Table of Contents
MPSC Social Reformers of Maharashtra – Part 5 | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक – भाग 5: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेची तारीख नुकतीच जाहीर केली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी एव्हाना मुख्य परीक्षेच्या तयारीला लागलेच असतील. तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब पूर्व व मुख्य परीक्षेत अभ्यासक्रमातील बरेच घटक समान आहेत. अशा घटकांचा अभ्यास करणे विद्यार्थ्यांना सोयीचे जावे, यासाठी आपण रोज अभ्यासक्रमातील काही घटकांचा अभ्यास करणार आहोत. आज या लेखात आपण पाहुयात MPSC Social Reformers of Maharashtra – Part 5 | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक – भाग 5
MPSC Social Reformers of Maharashtra – Part 5 | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक – भाग 5
MPSC Social Reformers of Maharashtra – Part 5: MPSC साठी इतिहासाच्या अभ्यास करताना समाज सुधारकांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. समाज सुधारकांचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरतो. त्यामुळेच राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सुधारक आपण क्रमश: पद्धतीने बघणार आहोत. आजच्या लेखात आपण ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांचा अभ्यास करणार आहोत. आपण याआधी अभ्यास केलेल्या सुधारकांची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Social Reformers of Maharashtra for MPSC- Part 4
Social Reformers of Maharashtra for MPSC- Part 3
Social Reformers of Maharashtra for MPSC- Part 2
Social Reformers of Maharashtra for MPSC- Part 1
MPSC Social Reformers of Maharashtra- Jyotiba Phule | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक- ज्योतिबा फुले
महात्मा जोतीराव फुले (1827-1890)
- जन्म: पुणे
- आई: चिमणाबाई
- वयाच्या तेराव्या वर्षी आठ वर्षांच्या सावित्रीबाईंशी विवाह.
- ब्राम्हण मित्र: सदाशिव बल्लाळ गोवंडे (आयुष्यभर साथ)
- 1841-47: स्कॉटीश मिशनच्या इंग्रजी शाळेत शिक्षण.
- तेथे त्यांच्या मनावर थॉमस पेन यांच्या “Rights of man” या पुस्तकाचा प्रभाव पडला.
Jyotiba Phule: Started Schools | ज्योतिबा फुले: सुरू केलेल्या शाळा
- ऑगस्ट 1948: वयाच्या 21 व्या वर्षी बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. ती 5-6 महिन्यात बंद पडली.
- 1851: मुलींसाठी दुसरी शाळा चिपळूणकरांच्या वाड्यात सुरू केली.
- 1852: एक मुलांची आणि एक मुलींची शाळा रास्ता पेठेत सुरू केली.
- 1852: अस्पृश्य मुलांसाठी भारतातील पहिली शाळा वेताळ पेठेत सुरू केली.
- 1853: “महार, मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी” ही संस्था सुरू केली.
- 1853: विश्रामबाग वाड्यात विद्यार्थ्यांची प्रकट परीक्षा. त्यातील यशाबद्दल मेजर कँडींच्या हस्ते त्यांचा सत्कार.
Jyotiba Phule: Important Events |ज्योतिबा फुले: महत्त्वाच्या घटना
- 1849: गृहत्याग.
- “दक्षिणा फंड कमिटी” ला पत्र लिहण्याची जबाबदारी घेतली.
- 1856: ब्राम्हणांनी पाठवलेल्या रोढे आणि कुंभार या मारेकर्यांकडून हत्येचा प्रसंग.
- 1860: शेणवी जातीच्या विधवेचा शेणवी विधुरा सोबत पुनर्विवाह घडवून आणला.
- 1863: पुण्यात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन –> मूल लग्नाचे असो वा बिन-लग्नाचे मातृपद पवित्र आहे.
- 1865: तुकाराम तात्या पडवळ लिखीत “जातिभेद विवेकसार” या ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली.
- 1865: केशवपना विरुद्ध लढा. तळेगाव ढमढेरे येथे नाभिकांचा संप घडवून आणला.
- 1868: घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
- 1869: रायगडाला भेट. तेथे शिवरायांचा पोवाडा रचून तो परमहंस मंडळी अध्यक्ष राम बाळकृष्ण जयकर यांना अर्पण केला.
- 1873: काशिबाई या ब्राम्हण स्त्रीचा मुलगा यशवंत याला दत्तक घेतले.
- 1873: सत्यशोधक समाज स्थापना. (पहिले अध्यक्ष व कोशाध्यक्ष: ज्योतिबा फुले, सचिव: नारायण राव कडळक)
- 1983: सिताराम आल्हाट व राधाबाई निंबकर यांचा विवाह भटजी शिवाय पार पाडला.
- 1876-82: पुणे पालिकेचे सदस्य.
- 1882: हंटर कमिशनला शिक्षणासंबंधी निवेदन.
- 1888: ड्यूक ऑफ कॅनॉटच्या सन्मानार्थ हरी रावजी चिपळूणकर यांनी आयोजित केलेल्या सभेत शेतकर्याच्या वेशात प्रवेश.
- 1888: कोळीवाडा मुंबई येथे रावसाहेब वडेरकर यांच्या हस्ते त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली.
Jyotiba Phule: Written Books | ज्योतिबा फुले: ग्रंथ संपदा
- 1855: तृतीय रत्न (नाटक)
- 1869: ब्राम्हणांचे कसब (काव्यसंग्रह)
- 1873: गुलामगिरी (पहिला ग्रंथ) –> दोन वेगवेगळ्या किंमती. अमेरीकन स्वातंत्र्य लढ्यातील वीरांना अर्पण. सुरुवात होमरच्या वचनाने.
- 1883: शेतकऱ्यांचा आसूड.
- 1884: अस्पृश्यांची कैफियत.
- जून 1885: सत्सार भाग 1
- ऑक्टोबर 1885: सत्सार भाग 2
- ऑक्टोबर 1885: इशारा.
- 1889: सार्वजनिक सत्यधर्म (मृत्यूनंतर प्रकाशित)
Jyotiba Phule: Death | ज्योतिबा फुले: निधन
- 1886: ग्रामजोश्यांच्या हक्कासंबंधी जुन्नर कोर्टाचा निर्णय.
- 1887: धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचे जतन करण्यासाठी स्वतःचे विधी स्वतः करण्याचा निर्णय घेतला व स्वतःचे मृत्युपत्र तयार केले.
- 28 नोव्हेंबर 1990: पुणे येथे निधन.
- महात्मा फुले यांच्या कार्याने सर्जनशील विध्वंसाची प्रचंड उर्जा निर्माण केली. त्यातूनच पुढे ब्राम्हणेतर व इतर विविध चळवळींचा उगम झाला.
MPSC Social Reformers of Maharashtra- Rajarshi Shahu Maharaj | MPSC महाराष्ट्रातील समाज सुधारक- राजर्षी शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराज (1874-1922)
- जन्म: लक्ष्मी विलास पॅलेस, कोल्हापूर
- वडील: जयसिंगराव घाटगे
- आई: राधाबाई
- आधीचे नाव: यशवंतराव
- 1884: दत्तकविधान (कोल्हापूर संस्थानचे राजे शिवाजी चौथे यांच्या विधवा पत्नी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतले)
- 1885-1989: राजकोटच्या रात्रपुत्रांसाठीच्या कॉलेजात 4 वर्ष शिक्षण (प्रिंसिपल – मॅकनॉटन)
- 1890-94: धारवाडला I.C.S. अधिकारी फ्रेझर द्वारे शिक्षण.
- 1894: राजकारणाची सूत्रे हातात घेतली.
- 1902: केंब्रिज विद्यापीठाकडून L.L.D. पदवी.
- इंग्रज सरकारकडून मिळालेले सन्मान: G.C.S.I., M.E.O.C., G.C.I.E.
Rajarshi Shahu Maharaj: Important Events | राजर्षी शाहू महाराज: महत्त्वाच्या घटना
- 1888: शाहू महाराज यांच्या हस्ते कोल्हापूर – मिरज रेल्वे मार्गाची पायाभरणी.
- 1895: शाहूपुरी व्यापारी पेठ स्थापन केली.
- स्त्री शिक्षण खात्याची अधिक्षक म्हणून सौ. राधाबाई उर्फ रखमाबाई केळवकर यांची नेमणूक केली.
- 1899: पंचगंगा घाट प्रसंग. त्यामुळे पंचगंगा घाट सर्वांना खुला झाला.
- 1901: वेदोक्त प्रकरण. शाहू महाराज स्वत: क्षत्रिय असून त्यांना वेदोक्त मंत्र श्रवणाचा अधिकार नाकारणारे उन्मत्त राज पुरोहित राजपाध्ये यांचे इनाम व अधिकार शाहू महाराजांनी काढून त्यांची पदावरून हकालपट्टी केली. या प्रकरणात लोकमान्य टिळकांनी सनातनी लोकांची बाजू घेऊन शाहू महाराजांवर टीका केली.
- 1905: उदगाव पीठाच्या शंकराचार्यांनी वेदोक्त प्रकरणात महाराजांची भूमिका मान्य केली.
- 1906: शाहू स्पिंनिंग अँड वेव्हिंग मिल (शाहू मिल) स्थापन केली.
- 1907: कोल्हापूरात सहकारी तत्वावर कापड गिरणी स्थापन केली.
- 1907: राधानगरी धरणाची योजना. पत्नी लक्ष्मीबाईंच्या हस्ते लक्ष्मीबाई तलावाची पायाभरणी केली व त्याला लक्ष्मीबाई तलाव नाव दिले.
- 1908: इचलकरंजी येथे जिंनिंग फॅक्टरी स्थापन केली.
- 1919: डॉ. कुर्तकोटी यांची करवीर पीठाच्या शंकराचार्य पदावरून हकालपट्टी केली.
Rajarshi Shahu Maharaj: Laws Made | राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले कायदे
- 1897: दुष्काळात सारा माफिया कायदा.
- 1902: भरतीत मागासवर्गीयांसाठी 50% जागा राखीव.
- 1905: सरकारी नोकरांनी आपल्या व नातलगांच्या नावाने धंदा करू नये, मालमत्ता विकत घेऊ नये, यासाठी कायदा केला.
- 1911: महारांच्या वतनी जमिनी रयतावा म्हणून परत केल्या.
- 1911: आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना फी माफ केली.
- 1917: विधवा विवाह कायदा केला. तसेच विवाह नोंदणी सर्वांना सक्तीची केली.
- 1917: कारभारात मोडी लीपीचा वापर बंद करून बाळबोध लिपीचा वापर सुरू केला.
- 1917: सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला.
- 1918: कोल्हापूरात बलुतेदारी पद्धत बंद केली.
- 1918: आंतरजातीय व मिश्र विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.
- 1918: महार वतन रद्द केले.
- 1918: कुलकर्णी व ग्रामजोश्यांची वतने रद्द करून त्या जागेवर पगारी तलाठी नेमले.
- 1918: गुन्हेगार जमातीच्या लोकांना पोलिस चौकीवर द्यावी लागणारी हजेरीची पद्धत बंद केली.
- 1919: स्त्रीयांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध करणारा कायदा केला. (शिक्षा: 6 महिने कैद व 200 रुपये दंड)
- 1919: सार्वजनिक स्थळे वापरण्याचा अस्पृश्यांना हवक देणारा कायदा केला.
- 1919: 18 वर्ष वयाच्या मुलीला स्वेच्छेनुसार लग्न करता येण्याची तरतूद करणारा कायदा केला.
- 1919: घटस्फोटाचा कायदा केला.
- 1919: खाटकाला गाय विकू नये यासाठी कायदा केला.
- 1920: जोगत्या मुरळी प्रतिबंधक कायदा केला.
- 1921: शिमग्याची अनिष्ट प्रथा रद्द केली.
Rajarshi Shahu Maharaj: Institutions established | राजर्षी शाहू महाराज: स्थापन केलेल्या संस्था
- 1911: कोल्हापूरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. (अध्यक्ष: परशूराम घोसरवाडकर, कार्यकारी अध्यक्ष: भास्करराव जाधव)
- 1913: धार्मिक विधींचे प्रशिक्षण देण्यासाठी सत्यशोधक शाळांची स्थापना केली. (प्रमुख: विठ्ठलराव डोणे)
- 1916: निपाणी येथे डेक्कन रयत संस्था स्थापन केली. (अण्णासाहेब लठ्ठे, वालचंद कोठारी, मुकुंदराव पाटिल)
- 1918: कोल्हापूरात आर्य समाजाची शाखा सुरू केली.
- 1920: श्री शिवाजी वैदिक विद्यालयाची स्थापना केली आणि हिंदूसंहिता लागू केली.
- 1920: पारगाव येथे श्रीक्षात्रजगद्गुरु पीठाची स्थापना केली. (पहिले शंकराचार्य: सदाशिव पाटील बेनाडीकर)
Rajarshi Shahu Maharaj: Important Meetings | राजर्षी शाहू महाराज: महत्वाच्या सभा
- 1903 आणि 1911 मध्ये इंग्रजांनी भरवलेल्या दिल्ली दरबारांना उपस्थित.
- 1917: अध्यक्ष- अखिल भारतीय मराठा शिक्षण परीषद, खामगाव.
- 1918: अध्यक्ष- परळ येथे भरलेली कामगार सभा
- 1919: सत्यशोधक समाज परीषद – कार्ले, सातारा (अध्यक्ष: केशवराव बागडे) येथे उपस्थित.
- 1919: कानपूर येथे भरलेल्या कुर्मी क्षत्रियांच्या सभेत “राजर्षी” ही पदवी प्रदान.
- 1920: माणगावची अस्पृश्यांची परिषद (अध्यक्ष: डॉ आंबेडकर) येथे उपस्थित.
- 1920: अध्यक्ष- अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद, नागपूर.
- 1920: अध्यक्ष- ब्राहमणेतर सामाजिक परिषद, हुबळी.
- 1921: अध्यक्ष- पहिली पाटील परिषद, पुणे.
- 1921: भाम्बुर्डे, शिवाजीनगर येथील शिव स्मारकाचे उद्घाटन.
- 1922: अध्यक्ष- अखिल भारतीय अस्पृश्य परीषद, दिल्ली.
Rajarshi Shahu Maharaj: Help to Newspapers | राजर्षी शाहू महाराज: वृत्तपत्रांना मदत
- मूकनायक: डॉ आंबेडकर
- विजयी मराठा: श्रीपतराव शिंदे
- संदेश: अच्युत बळवंत कोल्हटकर
- जागरूक: वालचंद कोठारी
- शिवछत्रपती: किर्तीवान निंबाळकर
- राष्ट्रवीर: शामराव भोसले (बेळगाव)
Rajarshi Shahu Maharaj: Death | राजर्षी शाहू महाराज: निधन
- फेब्रुवारी 1922: महात्मा गांधी आणि छत्रपती शाहू महाराज यांची कुरुक्षेत्र येथे भेट.
- 6 मे 1922: पन्हाळा लॉज, मुंबई येथे वयाच्या 48 व्या वर्षी निधन.
- छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या कार्यामुळे सामाजिक लोकशाहिचे आधारस्तंभ तसेच हिंदी सामाजिक असंतोषाचे जनक मानले जाते.
FAQ: MPSC Social Reformers of Maharashtra – Part 5
Q1. महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय?
उत्तर: महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव सावितीबाई होते.
Q2. महात्मा फुले यांच्या मनावर कोणत्या पुस्तकाचा प्रभाव पडला?
उत्तर: महात्मा फुले यांच्या मनावर थॉमस पेन यांच्या “Rights of man” या पुस्तकाचा प्रभाव पडला.
Q3. छत्रपती शाहू महाराजांचे आधीचे नाव काय होते?
उत्तर: छत्रपती शाहू महाराजांचे आधीचे नाव यशवंतराव होते.
Q4. कोल्हापूरात सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर:कोल्हापूरात सत्यशोधक समाजाची स्थापना छत्रपती शाहू महाराज यांनी केली.
Also read,