Table of Contents
MPSC Group B STI Combine Prelims Result 2020: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 राज्य कर निरीक्षक (STI Prelims Result) पदासाठीचा निकाल जाहीर करण्यात आले आहे. MPSC Group B Combine Prelims Exam 2020 मध्ये STI पदासाठी उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांचे विभागनिहाय बैठक क्रमांक आणि त्यांच्या नावांची यादी आणि पूर्व परीक्षेच्या गुणांची सीमारेषा (STI Prelims Cut Off) आयोगाच्या संकेतस्थळावर त्याचप्रमाणे या लेखात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे.
MPSC Group B STI Combine Prelims Exam Result | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 STI पदासाठीचा निकाल जाहीर
MPSC Group B Combine Prelims STI Exam Result 2020: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 घेण्यात आली होती. प्रस्तुत परीक्षेमधून राज्य कर निरीक्षक (STI) पदासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून राज्य कर निरीक्षक (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत पदाकरीता पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर त्याचप्रमाणे या लेखात pdf फॉरमॅट मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.
MPSC Group B STI Combine Prelims Exam 2020 Result Notification
MPSC Grp B Combine Prelims Exam STI Result Important Dates | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा STI पदासाठीचा निकालाबाबत महत्वाच्या तारखा
MPSC Grp B Combine Prelims Exam STI Result Important Dates: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी घेण्यात आली होती. या भरती बाबतच्या इतर मजत्वाच्या तारखा खाली तक्त्यात देण्यात आले आहे
MPSC Group B Combine Prelims Exam Date/ संयुक्त पूर्व परीक्षा 2020 | 4 सप्टेंबर, 2021 |
MPSC Group B Combine Prelims Result for ASO | 30 नोव्हेंबर 2021 |
MPSC Group B Combine Prelims Result for PSI | लवकरच जाहीर करण्यात येईल |
MPSC Group B Combine Prelims Result for STI | 1 डिसेंबर 2021 |
MPSC Group B Combine Mains Exam Paper 1 | 22 जानेवारी, 2022 |
MPSC Grp B ASO Paper 2 Mains Exam Date | 05 फेब्रुवारी, 2022 |
MPSC Grp B PSI Paper 2 Mains Exam Date | 29 जानेवारी, 2022 |
MPSC Grp B STI Paper 2 Mains Exam Date | 12 फेब्रुवारी, 2022 |
MPSC Group B STI Combine Prelims Exam 2020: List of Qualified Candidates | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020: STI पात्र उमेदवारांची यादी
MPSC Group B STI Combine Prelims Exam 2020: List of Qualified Candidates: प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अहर्ताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक 1 दिनांक 22 जानेवारी, 2022 व पेपर क्र. 2 दिनांक 12 फेब्रुवारी, 2022 रोजी घेण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या/समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात/मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीन आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता स्वीकारार्ह ठरतील. MPSC गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मध्ये उत्तीर्ण होऊन STI मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व परीक्षार्थींची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक वर करा.
MPSC Grp B STI Combine Prelims Result 2020: List of Qualified Candidates
MPSC Grp B Prelims Exam 2020: STI Cut-off | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020: STI गुणांची सीमारेषा
MPSC Grp B Prelims Exam 2020 STI Cut-off: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 STI पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणांची सीमारेषा (STI Cut Off) खालीलप्रमाणे आहे; जे उमेदवार पात्र होऊ शकले नाहीत त्यांनी खचून न जाता आपल्या चुकांचे अवलोकन करून त्या चुका पुढील परीक्षेत नाही होणार या दृष्टीने पुढच्या परीक्षेसाठी परीक्षेसाठी लवकरात लवकर अभ्यास सुरु करावा. Adda247 मराठीची सर्व टीम तुमच्या मदतीला सदैव राहीलच त्यामुळे खचून जाऊ नका आणि पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करा. पुन्हा एकदा MPSC Group B Combine Prelims Exam 2020 STI पदासाठी सर्व पात्र उमेदवारांचे अभिनंदन आणि मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा.
MPSC Group B STI Combine Prelims Exam Cut Off
Also Check,
MPSC Group B ASO Combine Prelims Result 2020 Out
MPSC Group B ASO Prelims Cut Off 2020
FAQs: MPSC Group B Combine Exam 2020 STI Result
Q1. MPSC Grp B Combine Prelims Exam 2020 STI चा निकाल लागला आहे का?
उत्तर: होय. Grp B Combine Prelims Exam 2020 STI चा निकाल 1 डिसेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला.
Q2. MPSC Grp B Combine Prelims Exam 2020 STI चा निकाल कसा तपासता येईल?
उत्तर: उमेदवार वरील दिलेल्या लिंकवरून MPSC Grp B Combine Prelims Exam 2020 STI चा निकाल तपासू शकतात.
Q3. MPSC Grp B STI Prelims Exam चा Cut Off कुठे पाहायला मिळेल?
उत्तर: MPSC Grp B STI Prelims Exam चा Cut Off वरील लेखात देण्यात आले आहे.