Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 उत्तरतालिका

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023, उत्तरतालिका PDF डाउनलोड करा

Table of Contents

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 उत्तरतालिका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. 02 फेब्रुवारी 2024 रोजी MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 उत्तरतालिका जाहीर केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, दि. 20, 21 व 22 जानेवारी 2024 रोजी MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 घेण्यात आली आहे. जे उमेदवार MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये उत्तीर्ण झाले ते उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र आहेत. या लेखात आपण  MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 उत्तरतालिका PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक देणार आहोत.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 उत्तरतालिका: विहंगावलोकन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. 02 फेब्रुवारी 2024 रोजी MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 उत्तरतालिका जाहीर केली आहे. दिनांक 20, 21 व 22 जानेवारी 2024 रोजी MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 घेण्यात आली आहे. उमेदवार या लेखात MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चा सर्व तपशील तपासू शकतात.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
आयोगाचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षेचे नाव MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
लेखाचे नाव MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रश्नपत्रिका
परीक्षेची तारीख 20, 21 व 22 जानेवारी 2024 
उत्तरतालिका तारीख 02 फेब्रुवारी 2024
MPSC चे अधिकृत संकेतस्थळ https://mpsc.gov.in/

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 उत्तर तालिका PDF

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. 02 फेब्रुवारी 2024 रोजी MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 उत्तरतालिका जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात.

पेपर डाउनलोड लिंक (प्रश्नपत्रिका) डाउनलोड लिंक (उत्तरतालिका)
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 भाषा पेपर 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 भाषा पेपर 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 सामान्य ज्ञान पेपर 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 सामान्य ज्ञान पेपर 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 सामान्य ज्ञान पेपर 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 सामान्य ज्ञान पेपर 4 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम: या लेखात आपण MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत. मुख्य परीक्षेचे स्वरूप थोडक्यात खालीलप्रमाणे;

पेपर क्रमांक  विषय  प्रश्नसंख्या  एकूण गुण  कालावधी 
1 भाषा पेपर 1 (मराठी |इंग्रजी)   — 50 + 50 3 तास
2 भाषा पेपर 2 (मराठी |इंग्रजी) 50 + 50 50 + 50 1 तास
3 सामान्य अध्ययन – 01 150 150 2 तास
4 सामान्य अध्ययन – 02 150 150 2 तास
5 सामान्य अध्ययन – 03 150 150 2 तास
6 सामान्य अध्ययन – 04 150 150 2 तास
एकूण  800

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम: वरील भागात दिलेल्या स्वरूपानुसार राज्य सेवा मुख्य परीक्षेचा तपशीलवार अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा – भाषा पेपर 1 चा अभ्यासक्रम 

राज्यसेवा मुख्य परीक्षा – भाषा पेपर 1 चा अभ्यासक्रम: या विषयात उमेदवाराचे मराठी आणि इंग्रजी विषयातील भाषेचे ज्ञान आणि लेखन कौशल्य तपासले जाते.

  • एकूण प्रश्न – 3 (मराठी) + 3 (इंग्रजी)
  • एकूण गुण – 50 (मराठी) + 50 (इंग्रजी)
  • वेळ – 2 तास
  • स्वरूप – वर्णनात्मक / पारंपारिक

भाषा पेपर 1 (मराठी आणि इंग्रजी) चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 50+50=100)

पेपर 01    गुण   अभ्यासक्रम 
भाग – 01 (मराठी) 50
  1. निबंध लेखन – दोनपैकी एका विषयावर सुमारे 400 शब्द
  2. भाषांतर इंग्रजी उताऱ्याचे मराठीत भाषांतर, सुमारे अर्धे पान/2 परिच्छेद
  3. सारांश लेखन
भाग – 02

(इंग्रजी)

50
  1. Essay writing- An essay on one out of the two given topics/subject (About 400 words)
  2. Translation – Marathi paragraph to be translated into English, approximately 1/2Page/paragraphs
  3. Precis writing

 

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा – भाषा पेपर 2 चा अभ्यासक्रम 

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा – भाषा पेपर 2 चा अभ्यासक्रम : या विषयात उमेदवाराचे मराठी व इंग्रजी भाषेचे तांत्रिक ज्ञान अर्थात व्याकरण आणि उमेदवाराचा शब्दसंग्रह, म्हणी, वाक्प्रचार इत्यादींचा अभ्यास तपासला जातो.

  • एकूण प्रश्न – 50 (मराठी) + 50 (इंग्रजी)
  • एकूण गुण – 50 (मराठी) + 50 (इंग्रजी)
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
  • वेळ – 1 तास
  • स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

भाषा पेपर 2 (मराठी आणि इंग्रजी) चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 50+50=100)

पेपर 02   गुण  अभ्यासक्रम 
भाग – 01 (मराठी) 50
  1. व्याकरण – म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी/विरुध्दार्थी शब्द, शुध्दलेखन/विरामचिन्हे, इत्यादी
  2. आकलन- उताऱ्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहिणे.
भाग – 02

(इंग्रजी)

50
  1. Grammar Idioms, Phrases, Synonyms/ Antonyms, Correct formation of words and sentences, Punctuation, etc.
  2. Comprehension

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 01 चा अभ्यासक्रम

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 01 चा अभ्यासक्रम: या विषयात उमेदवाराचे महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासाविषयी तसेच महाराष्ट्र आणि भारताचा भौतिक, आर्थीक, सामाजिक आणि मानवी भूगोल आणि कृषी शास्त्र यांविषयीचे ज्ञान तपासले जाते.

  • एकूण प्रश्न – 150   
  • एकूण गुण – 150  
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
  • वेळ – 2 तास
  • स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

सामान्य अध्ययन 01 चा अभ्यासक्रम-

I. इतिहास

  1. ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना
  2. आधुनिक भारताचा इतिहास
  3. प्रबोधन काळ
    1. सामाजिक सांस्कृतिक बदल
  4. वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था
  5. भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास
  6. ब्रिटीश शासनाविरोधी झालेले प्रसिध्द उठाव
  7. गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा दृष्टीकोन
  8. ब्रिटीश प्रशासन अधीन घटनात्मक विकास
  9. सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी
  10. सत्तेच्या हस्तांतरणाकडे
  11. स्वातंत्र्योत्तर भारत
  12. महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक
  13. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा

II. भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)

  1. भूरुपशास्त्र
  2. हवामानशास्त्र
  3. मानवी भूगोल
  4. आर्थिक भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)
  5. लोकसंख्या भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)
  6. पर्यावरणीय भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)
  7. भूगोल आणि आकाश-अवकाशीय / अंतराळ तंत्रज्ञान
  8. सुदूर संवेदन
  9. रिमोट सेन्सिंगची मुलभूत तत्त्वे
  10. एरियल फोटोग्राफी
  11. जीआयएस आणि त्याचे अनुप्रयोग

III. कृषी 

  1. कृषी परिसंस्था
  2. मृदा
  3. जल व्यवस्थापन

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 02 चा अभ्यासक्रम

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 02 चा अभ्यासक्रम: या विषयात उमेदवाराचे भारतीय संविधान आणि भारतीय राज्यप्रणाली तसेच काही महत्त्वाच्या कायद्यांचा अभ्यास तपासला जातो आणि यामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय प्रणालीविषयी, पंचायत राज इत्यादी विषयीचे ज्ञान तपासले जाते.

  • एकूण प्रश्न – 150   
  • एकूण गुण – 150  
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
  • वेळ – 2 तास
  • स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

सामान्य अध्ययन 02 चा अभ्यासक्रम:

  1. भारताचे संविधान
  2. भारतीय संघराज्य आणि राजकीय व्यवस्था (शासनाची संरचना, अधिकार व कार्ये)
  3. भारतीय प्रशासनाचा उगम
  4. राज्यशासन व प्रशासन (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह)
  5. ग्रामीण व नागरी स्थानिक शासन व प्रशासन
  6. जिल्हा प्रशासन
  7. पक्ष आणि हितसंबंधी गट
  8. निवडणूक प्रक्रिया
  9. प्रसार माध्यमे
  10. शिक्षण पद्धती
  11. प्रशासनिक कायदा
  12. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966
  13. काही सुसंबद्ध कायदे
  14. समाज कल्याण व सामाजिक विधीविधान
  15. वित्तीय प्रशासन
  16. कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था
  17. सार्वजनिक सेवा
  18. घटनात्मक आणि वैधानिक संस्था
  19. लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टीकोन आणि सिद्धांत
  20. सार्वजनिक धोरण

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 03 चा अभ्यासक्रम

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 03 चा अभ्यासक्रम: या विषयात उमेदवाराचे मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क या विषयातील ज्ञान तपासले जाते. याशिवाय भारत आणि महाराष्ट्र सरकारच्या विविध योजना आणि प्रकल्प यांबद्दल माहिती विचारली जाते.

  • एकूण प्रश्न – 150   
  • एकूण गुण – 150  
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
  • वेळ – 2 तास
  • स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

सामान्य अध्ययन 03 (मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क) चा अभ्यासक्रम-

I. मानव संसाधन विकास

  1. भारतातील मानव संसाधन विकास
  2. शिक्षण
  3. व्यावसायिक शिक्षण
  4. आरोग्य
  5. ग्रामीण विकास

II. मानवी हक्क 

  1. जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र (युडीएचआर 1948)
  2. बालविकास
  3. महिला विकास
  4. युवकांचा विकास
  5. आदिवासी विकास
  6. सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास
  7. वयोवृद्ध लोकांचे कल्याण
  8. कामगार कल्याण
  9. विकलांग व्यक्तींचे कल्याण
  10. लोकांचे पुनर्वसन (विकास प्रकल्प आणि नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित लोक)
  11. आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना
  12. ग्राहक संरक्षण अधिनियम 2019
  13. मुल्ये, नीतितत्त्वे आणि प्रमाणके

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 04 चा अभ्यासक्रम

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 04 चा अभ्यासक्रम:  या विषयात उमेदवाराचे अर्थशास्त्र, नियोजन, कृषी अर्थशास्त्र आणि विज्ञान व तंत्रज्ञान यातील तांत्रिक माहिती तसेच चालू घडामोडी यांविषयीचे ज्ञान तपासले जाते. अर्थशास्त्रात संकल्पना, भारतीय अर्थशास्त्र आणि महाराष्ट्र अर्थव्यवस्था यांवर भर दिला जातो.

  • एकूण प्रश्न – 150   
  • एकूण गुण – 150  
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
  • वेळ – 2 तास
  • स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

सामान्य अध्ययन 04 (अर्थशास्त्र, नियोजन, कृषी अर्थशास्त्र आणि विज्ञान व तंत्रज्ञान) 02 चा अभ्यासक्रम

I. समग्रलक्षी अर्थशास्त्र

  1. समग्रलक्षी अर्थशास्त्र
  2. वृद्धी आणि विकास
  3. सार्वजनिक वित्त
  4. मुद्रा / पैसा
  5. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल

II. भारतीय अर्थव्यवस्था 

  1. भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा
  2. भारतीय शेती व ग्रामीण विकास
  3. सहकार
  4. मौद्रिक व वित्तीय क्षेत्र
  5. सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था
  6. उद्योग व सेवा क्षेत्र
  7. पायाभूत सुविधा विकास
  8. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल
  9. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
  10. कृषी
    1. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व
    2. ग्रामीण कर्जबाजारीपणाची समस्या आणि कृषी वित्त पुरवठा
  11. अन्न व पोषण आहार

III. विज्ञान व तंत्रज्ञान विकास

  1. ऊर्जा विज्ञान
  2. संगणक व माहिती तंत्रज्ञान
  3. अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान
  4. जैवतंत्रज्ञान
    1. प्रस्तावना
    2. शेतीमध्ये (कृषि) जैवतंत्रज्ञान
    3. वनस्पती उर्जा संवर्धन
    4. प्रतिरक्षा विज्ञान
    5. डीएनए तंत्रज्ञानाची मनुष्य व प्राण्याकरीता उपयोगीता
    6. लसी
    7. किण्वन
    8. जैवनैतिकता
    9. जैवसुरक्षा
    10. एकाधिकार (पेटंट)
  5. भारताचा आण्विक कार्यक्रम
  6. आपत्ती व्यवस्थापन

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम डाऊनलोड करा

MPSC अभ्यासक्रम डाउनलोड: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम (मराठी आणि इंग्रजी) डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम मराठी मध्ये

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम इंग्रजी मध्ये

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

MPSC अराजपत्रित सेवा गट ब आणि गट क 2023 शी संबंधित इतर लेख

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 उत्तरतालिका PDF मला कोठे मिळतील?

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 उत्तरतालिका PDF या लेखात दिल्या आहेत.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 कधी घेण्यात येणार आहे?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, दि. 20, 21 व 22 जानेवारी 2024 रोजी MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 घेण्यात येणार आहे.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 उत्तरतालिका कधी जाहीर झाली?

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 उत्तरतालिका 02 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली.