Table of Contents
MPSC Shorts | Group B and C
MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण महाराष्ट्रातील महत्त्वाचे उठाव बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC गट ब आणि क परीक्षा |
विषय | Maharashtra History (महाराष्ट्राचा इतिहास) |
टॉपिक | महाराष्ट्रातील महत्त्वाचे उठाव |
महाराष्ट्रातील महत्त्वाचे उठाव
स्वातंत्र्यपूर्व काळात संपूर्ण महाराष्ट्रात ब्रिटीशांविरोधात अनेक उठाव झाले. या लेखात आपण ब्रिटीशांविरोधात झालेल्या काही महत्त्वाच्या उठावांची माहिती घेऊ.
रामोशी समाजाचा उठाव
- ब्रिटीश सरकारने रामोशी समाजाची वतने रद्द केली हे या उठावाचे मुख्य कारण होते.
- रामोशी बांधव ब्रिटीश सरकारच्या खजीन्यांवर व लष्करी छावण्यांवर दरोडे मारत असत.
- असाच एक दरोडा 1824 साली सन्तु नाईक यांच्या नेतृत्वाखाली उमाजी व अमृता नाईक या बंधूंनी भांबुर्डाच्या लष्करी खजिन्यावर घातला होता.
कोळी समाजाचा उठाव
- कोळीबांधव हे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे बंदोबस्त पाहत असत. रामोशी समाजाप्रमाणेच कोळी समाजाच्या जमिनी, नोकऱ्या आणि वतने इंग्रजांनी काढून घेतल्यामुळे कोळी समाजात इंग्रजांविरोधात असंतोष निर्माण झाला.
- त्यातूनच 1824, 1839 आणि 1844 साली कोळी बांधवांनी महाराष्ट्रात इंग्रजांविरोधात उठाव केले.
भिल्ल समाजाचा उठाव
- भिल्ल समाजाचा उठाव हा इंग्रजांच्या दडपशाही विरोधात होता.
- उत्तर महाराष्ट्र व खानदेशात त्यांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्या भागात हा उठाव अति तीव्र होता.
- त्यांच्या उठावाला काही प्रमाणात यश आले, कारण उठाव शमविण्यासाठी इंग्रजांनी त्यांना जमीन वाटप व सैन्यात भरती केले.
रंगो बापूजी गुप्ते यांचा उठाव
- सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगो बापूजीने अविरत प्रयत्न केले.
- त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा देण्याचे विचारात असतानाच महाराष्ट्रात 1857 च्या उठावाची सुरुवात झाली होती.
- त्यात युरोपियन अधिकाऱ्यांना ठार करायचे, सरकारी खजिने लुटायचे, कैदयांची सुटका करायची, त्यासाठी भोरपासून बेळगावपर्यंत हिंडून मांग, रामोशी, कोळी यांना एकत्र करून सैन्य उभारून उठाव केले.
कोल्हापूरमधील उठाव
- 1857 च्या उठावाचे पडसाद कोल्हापूरमध्ये उमटले. पहिला उठाव 31 जुलै 1857 च्या रात्री झाला.
- 27 व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांनी यामध्ये पुढाकार घेतला. त्यांनी रेजिमेंटची तिजोरी लुटली व युरोपियन अधिकाऱ्यांच्या घरावरही हल्ले केले.
- 6 डिसेंबर 1857 रोजी दुसरा उठाव घडून आला. कोल्हापूर, बेळगाव, धारवाड येथील हिंदी शिपायांनी बंडाची योजना आखली.
पेठ(नाशिक) मधील उठाव
- नाशिक जिल्ह्यातील पेठ येथे कोळ्यांनी उठाव केला होता. पेठचा राजा भगवंतराव निळकंठराव हा या उठावाच्या मागे होता.
- 6 डिसेंबर 1857 रोजी कोळ्यांनी हर्सूल च्या बाजारात लूटमार केली आणि खजिना लुटला. जंगलातील लपलेल्या बंडखोरांना पकडून ग्लासपुलने हद्दपार केले.
- अनेकांना शिक्षा केल्या. पेठच्या राजाला फाशी देण्यात आली.
जमखिंडी संस्थांनातील उठाव
- जमखिंडी संस्थान चे राजे आप्पासाहेब पटवर्धन होते. आप्पासाहेब इंग्रजांच्या मर्जीतील होते.
- 1857 च्या उठावाच्या वेळी काही गडबड झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी त्यांनी किल्ल्यात शस्त्रास्त्रे व दारूगोळा साठवला, किल्ल्याची दुरुस्ती केली तेथील रेसिडेंटला या हालचाली संशयास्पद वाटल्याचे इंग्रजांनी तेथील उठाय होण्यापूर्वीच बंदोबस्त केला.
नागपूरचा उठाव
- येथील बंडखोरांना लखनौ व कानपूरच्या बंडखोरांचे साहाय्य मिळाले. 13 जून 1857 हा दिवस उठावासाठी ठरवला.
- रात्री 12 वाजता आकाशात शोभेच्या दारूचे फुगे फोडले जाणार होते. तोच इशारा समजून बंडखोरांनी रेसिडन्सी सीताबर्डीचा किल्ला, कामठी इ. ठिकाणे ताब्यात घ्यायचे होते, पण इंग्रजांना कळताच त्यांनी बंडखोरांना पकडले.
- तिघांना फाशी दिली, अनेकांना जन्मपेठ दिली.
महाराष्ट्रातील उठावातील प्रमुख नेते
महाराष्ट्रातील उठाव ज्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली झाले त्यांची यादी खालील तक्त्यात दिली आहे.
उठाव | नेत्याचे नाव |
रामोशी समाजाचा उठाव | उमाजी नाईक व सहकारी |
कोळी समाजाचा उठाव | रामजी भांगडिया, रघु भांगडिया, बापू भांगडिया |
भिल्ल समाजाचा उठाव | चिलनाईक, शेख ढूल्ला, हिरा, सेवाराम घिसाडी |
पेठ(नाशिक) मधील उठाव | राजा भगवंतराव निळकंठराव |
तुम्हाला माहित आहे का?
- उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी 08 ऑगस्ट 1831 रोजी रु. 10,000 आणि 200 बिघा जमीन या बक्षिसाची घोषणा केली होती.
- कोळी समाजाच्या बंडाचे नेतृत्व करणारे रामजी भांगडिया हे आधी पोलीस दलात अधिकारी होते.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.