Table of Contents
MPSC Shorts | Group B and C
MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण भारतीय संविधानातील भाग 3 बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC गट ब आणि क परीक्षा |
विषय | Indian Constitution (भारतीय संविधान) |
टॉपिक | भारतीय संविधानातील भाग 3 |
भारतीय संविधानातील भाग 3 चे नाव | मुलभूत अधिकार |
मुलभूत हक्क म्हणजे काय?
मुलभूत हक्क हे भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेले मूलभूत मानवी हक्क आहेत जे सर्व नागरिकांना लागू केले आहेत. ते वंश, धर्म, लिंग इत्यादींच्या आधारावर भेदभाव न करता लागू केले जातात. महत्त्वाचे म्हणजे, मूलभूत अधिकार काही अटींच्या अधीन राहून न्यायालयांद्वारे लागू केले जातात.
भारतीय संविधानाच्या भाग 3 मधील कलमे
कलम | तरतूद |
12 | ‘राज्य’ (राज्यसंस्थेची) व्याख्या या कलमात दिलेली आहे. |
13 | या कलमात मुलभूत हक्कांशी विसंगत असणारे कायद्यांशी संबंधित तरतुदी आहेत. |
14 | कायद्यापुढे समानता |
15 | भेदभाव करण्यास मनाई |
16 | समानतेची संधी |
17 | अस्पृश्यता पाळण्यास बंदी |
18 | पदव्यांची समाप्ती (पदवी देण्यास मनाई) |
19 |
|
20 | गुन्ह्याबाद्ल दोषी ठरविण्यापासून संरक्षण |
21 | जीविताचे व व्यक्तीस्वातंत्र्याचे संरक्षण |
21 A | शिक्षणाचा हक्क |
22 | अटक व तुरुंगवासापासून संरक्षण |
23 | वेठबिगारी, गुलामगिरी यांपासून संरक्षण |
24 | 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना कारखाने, खाणी व तत्सम धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी |
25 | सदसदविवेकबुद्धीचे स्वातंत्र्य, धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार करण्याचा हक्क |
26 | धर्मविषयक व्यवहारांच्या व्यवस्थेचे स्वातंत्र्य |
27 | विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्याचे स्वातंत्र्य |
28 | विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य |
29 | अल्पसंख्यांक समूहांच्या हितसंबंधांचे संरक्षण |
30 | अल्पसंख्यांक समूहांचा शैक्षणिक संस्था स्थापन्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क |
32 | घटनात्मक उपाययोजनेचा हक्क |
33 | सशस्त्र सेनादलांना मुलभूत हक्क प्रदान करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार या कलमात येतो |
34 | देशाच्या एखाद्या भागात लष्करी कायदा अंमलात असताना मुलभूत हक्कांवर निर्बंध लादण्याचा संसदेचा अधिकार |
35 | काही विशिष्ट मुलभूत हक्कांच्या अंमलबजावणीकरिता कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेस असेल, राज्य विधीमंडळास नसेल. |
तुम्हाला माहित आहे का?
- मूलभूत अधिकारांमुळे भाग-3 हा भारताचा “मॅग्ना कार्टा” म्हणून ओळखला जातो. मॅग्ना कार्टा:- ब्रिटिश संविधानाच्या सारांशाला मॅग्ना कार्टा म्हणतात.
- 1948 मध्ये, यूएन जनरल असेंब्लीने मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा स्वीकारली, जी सर्व लोकांसाठी “मूलभूत आणि अपरिहार्य” अधिकार स्थापित करते.
- 2011 मध्ये, इंटरनेटवर प्रवेश हा मूलभूत मानवी हक्क म्हणून चर्चिला गेला.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.