Table of Contents
MPSC Shorts | Group B and C
MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण भारतातील महत्त्वाच्या बँक बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC गट ब आणि क परीक्षा |
विषय | Economy (अर्थशास्त्र) |
टॉपिक | भारतातील महत्त्वाच्या बँक |
भारतातील राष्ट्रीयीकृत बँक | 12 |
भारतातील महत्त्वाच्या बँक
1. State Bank of India (भारतीय स्टेट बँक)
स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत (Fortune Global 500 list) SBI 236 व्या क्रमांकावर आहे.
- स्थापना: 1955
- मुख्यालय: मुंबई
- टॅगलाइन: Pure Banking, Nothing Else
- चेअरमन: दिनेशकुमार खारा
2. Punjab National Bank (पंजाब नॅशनल बँक)
पंजाब नॅशनल बँक ही भारत सरकारच्या मालकीची बँकिंग आणि वित्तीय सेवा बँक आहे. पीएनबी बँक 18 लाख कोटी रुपयांसह भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे आणि देशभरातील शाखा नेटवर्कच्या बाबतीत दुसरी सर्वात मोठी बँक आहे.
- स्थापना: 1894
- मुख्यालय: नवी दिल्ली
- टॅगलाइन: The name you can Bank Upon
- MD आणि CEO: अतुल कुमार गोएल
3. Bank of Baroda (बँक ऑफ बडोदा)
बँक ऑफ बडोदा ही एक भारतीय बहुराष्ट्रीय बँक आहे. ही 1908 मध्ये स्थापन झालेली देशातील तिसरी-सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. बँक ऑफ बडोदाचे विजया बँक आणि देना बँकेत विलीनीकरण केले जाईल आणि रु.14.82 लाख कोटी.च्या एकत्रित व्यवसायासह देशातील तिसरी सर्वात मोठी बँक आहे.
- स्थापना: 1908
- मुख्यालय: वडोदरा
- टॅगलाइन: India’s International Bank
- MD आणि CEO: देबदत्त चंद
4. Canara Bank (कॅनरा बँक)
कॅनरा बँक ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात जुनी बँक आहे. बँकेची स्थापना 1906 मध्ये कॅनरा हिंदू परमनंट फंड या नावाने झाली होती परंतु नंतर 1910 मध्ये तिचे नाव बदलून कॅनरा बँक लिमिटेड असे करण्यात आले.
- स्थापना: 1906
- मुख्यालय: बंगळूरू
- टॅगलाइन: Together We Can
- MD आणि CEO: के सत्यनारायण राजू
5. Union Bank of India (युनियन बँक ऑफ इंडिया)
युनियन बँक ऑफ इंडिया बँकेत सरकारचे 90% भाग भांडवल आहे.
- स्थापना: 1919
- मुख्यालय: मुंबई
- टॅगलाइन: Good People to Bank With
- MD आणि CEO: ए. मनिमेखलाई
6. Bank of India (बँक ऑफ इंडिया)
बँक ऑफ इंडिया ही SWIFT (सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटर बँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन्स) चे संस्थापक सदस्य आणि भारतातील शीर्ष 5 बँकांपैकी एक आहे.
- स्थापना: 1906
- मुख्यालय: मुंबई
- टॅगलाइन: Relationship Beyond Banking
- MD आणि CEO: रजनीश कर्नाटक
7. Indian Bank (इंडियन बँक)
इंडियन बँकेच्या कोलंबो आणि सिंगापूर येथे परदेशात शाखा आहेत.
- स्थापना: 1907
- मुख्यालय: चेन्नई
- टॅगलाइन: Your Own Bank
- MD आणि CEO: शांती लाल जैन
8. Central Bank of India (सेंट्रल बँक ऑफ इंडिया)
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही 2009 मध्ये पुनर्भांडवलीकरण झालेल्या अठरा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक होती. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ची स्थापना 1911 मध्ये झाली.
- स्थापना: 1911
- मुख्यालय: मुंबई
- टॅगलाइन: Build a better life around us
- MD आणि CEO: मतम व्यंकट राव
9. Indian Overseas Bank (इंडियन ओव्हरसीज बँक)
इंडियन ओव्हरसीज बँकेच्या 6 विदेशी शाखा आणि एक प्रतिनिधी कार्यालय आहे. तीची स्थापना 1937 मध्ये झाली.
- स्थापना: 19137
- मुख्यालय: चेन्नई
- टॅगलाइन: Good People to Grow With
- MD आणि CEO: अजय कुमार श्रीवास्तव
10. UCO Bank (यूको बँक)
UCO बँक ही भारतातील प्रमुख सरकारी मालकीच्या व्यावसायिक बँकांपैकी एक आहे. तीची स्थापना 1943 मध्ये झाली. UCO बँकेने नुकतेच तिचे Whatsapp बँकिंग सुरू केले.
- स्थापना: 1934
- मुख्यालय: कलकत्ता
- टॅगलाइन: Honours Your Trust
- MD आणि CEO: श्री सोम शंकर प्रसाद
11. Bank of Maharashtra (बँक ऑफ महाराष्ट्र)
बँक ऑफ महाराष्ट्र ही सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँक आहे. भारत सरकारकडे या बँकेचे 87.74% शेअर्स आहेत. तीची स्थापना 1935 मध्ये झाली आहे.
- स्थापना: 1935
- मुख्यालय: पुणे
- टॅगलाइन: One Family One Bank
- MD आणि CEO: ए. एस. राजीव
12. Punjab & Sind Bank (पंजाब अँड सिंध बँक)
पंजाब अँड सिंध बँक भारतातील एक टेक्नो-सॅव्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणून उदयास येत आहे. त्याची स्थापना 1908 मध्ये झाली.
- स्थापना: 1908
- मुख्यालय: नवी दिल्ली
- टॅगलाइन: Where Service Is A Way Of Life
- MD आणि CEO: स्वरूप कुमार सहा
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप