावरून शहरी व ग्रामीण भागांतील लोकजीवनात फरक असतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे. या लेखात महाराष्ट्रातील कोकण, पठारी प्रदेश, तसेच आदिवासी भागांमधील लोकजीवनाविषयी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील लोकजीवन: कोकण

कोकणातील लोकजीवन: कोकणात भरपूर पर्जन्य पडतो, म्हणून येथील घरे उतरत्या छपरांची व कौलारू असतात. काही ठिकाणी जांभा दगडांच्या भिंती असलेली घरे आढळतात. कोकणातील लोक प्रामुख्याने शेती करतात. समुद्रकिनाऱ्यालगत कोळी समाजाच्या अनेक वस्त्या आहेत. मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे.

येथील हवामान उष्ण व दमट असल्याने लोक सुती कपडे वापरतात. पुरुष शर्ट-पँट, पायजमा, बंडी इत्यादी पोशाख वापरतात, तर स्त्रिया ब्लाउज साडी वापरतात. समुद्रकिनाऱ्यालगतचे कोळी लोक बंडी, पैंट, रुमाल व विशिष्ट आकाराची टोपी वापरतात. येथे प्रामुख्याने मराठी व मालवणी या भाषा बोलल्या जातात. कोकणात होळी व गणेशोत्सव हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. कोकणातील अनेक लोक रोजगारासाठी मुंबईला स्थलांतरित होतात.

महाराष्ट्रातील लोकजीवन: पठारी प्रदेश

पठारी प्रदेशातील लोकजीवन: पठारी भागात पर्जन्यमान कमी असल्याने येथील घरे प्रामुख्याने सपाट छतांची असतात. ही छते धाब्याची, कौलांची किंवा पत्र्यांची असतात. घरे मातीची किंवा सिमेंटची असतात. शेती हा पठारी भागातील प्रमुख व्यवसाय आहे. त्याबरोबरच पशुपालन हा जोडव्यवसाय केला जातो. काही ठिकाणी कुटीरोद्योग केले जातात. शहरी भागात नोकरी, व्यवसाय, कारखानदारी केली जाते.

पठारी प्रदेशातील लोकांच्या आहारात मुख्यतः ज्वारी, बाजरीची भाकरी, तसेच विविध प्रकारच्या डाळी, पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश असतो, मात्र राज्याच्या पूर्व भागात लोकांच्या आहारात प्रामुख्याने भात असतो त्याबरोबरच पोळ्या विविध प्रकारच्या डाळी यांचादेखील समावेश असतो.

पठारी प्रदेशातील हवामान उष्ण, कोरडे व विषम असल्यामुळे येथील लोक सुती कपडे वापरतात. येथील पुरुष शर्ट-पँट वापरतात. स्त्रिया ब्लाउज साडी वापरतात. याशिवाय सदरा, पायजमा, धोतर, टोपी इत्यादींचाही वापर केला जातो.

महाराष्ट्रातील आदिवासी लोकजीवन

आदिवासी लोकजीवन: आदिवासी लोकजीवन फार पूर्वीपासून काही लोक दुर्गम भागात राहत आहेत. आदिवारी लोक ज्या भागात राहतात त्या भागातील उपलब्ध नैसर्गिक साधनांवर ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या परंपरागत बोली भाषा, पोशाख, चालीरीती आहेत. या लोकांना आदिवासी म्हणतात. राज्यातील विविध प्रदेशांत आढळणाऱ्या प्रमुख आदिवासींची माहिती खाली देण्यात आली आहे. साधारणपणे आदिवासींची घरे गवत, बांबू झाडांच्या फाट्या, पाने इत्यादींपासून बनवलेली असतात. त्यांच्या वस्त्यांना विविध भागांत वेगवेगळी नावे आहेत. उदाहरणार्थ, पाडा, पौड, टोला, झाप ई.

आदिवासी जमातीतील बरेच लोक प्रामुख्याने वनातील लाकूड, बांबू, तेंदूपत्ता, वनौषधी, डिंक, मध इत्यादी वनोत्पादन गोळा करतात. अलीकडे काही लोक शेती करू लागले आहेत. आदिवासींच्या आहारात परिसरातील उपलब्धतेनुसार भात, नाचणी, वरी, वाल, चवळी, हुलगे, बाजरी, उडीद, मूग, तूर ही धान्ये असतात. आदिवासींच्या पोशाखातही विविधता असते. पुरुष आखूड धोतर, बंडी, पागोटे, तर स्त्रिया साडी- चोळी व त्यांचा पारंपरिक पोशाख वापरतात.

महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती व त्यांचे वास्तव्य क्षेत्र
प्रमुख आदिवासी जमाती वास्तव्य असणारा प्रदेश
गोंड चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड
भिल्ल ‘धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वताचा प्रदेश, तसेच अहमदनगर, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील डोंगराळ भाग.
कोकणा नाशिक, धुळे जिल्ह्यांचा डोंगराळ भाग.
कोकरू अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेश
वारली ठाणे जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, मोखाडा, तलासरीचा जंगलपट्टीचा प्रदेश.
ठाकर, महादेव कोळी पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील डोंगराळ व पठारी प्रदेश
आंध परभणी, नांदेड, अकोला आणि यवतमाळ

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Mahapack
MPSC Mahapack

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती अधिवासी जमात राहते?

महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोलाम अधिवासी जमात राहते.

लोकजीवन म्हणजे काय?

लोकांचा आहार, पोशाख, घरे, राहणीमान, भाषा, सण, उत्सव इत्यादी घटकांवर तेथील भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होतो. त्यानुसार प्रदेशातील लोकांची वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती तयार होते. यालाच लोकजीवन म्हणतात.