Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Shorts | Group B and...

MPSC Shorts | Group B and C | Maharashtra Geography | महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय Maharashtra Geography (महाराष्ट्राचा भूगोल)
टॉपिक महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग
महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय विभाग 06
प्रादेशिक विभागांची नावे
  • कोकण
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र / खानदेश
  • विदर्भ

प्रादेशिक विभाग म्हणजे काय

महाराष्ट्र हा भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागला आहे. या विभागांना प्रादेशिक विभाग असे म्हणतात. ते विभाग पुढीलप्रमाणे आहेत:

  1. कोकण
  2. पश्चिम महाराष्ट्र
  3. मराठवाडा
  4. उत्तर महाराष्ट्र / खानदेश
  5. विदर्भ

महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागानुसार जिल्हे

महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागानुसार जिल्हे खालीलप्रमाणे आहेत.

प्रादेशिक विभाग जिल्ह्याची संख्या जिल्हे
कोकण 7 मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पश्चिम महाराष्ट्र 7 पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर
मराठवाडा 8 औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर
उत्तर महाराष्ट्र / खानदेश 3 जळगाव, धुळे, नंदुरबार
विदर्भ 11 नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम

महाराष्ट्रातील नवीन जिल्हे व निर्मिती दिनांक

महाराष्ट्रातील नवीन जिल्हे व निर्मिती दिनांक खालीलप्रमाणे आहे.

मूळ जिल्हा नविन जिल्हा निर्मिती
रत्नागिरी सिंधूदुर्ग 1 मे 1981
औरंगाबाद जालना
उस्मनाबाद लातूर 15 ऑगस्ट 1982
चंद्रपूर गडचिरोली 26 ऑगस्ट 1982
बृहन्मुबई मुंबई उपनगर 4 ऑक्टोंबर 1990
अकोला वाशिम 1 जुलै 1998
धुळे नंदुरबार
भंडारा गोंदिया 1 मे 1999
हिंगोली परभणी
ठाणे पालघर 1 ऑगस्ट 2014

महाराष्ट्रातील सर्वाधिक तालूक्यांची संख्या असणारे जिल्हे: 

  • नांदेड व यवतमाळ: प्रत्येकी 16 तालुके
  • नाशिक, जळगाव, चंद्रपुर, रायगड: प्रत्येकी 15 तालुके
  • पुणे, अहमदनगर, नागपूर: प्रत्येकी 14 तालुके
  • कोल्हापूर व गडचिरोली: प्रत्येकी 12 तालुके

महाराष्ट्रातील समान नावाचे तालुके असणारे जिल्हे :-

  • नांदगाव:नाशिक-अमरावती
  • शिरूर: बीड-पुणे
  • आष्टी: बीड-वर्धा
  • खेड:  पुणे-रत्नागिरी
  • कळंब: यवतमाळ-उस्मानाबाद
  • मालेगाव: नाशिक-वाशिम
  • कारंजा: वाशिम-वर्धा
  • कर्जत: अहमदनगर-रायगड
  • सेलू: परभणी-वर्धा

तुम्हाला माहित आहे का?

  • महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्र 50,798 चौरस किमी आहे जे राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 16.51% आहे.
  • कोकणास ‘अपरांत’ या नावाने देखील ओळखले जाते.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Mahapack
MPSC Mahapack

 

Sharing is caring!

FAQs

सर्वाधिक जिल्हे असलेला प्रादेशिक विभाग कोणता आहे?

सर्वाधिक जिल्हे असलेला प्रादेशिक विभाग विदर्भ आहे.

महाराष्ट्रात किती प्रादेशिक विभाग आहेत?

महाराष्ट्रात 05 प्रादेशिक विभाग आहेत.