Marathi govt jobs   »   Study Materials   »   Social Reformers of Maharashtra - Part...

MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक – भाग 2 | MPSC Social Reformers of Maharashtra – Part 2

MPSC Social Reformers of Maharashtra – Part 2 | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक – भाग 2 :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेची तारीख नुकतीच जाहीर केली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी एव्हाना मुख्य परीक्षेच्या तयारीला लागलेच असतील. तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब पूर्व व मुख्य परीक्षेत अभ्यासक्रमातील बरेच घटक समान आहेत. अशा घटकांचा अभ्यास करणे विद्यार्थ्यांना सोयीचे जावे यासाठी आपण रोज अभ्यासक्रमातील काही घटकांचा अभ्यास करणार आहोत.  MPSC Social Reformers of Maharashtra – Part 2 | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक – भाग 2

MPSC Social Reformers of Maharashtra – Part 2 | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक – भाग 2 : 

MPSC साठी इतिहासाच्या अभ्यास करताना समाज सुधारकांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. समाज सुधारकांचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरतो. त्यामुळेच राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सुधारक आपण क्रमश: पद्धतीने बघणार आहोत. याआधीच्या लेखात आपण भाऊ दाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर आणि सार्वजनिक काका यांचा अभ्यास केलेलाच आहे. आता आपण जगन्नाथ शंकरशेट, गोपाळ हरी देशमुख, आणि न्या. महादेव गोविंद रानडे यांचा अभ्यास करणार आहोत.

Social Reformers of Maharashtra for MPSC- Part 1

MPSC Social Reformers of Maharashtra- जगन्नाथ शंकरशेट | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक –Jagannath Shankarsheth :

MPSC Social Reformers of Maharashtra- जगन्नाथ शंकरशेट | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक - Jagannath Shankarsheth
जगन्नाथ शंकरशेट

MPSC Social Reformers of Maharashtra- जगन्नाथ शंकरशेट (१० फेब्रुवारी १८०३–३१ जुलै १८६५) : जगन्नाथ शंकरशेट हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक होते. त्यांचे पूर्ण नाव जगन्नाथ शंकरशेट मुर्कुटे. तथापि ते नाना शंकरशेट या नावानेच अधिक परिचित आहेत. त्यांचा जन्म एका दैवज्ञ ब्राह्मण व्यापारी कुटुंबात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड गावी झाला. त्यांचे वडील व्यापारासाठी मुंबईस आले. म्हैसूरच्या १७९९ च्या टिपू-इंग्रज युद्धात वडिलांना अमाप पैसा मिळाला. आई भवानीबाई नानांच्या लहानपणीच वारली. नानांनी तिच्या स्मरणार्थ पुढे भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली. नानांचे वडील १८२२ मध्ये वारले व तरुणपणीच त्यांच्यावर प्रपंचाची व व्यापाराची सर्व जबाबदारी पडली.

नाना शंकरशेट यांनी जवळजवळ अर्धशतकाच्या कालावधीत मुंबईच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळीचा आणि अनेकविध अशा लोककल्याणकारी सुधारणांचा पाया घातला. त्यांच्यावर सर जमशेटजी जिजिभाईंची छाप पडली होती. हिंदवासियांत शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, यासाठी एल्‌फिन्स्टनने १८२२ मध्ये हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापिली. पुढे हिचे १८२४ मध्ये बाँम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले. एल्‌फिन्स्टननंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी ४,४३,९०१ रुपयांचा एल्‌फिन्स्टन फंड जमविण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त राहिले. या संस्थेचे एल्‌फिन्स्टन कॉलेज झाल्यावर (१८३७) तिला एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणण्यात येऊ लागले. १८५६ मध्ये महाविद्यालय व विद्यालय पृथक झाले.बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना १८४१ मध्ये झाली. बोर्डातील तीन एतद्देशीय सभासदांत सतत सोळा वर्षे नाना निवडून आले. स्टुडंट्‍स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी (१८४८) आणि जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा (१८४९) स्वतःच्या वाड्यात त्यांनी चालू केली तसेच द जगन्नाथ शंकरशेट फर्स्ट ग्रेड अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल १८५७ मध्ये सुरू केले. १८५५ मध्ये त्यांनी विधी महाविद्यालयाचा पाया घातला. सर ग्रँटच्या मृत्यूनंतर ग्रँट मेडिकल कॉलेजची १८४५ मध्ये स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षणाची सोय त्यांनी केली व तेही पुढे मराठीतून देण्याची व्यवस्था केली. ॲग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिऑग्रॅफिकल सोसायटी या संस्थांचे प्रमुख व अध्यक्ष नाना शंकरशेट होते. या शैक्षणिक कामाशिवाय त्यांनी द बाँबे असोसिएशन स्थापण्यात १८५२ मध्ये पुढाकार घेतला. मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या सभासदांत ते प्रमुख होते.

नानांचे सामाजिक कार्यही मोठे आहे. त्यांनी सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास पाठिंबा दिला. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, या तत्त्वावर स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला. याशिवाय ग्रँड ज्यूरीत भारतीयांचा समावेश व्हावा, तसेच जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांस मिळावा, यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले. महानगरपालिकेत आयुक्त असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गँस कंपनी सुरू केली धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे जे. जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली.

बाँबे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीची स्थापना, मुंबई-ठाणे रेल्वेचा प्रारंभ, नाटकांचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण याही गोष्टींचे श्रेय नानांनाच द्यावे लागेल.

नानांनी अनेक मान्यवर संस्थांना देणग्या दिल्या : रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेला रु. ५,००० व्हिक्टोरिया अंड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाला रु. ५,००० जगन्नाथ शंकरशेट स्कूलला रु. ३०,००० एल्‌फिन्स्टन शिक्षण निधीस रु. २५,००० आणि जिजामाता (राणीच्या) बागेसाठी रु. २५,०००.

देशाच्या सर्वांगीण सुधारणेच्या साऱ्या चळवळींत पुढाकार घेणाऱ्या या थोर पुरुषाचा पुतळा जिजामाता बागेत उभारण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने २५,००० रु जमविले होते. १८५७ मध्ये आलेले किटाळ पूर्णतः दूर होऊन त्यांचे कार्य अधिकच चमकले. नानांचे वयाच्या बासष्टाव्या वर्षी मुंबईत देहावसान झाले. नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिला येणाऱ्या विद्यार्थास शंकरशेट शिष्यवृती देण्यात येऊ लागली.

मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases

MPSC Social Reformers of Maharashtra- गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक –Gopal Hari Deshmukh – Lokahitavadi :

MPSC Social Reformers of Maharashtra- गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक -Gopal Hari Deshmukh - Lokahitavadi :
लोकहितवादी
MPSC Social Reformers of Maharashtra- गोपाळ हरी देशमुख (१८ फेब्रुवारी १८२३-९ ऑक्टोबर १८९२) : अव्वल इंग्रजीतील थोर समाजचिंतक म्हणजे गोपाळ हरी देशमुख. त्यांचे जुने आडनाव सिद्धये. यांचे घराणे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचे. गोविंदरावांचे पुत्र आणि गोपाळरावांचे वडिल हरिपंत हे पेशव्यांचे सेनापती बापू गोखले ह्यांच्याकडे फडणीस होते. वयाच्या सातव्या वर्षी गोपाळरावांचे लग्न झाले. त्यांच्या पत्नीचे नाव गोपिकाबाई. गोपाळराव तेरा वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले.  

त्या काळी पुण्यातील बुधवारच्या वाड्यात भरणाऱ्या सरकारी मराठी शाळेत गोपाळरावांचे शिक्षण झाले असावे. इंग्रजी भाषेचा अभ्यास त्यांनी खाजगी रीत्या सुरु केला होता. कोर्टात काही दिवस उमेदवारीही केली. पुढे, वयाच्या अठराव्या वर्षी, ते पुण्यातील सरकारी इंग्रजी शाळेत जाऊ लागले. १८४४ साली त्यांनी ही शाळा सोडली. त्याच वर्षी दक्षिणेकडील सरदारांच्या एजंटच्या कार्यालयात त्यांना अनुवादकाची नोकरी मिळाली. १८४६ साली ते मुन्सफीची परीक्षा उत्तीर्ण झाले. १८५२ मध्ये वाई (जि. सातारा) येथे फर्स्ट क्लास मुन्सफ म्हणून त्यांची नेमणूक झआली. १८५३ मध्ये ‘ॲक्टिंग प्रिन्सिपल सदर अमीन’ आणि सातारा येथील अदालतीचे प्रमुख म्हणून काही महिने त्यांनी काम पाहिले. १८५५ मध्ये पुणे येथे उत्तर विभागाचे ‘सब-असिस्टंट इनाम कमिशनर’ म्हणून ते नेमले गेले. पुढे १८६१ साली हिंदू व इस्लामी कायद्यांचा गोषवारा तयार करण्याचे काम त्यांच्यावर सोपविले गेले. त्यानंतर सातारा, अहमदाबाद, सुरत, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक अशी विविध ठिकाणी न्यायखात्यात मोलाची सेवा बजावून १८७९ साली ते सेवानिवृत्त झाले. १८८४ मध्ये रतलाम संस्थानचे दिवाणपद त्यांनी स्वीकारले. तेथे ते वर्षभर होते. 

‘लोकहितवादी’ हे टोपण नाव घेऊन त्यांनी ही ‘शतपत्रे’ लिहिली. भाऊ महाजन ह्यांच्या प्रभाकर नामक पत्रातून ती १८४८ ते १८५० ह्या काळात प्रसिद्ध झाली. ही ‘शतपत्रे’ वस्तुतः १०८ आहेत. त्या निबंधांतून लोकहितवादींनी आपली राजकीय मते, तसेच विद्याप्रसार, आचारधर्म, परमार्थ, अनिष्ट चाली, समाजसुधारणा इ. विषयांवरील विचार स्पष्ट केले आहेत. ह्या विचारांनी एकोणिसाव्या शतकातील वैचारिक प्रबोधनाचा पाया घातला, असे यथार्थपणे म्हटले जाते.

इंग्रजी राज्य ह्या देशावर आले, ते ईश्वरी योजनेचा एक भाग म्हणून असे आपल्या ‘शतपत्रां’ तून अनेकदा स्पष्टपणे लिहिणाऱ्या लोकहितवादींना असा विश्वास वाटत होता, की इंग्रजांच्या सहवासामुळे आपला समाज विविधविद्यासंपन्न होऊन त्याचे आधुनिकीकरण होईल. तथापि इंग्रजांची सत्ता ह्या देशावर कायम राहावी, असे मात्र त्यांना वाटत नव्हते. येथील सर्व गरीब-श्रीमंतांनी एकत्र होऊन विलायतेतील राणीसाहेबांस अर्ज करावा आणि ह्या देशांसाठी ‘पार्लमेंट’ मागून घ्यावे, असेही त्यांनी त्यांच्या एका पत्रात म्हटले आहे. नुसत्या नोकऱ्यांच्याच मागे न लागता, आपल्या लोकांनी व्यापार-उद्योगातही मनःपूर्वक लक्ष घातले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. आळशीपणामुळे देश भिकारी झाला, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. स्वदेशीचा विचार लोकहितवादींनी त्यांच्या ‘शतपत्रां’त कितीतरी आधी मांडून ठेवलेला आढळतो. एक जित, पराभूत समाजाच्या दारूण पराजयाची अत्यंत कठोर, चिकित्सक समीक्षा करण्यासाठी लोकहितवादी उभे ठाकले होते.त्यामुळेच ह्या पराभवाचा विचार केवळ राजकीय अंगाने न करता विद्या, धर्म, समाजकारण, अर्थकारण अशा विविध अंगांनी त्यांनी तो केला.

विद्या हा समाजपरिवर्तनाचा मूलाधार आहे, अशी लोकहितवादींची धारणा होती. तथापि येथे विद्येचे क्षेत्र मर्यादित ठेवले गेल्यामुळे विद्याप्रसार होऊ शकला नाही. विद्या वाढविलीही गेली नाही. परदेशगमन निषिद्ध मानल्यामुळे भूगोलाबद्दल व जगातील विविध स्थळांबद्दल अज्ञान निर्माण झाले. विद्यावृद्धी आणि ग्रंथनिर्मिती ह्यांच्यातील नाते अतूट आहे. म्हणूनच उत्तम शिक्षक आणि दर्जेदार ग्रंथ निर्माण व्हायला पाहिजेत, हे सांगून भारतासारख्या बहुभाषी देशात सर्वत्र विद्याप्रसार व्हावयाचा असेल, तर विविध प्रादेशिक भाषांतून ग्रंथनिर्मिती होणे आवश्यक आहे असे त्यांनी सुचवले.

आपल्या देशाच्या आर्थिक प्रश्नांचाही लोकहितवादी खोलवर जाऊन विचार करीत होते. १८४९ साली प्रसिद्ध झालेला त्यांचा लक्ष्मीज्ञान हा ग्रंथ मराठीतील अगदी आरंभीच्या अर्थशास्त्रीय ग्रंथांपैकी एक आहे (हा ग्रंथ त्यांनी लिहिला, तेव्हा ‘अर्थशास्त्र’ हा शब्द रुढ झालेला नव्हता). ‘क्लिफ्टसाहेबाच्या इंग्रजी ग्रंथाचे आधाराने’ हा ग्रंथ केल्याचे लोकहितवादींनी म्हटले आहे. इंदुप्रकाशात लिहिलेले (१८७६) आठ लेखही महत्त्वाचे आहेत. भारताच्या दारिद्र्याची चिकित्सा लोकहितवादींनी त्यांच्या अन्य लेखनातूनही केली आहे.

त्यांचे अन्य काही ग्रंथ :

  • महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण (१८४९)
  • यंत्रज्ञान (१८५०)
  • खोटी शपथ वाहू नये आणि खोटी साक्ष देऊ नये याविषयी लोकांशी संभाषण (१८५१)
  • निगमप्रकाश (गुजराती, १८७४)
  • जातिभेद (१८७७)
  • गीतातत्त्व (१८७८)
  • सार्थ आश्वलायन गृह्यसूत्र (१८८०)
  • ग्रामरचना, त्यांतील व्यवस्था आणि त्यांची हल्लींची स्थिती (१८८३)
  • स्थानिक स्वराज्य संस्था (१८८३)
  • पंडितस्वामी श्रीमद्‌द्‌‌‌‌‌यानंद सरस्वती (१८८३)
  • ऐतिहासिक गोष्टी (२ भाग, १८८४, १८८५)
  • गुजराथचा इतिहास (१८८५)

वाई येथे फर्स्ट क्लास मुन्सफ म्हणून काम करीत असताना त्यांनी एक वाचनालय स्थापन केले होते. पुण्याच्या ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ च्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. पुण्यात तेलुगू वाचकांसाठीही त्यांनी एक ग्रंथालय सुरू केले होते. ज्ञानप्रकाश ह्या महत्त्वाच्या वृत्तपत्राच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. मुंबईहून निघणाऱ्या इंदुप्रकाश ह्या पत्राच्या स्थापनेतही ते होतेच. लोकहितवादी ह्या नावाचे एक नियतकालिक ते स्वतःही काळ चालवीत होते. अहमदाबाद येथे असताना गुजराती प्रार्थना समाज, गुजराती पुनर्विवाहमंडळ इत्यादींची उभारणी करण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. हितेच्छू हे इंग्रजी पत्र काढण्यामागेही त्यांची प्रेरणा होती, असे म्हणतात. 

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या)

MPSC Social Reformers of Maharashtra- न्या. महादेव गोविंद रानडे | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक- Justice Mahadev Govind Ranade :

MPSC Social Reformers of Maharashtra- न्या. महादेव गोविंद रानडे (१८ जानेवारी १८४२ – १६ जानेवारी १९०१) : भारतातील उदारमतवादी, समाजसुधारक, धर्मसुधारक, राजनीतिज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि द्रष्टे पुरूष. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नासिक जिल्ह्यातील निफाड गावी झाला. मराठी आणि प्राथमिक इंग्रजी शिक्षण कोल्हापूरला झाले. माध्यमिक आणि उच्च शिक्षण मुंबईस झाले.

MPSC Social Reformers of Maharashtra- न्यायमूर्ती रानडे | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक - Justice Ranade
न्यायमूर्ती रानडे

इ. स. १८६२ मध्ये बी. ए. च्या परीक्षेत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. इतिहास आणि अर्थशास्त्र विषय घेऊन पुन्हा बी. ए. (ऑ.) परीक्षा दिली. इतिहास, भूगोल, गणित, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, इंग्लिश, निबंधलेखन इ. विषयांचे ते एल्फिन्स्टनमध्ये अध्यापन करू लागले. १८६४ साली एम्. ए. ची परीक्षा दिली व १८६५ साली कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाच्या फेलोंमध्ये या तरुण पदवीधराचा समावेश झाला.

इ. स. १८६६ च्या जूनमध्ये त्यांची ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या जागी सरकारने नेमणूक केली. १८६८ मध्ये मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून त्यांची कायम नेमणूक झाली. पुण्यास न्यायखात्यात १८७१ पासून न्यायाधीश किंवा दंडाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यावेळी त्यांनी ॲडव्होकेटची परीक्षा दिली. न्यायखात्यात काही काळ काम केल्यावर १८९३ साली रानड्यांना मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची जागा मिळाली. त्या काळात भारतीयाला उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे पद दुर्लभ होते.उच्च न्यायासनावर ते विराजमान झाल्याने न्यायासनाचाच बहुमान झाला, असे सरन्यायाधीश सर मायकेल वेस्ट्राप यांनी उद्‌गार काढले.

प्रथम पत्नी वारल्यावर वयाच्या एकतिसाव्या वर्षी त्यांचा रमाबाईंबरोबर दुसरा विवाह  झाला. वृद्ध वडिलांच्या अत्याग्रहामुळे अकरा वर्षांच्या कुमारिकेबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. त्यामुळे त्यांच्या समाजसुधारक म्हणून प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेला धक्का बसला. रमाबाईंसमवेत त्यांचा प्रपंच सुखासमाधानाचा झाला. रमाबाईंनी त्यांच्या उदात्त जीवनाशी समरसता प्राप्त करून घेतली.

महादेवराव यांच्या काळात ‘लोकहितवादी’ देशमुख, विष्णुशास्त्री पंडित, जोतीराव फुले इ. समाजसुधारकांनी सुधारणेचे आंदोलन सुरू केले होते. त्यात रानडे सहभागी झाले. १८६२ मध्ये त्यांनी इंदुप्रकाश या वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागात समाजसुधारणेची मीमांसा अनेक लेख लिहून केली. १८६५ साली विधवाविवाहोत्तेजक मंडळाची स्थापना झाली. या मंडळाने एक विधवाविवाह घडवून आणला. परंपरानिष्ठ सनातन धर्मीयांनी शंकराचार्यांच्या अनुमतीने विधवा-विवाहाच्या पुरस्कर्त्यावर बहिष्कार टाकला. त्यामुळे पुष्कळ त्रास सहन करावा लागला. राजा राममोहन रॉय यांनी हिंदु धर्मामध्ये मौलिक, तात्त्विक परिवर्तनास प्रारंभ केला. या मौलिक हिंदू धर्मसुधारणेच्या आंदोलनात न्यायमूर्ती रानडे यांनी स्वतःच्या धर्मचिंतनाची भर घातली.

समाजकारणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेससामाजिक परिषद या दोन संस्था निर्मिल्या. समाजसुधारणेच्या विचारांचा आधार म्हणून निश्चित असे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. राजकीय सुधारणा, आर्थिक सुधारणा, धर्मसुधारणा व समाजसुधारणा ही भिन्नभिन्न अंगे परस्परांशी अगदी संबद्ध आहेत,

मूर्तिपूजा आणि कर्मकांड यांतून मुक्त होऊन उच्च धर्माकडे मनुष्याच्या विवेकबुद्धीचे आकर्षण वाढले पाहिजे म्हणून राजा राममोहन रॉय यांनी बंगालमध्ये स्थापलेल्या ब्राह्मो समाजाच्या धर्तीवर मुंबईत  स्थापना त्यांनी व त्यांच्या अनेक मित्रांनी केली. त्या पंथाची तत्त्वे, उपासनापद्धती आणि विधी यांचे समर्थन करण्यासाठी त्यांनी इंग्लिशमध्ये ‘एकेश्वरनिष्ठाची कैफियत’ अशा अर्थाच्या शीर्षकाखाली एक निबंध लिहिला. एकनाथांच्या भागवतधर्माचाम्हणजे वारकरी संप्रदायाचा महादेवरावांच्या मनावर प्रभाव खोल उमटला होता.

न्या. रानडे १८७१ मध्ये पुण्याला बदलून आले आणि पुण्यातील सार्वजनिक सभेची सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. सार्वजनिक सभेच्या कार्याला राजकीय चळवळीचे स्वरूप दिले. भारतातील प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया प्रथम त्यांनी घातला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक सभेचे चिटणीस गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका यांनी मोठी कामगिरी केली.

इ. स. १८९० मध्ये सामाजिक सुधारणेच्या वादाला प्रक्षोभक स्वरूप प्राप्त झाले. रानडे यांनी १८७० मध्ये स्थापलेल्या पुण्यातील ‘सार्वजनिक सभा’ या संस्थेमध्ये फाटाफूट झाली, दोन तट पडले. लो. बाळ गंगाधर टिळक व त्यांचे सहकारी यांनी आपले बहुमत स्थापित करून न्यायमूर्ती रानड्यांच्या अनुयायांना दूर सारले. तेव्हा रानड्यांनी १८९३ साली पुण्यात ‘डेक्कन सभा’ ही नवी संस्था काढली.

स्वदेशीचा प्रचार व संघटनेचे कार्य रानडे व जोशी यांनी सुरू केले. रानडे यांनी भारताच्या आर्थिक ऱ्हासाची आणि विकासाची शास्त्रशुद्ध मीमांसा दोन व्याख्याने देऊन केली. रानड्यांनी आपल्या देशात औद्योगिक क्रांती व्हावी म्हणून संरक्षक जकातीचे तत्त्व पुरस्कारिले. इंग्रज सरकार भारताच्या आर्थिक विकासाच्या विरूद्ध कसे आहे, ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केली आणि हिंदी अर्थशास्त्राचा पाया घातला.

रानड्यांच्या या राजकारणाच्या पाठीमागे अखेर बंड उठविण्याचाही उद्देश असावा, अशी त्यावेळी ब्रिटिश सरकारला दाट शंका उत्पन्न झाली. रानड्यांच्या सर्व व्यवहारांवर सरकारने कडक लक्ष ठेवले परंतु स्पष्ट असा पुरावा उपलब्ध न झाल्यामुळे १८८५ साली रानडे यांना कौन्सिलचे सभासद म्हणून नेमले व फायनान्स कमिटीत घेतले. गोपाळ कृष्ण गोखले यांनी राजकारणात रानडे यांचा ध्येयवाद व धोरण स्वीकारले.

रानड्यांनी १८९० साली औद्योगिक परिषद स्थापली. त्यावेळच्या प्रास्ताविक भाषणात आणि त्यानंतरच्या भाषणांमध्ये त्यांनी हिंदी अर्थशास्त्रावर अनेक उद्‌बोधक व्याख्याने दिली. कंगाल हिंदुस्थानला स्वतंत्र अर्थशास्त्र असावे, असे त्यांनी प्रतिपादिले. मराठी साहित्य संमेलनाची गंगोत्री ठरलेल्या पहिल्या मराठी ग्रंथकार संमेलनाचे (११ मे १८७८) न्यायमूर्ती रानडे हे अध्यक्ष होते.

साधारणपणे १८९४ पासून पुढील पाच-सहा वर्षे न्या. रानड्यांनी विविध संस्था आणि सभांतून मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष (१९६४) या पुस्तकात संग्रहित करण्यात आले. स्वकीयांच्या दृष्टिकोनातून मराठ्यांच्या इतिहासाची वैशिष्ट्ये निःपक्षपातीपणे सादर करणे व यूरोपीय इतिहासकारांच्या लेखनामुळे त्यासंबंधी निर्माण झालेले अपसमज दूर करणे, हा या लेखनामागील मुख्य हेतू होता.

दीर्घ आजाराने त्यांचा मुंबई येथे देहान्त झाला. भारताच्या नवयुगाचा अग्रदूत गेला, म्हणून देशातील सुशिक्षित वर्ग शोकाकूल झाला. तेव्हा भारतातील वृत्तपत्रांमध्ये त्यांच्याविषयी आलेल्या मृत्युलेखांत त्यांची थोरवी गायली गेली. लो. टिळकांनी लिहिलेल्या मृत्युलेखांत लिहिले आहे, की ‘थंड गोळा झालेला महाराष्ट्र जिवापाड मेहनत करून पुन्हा जिवंत करण्याचे दुर्धर काम प्रथम महादेवरावांनीच केले’.

——-

अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील काही प्रमुख सुधारकांचा अभ्यास केलेला आहे. उर्वरीत समाज सुधारक आपण या पुढील लेखांमध्ये बघणार आहोत. आम्ही अशीच उपयुक्त माहिती तुमच्यासाठी यापुढेही घेऊन येणार आहोत. त्याचा तुम्हाला अभ्यास करताना नक्कीच खूप फायदा होईल. त्यासाठी Adda247-Marathi च्या संकेतस्थळावर भेट देत रहा. तुम्हाला Adda247-Marathi च्या टीम कडून अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.

FAQS: MPSC Social Reformers of Maharashtra

1. महाराष्ट्रातील समाजसुधारक MSPC राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रमाचा भाग आहेत का?
उत्तर : होय. महाराष्ट्रातील समाजसुधारक MSPC राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रमाचा भाग आहेत.
2. MSPC राज्यसेवा मुख्य परीक्षेत दरवर्षी महाराष्ट्राच्या समाजसुधारकांवर किती प्रश्न विचारले जातात?
उत्तर : MSPC राज्यसेवा मुख्य परीक्षेत दरवर्षी महाराष्ट्राच्या समाज सुधारकांवर अंदाजे 8 ते 10 प्रश्न विचारले जातात.
3. MSPC राज्यसेवा मुख्य परीक्षेत महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये कोणत्या पेपर मध्ये प्रश्न विचारले जातात?
उत्तर : MSPC राज्यसेवा मुख्य परीक्षेत पेपर 1 – इतिहास मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारकांवर प्रश्न विचारले जातात.
4. MPSC च्या इतर कोणत्या परीक्षा आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारकांवर प्रश्न विचारले जातात?
उत्तर : MSPC च्या इतर अनेक परीक्षा आहेत ज्यात महाराष्ट्रातील समाज सुधारकांवर प्रश्न विचारले जातात जसे की MPSC संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य परीक्षा, MPSC संयुक्त गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा इत्यादी.

Also Read,

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे
महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली  मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी
महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Top 121 ऑलिम्पिक सामान्य ज्ञानाचे प्रश्न 

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maharashtra Maha Pack
Maharashtra Maha Pack

Sharing is caring!

MPSC Social Reformers of Maharashtra - Part 2 । MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक - भाग 2_7.1

FAQs

Does Social Reformers of Maharashtra is part of MSPC Rajyaseva Mains syllabus?

Yes. Social Reformers of Maharashtra are part of MSPC Rajyaseva Mains Syllabus.

How many questions asked on Social Reformers of Maharashtra every year in MSPC Rajyaseva Mains Exam?

Every year approximately 8 to 10 questions asked on Social Reformers of Maharashtra in MSPC Rajyaseva Mains Exam.

In which paper questions asked in Social Reformers of Maharashtra in MSPC Rajyaseva Mains Exam?

Questions asked in Social Reformers of Maharashtra in MSPC Rajyaseva Mains Exam in Paper 1 - History.

How many other exams of MPSC in which questions asked on Social Reformers of Maharashtra ?

There are many other exams of MSPC in which questions asked on Social Reformers of Maharashtra like MPSC combined Group B Pre and Mains Exams, MPSC Combined Group C Pre and Mains Exam etc,