Table of Contents
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकांचा अभ्यास
आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना महाराष्ट्नाचा इतिहास अभ्यासणे इथे अपेक्षित आहे. आधुनिक महाराष्ट्नाच्या इतिहासामध्ये समाजसुधारक हा अभ्यासघटक हा खुप महत्वाचा ठरतो. आगामी काळातील MPSC भरती परीक्षा 2024 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेत समाजसुधारक या घटकावर प्रश्न विचारतांना समाजसुधारकांचे जन्म व मृत्यू दिनांक, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग, त्यांनी स्थापन केलेल्या महत्त्वाच्या संस्था, त्यांचे लेखन विषयक कार्य व त्यांचे वैचारिक विश्व यावर प्रश्न विचारले गेलेले दिसतात. उदा. “गुलामगिरी’ गंथ कोणी लिहिला? चवदार तळे येथे कोणी, कधी, सत्यागह केला? वेदोक्त प्रकरण कधी घडले होते? लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकाचा उल्लेख केला जातो? इ. समाजसुधारकावरील प्रश्नांचे स्वरुप पूर्णत: वस्तूनिष्ठ असते. त्यामुळे समाजसुधारकाच्या घटकाचे एकदा, दोनदा सूक्ष्म वाचन झाले तर वस्तूनिष्ठ स्वरुपाची माहिती एकत्रित करुन त्याची सतत रिव्हिजन करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा.
MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पंडिता रमाबाई: विहंगावलोकन
महाराष्ट्रात प्रबोधनाची चळवळ रुजविण्याचे व वाढविण्याचे कार्य ज्यांनी केले त्या समाजसुधारकांच्या कार्याचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे आहे.
पंडिता रमाबाई: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC भरती परीक्षा 2024 व इतर सर्व स्पर्धा परीक्षा |
विषय | इतिहास |
लेखाचे नाव | पंडिता रमाबाई |
लेखातील मुख्य घटक |
|
पंडिता रमाबाई (इ. स. 1858 ते 1922)
- पंडिता रमाबाई यांनी बुद्धिमत्ता व कर्तबगारी यांच्या जोरावर महाराष्ट्रात अलौकिक कार्य केले.
- त्यांचा जन्म कर्नाटकातील मंगळूर जिल्हयातील गंगामुळ या गावी 23 एप्रिल 1858 रोजी झाला.
- त्यांचे पूर्ण नाव रमाबाई अनंतशास्त्री डोंगरे असे होते.
- श्रीनिवास हा त्यांचा एकुलता एक भाऊ होता.
- वडिलांनी त्यांना प्राचीन हिंदू शास्त्रांचे चांगले शिक्षण दिले होते.
- 1879 ला कलकत्ता University च्या विद्वानांच्या सभेत रमाबाई पंडिता व सरस्वती या पदव्या त्यांना बहाल करण्यात आल्या, तेव्हापासून रमाबाई या पंडिता रमाबाई सरस्वती या नावाने आळखल्या जावू लागल्या.
- 1880 मध्ये त्यांनी कलकत्यामधील बाबु बिपीन बिहारीदास मेधावी या ब्राम्हो समाजाच्या वकिलासोबत आंतरजातीय विवाह केला (Civil Marriage Act).
- स्त्रियांच्या स्थितीबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी ‘आर्य महिला समाजा’ची स्थापना 1882 मध्ये त्यांनी केली.
- देशाच्या उन्नतीसाठी स्त्रियांची स्थिती सुधारणे गरजेचे आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.
- सहकार्य – न्या. रानडे, डॉ. भांडारकर, वामनमोहक.
- त्यांनी हंटर कमिशनपुढे साक्ष देताना स्त्री शिक्षणासाठी आग्रह धरला.
- त्या मिशनऱ्यांच्या मदतीने इंग्लंड व अमेरिकेला गेल्या.
- ख्रिश्चन धर्मातील सेवाभावी वृत्ती व मानवतावादी विचारांमुळे त्यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारला.
- त्यांनी आपले संपूर्ण लक्ष स्त्री-शिक्षणावर केंद्रित केले.
- रमाबाईंने स्त्रियांच्यासाठी केलेले महत्त्वाचे कार्य म्हणजे ‘शारदा सदन’ची स्थापना होय.1889 मध्ये त्यांनी मुंबईत या संस्थेची स्थापना केली.
- निराश्रित विधवा व अनाथ स्त्रियांच्या राहण्याची व भोजनाची मोफत व्यवस्था तेथे करण्यात आलेली होती.
- 1886 मध्ये अमेरिकेत आनंदीबाई जोशी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान.तेथे पंडिता रमाबाई या उपस्थित होत्या.
- 1887 ला अमेरिकेत रमाबाई असोसिएशनची स्थापना केली.
- 1889 – मुबंईत शारदा सदन स्थापन.
- शारदा सदन सल्लागार मंडळ- न्या. रानडे, न्या. तेलंग, डॉ. भांडारकर.
- शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थिनी गोंदुबाई (महर्षी कर्वेंच्या पत्नी) या होत्या.
- 1892 ला पुणे येथे शारदा सदनच्या इमारतीचे उद्घाटन डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी केले होते.
- संमती वयाच्या बिलास पाठिंबा होता.
- मुक्ती सदनची स्थापना केडगाव,पुणे येथे केली.
- मनोरमाने केडगाव येथे अंधशाळा सुरू केली.
- पं. रमाबाईंनी नंतर केडगाव येथे ‘मुक्तिसदन’ नावाची संस्था सुरू केली. त्यात अनाथ व विधवा स्त्रियांच्या शिक्षणाची, निवासाची आणि भोजनाची मोफत सोय केली.
- 1897 च्या दुष्काळाच्या वेळी जनतेला त्यांनी मदतीचा हात दिला.
- त्यांनी लिहिलेले ‘बायबलचे मराठी भाषांतर’, ‘स्त्रीधर्मनीती’, ‘दि हाय कास्ट हिंदू वुमन’ इत्यादी ग्रंथ उल्लेखनीय आहेत.
- दि हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक त्यांनी भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना अपर्ण केले.
- 1919 ला त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन इंग्रज सरकाकडून पंडिता रमाबाईंना कैसर-ए-हिंद ही पदवी व सुवर्णपदक बहाल.
- पं. रमाबाईंचा मृत्यू इ. स. 5 एप्रिल 1922 रोजी झाला.
पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था :
- मुक्तिसदन -अनाथ मुली व स्त्रिंयाच्या राहण्याची सोय
- बातमी सदन -अंध मुलींसाठी स्थापना
- कृपासदन- लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या स्त्रियांना मदत करण्यासाठी
- सदानंद सदन – लहान अनाथ मुलींच्या शिक्षणासाठी
- प्रितीसदन- अपंग व निराधार स्रियासांठी
MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान(GS) | |
तारीख | टॉपिक |
31 डिसेंबर 2023 | जालियनवाला बाग हत्याकांड |
1 जानेवारी 2024 | गांधी युग |
3 जानेवारी 2024 | रक्ताभिसरण संस्था |
5 जानेवारी 2024 | प्राकृतिक महाराष्ट्र – कोकण किनारपट्टी |
7 जानेवारी 2024 | 1857 चा उठाव |
9 जानेवारी 2024 | प्राण्यांचे वर्गीकरण -असमपृष्ठरज्जू प्राणी |
11 जानेवारी 2024 | राज्यघटना निर्मिती |
13 जानेवारी 2024 | अर्थसंकल्प |
15 जानेवारी 2024 | महाराष्ट्र – स्थान व विस्तार |
17 जानेवारी 2024 | भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल |
19 जानेवारी 2024 | मूलभूत हक्क |
21 जानेवारी 2024 | वैदिक काळ |
23 जानेवारी 2024 | सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी |
25 जानेवारी 2024 | शाश्वत विकास |
27 जानेवारी 2024 | महर्षी कर्वे व त्यांचे कार्य |
29 जानेवारी 2024 | 1942 छोडो भारत चळवळ |
31 जानेवारी 2024 | भारतीय रिझर्व्ह बँक |
1 फेब्रुवारी 2024 | भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे |
2 फेब्रुवारी 2024 | स्वातंत्र्यापूर्वीची भारतीय अर्थव्यवस्था |
3 फेब्रुवारी 2024 | रौलेट कायदा 1919 |
4 फेब्रुवारी 2024 | गारो जमाती |
5 फेब्रुवारी 2024 | लाला लजपत राय |
MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान(GS) | |
तारीख | टॉपिक |
6 फेब्रुवारी 2024 | भारतीय राज्यघटनेचे कलम 15 |
7 फेब्रुवारी 2024 | भारतातील हरित क्रांती |
8 फेब्रुवारी 2024 | मार्गदर्शक तत्वे |
9 फेब्रुवारी 2024 | गौतम बुद्ध : जीवन आणि शिकवण |
10 फेब्रुवारी 2024 | भारतीय नियोजन आयोग आणि NITI आयोग |
11 फेब्रुवारी 2024 | भारतीय राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत |
12 फेब्रुवारी 2024 | महागाईचे प्रकार आणि कारणे |
13 फेब्रुवारी 2024 | श्वसन संस्था |
14 फेब्रुवारी 2024 | अलैंगिक प्रजनन |
15 फेब्रुवारी 2024 | सातवाहन कालखंड |
16 फेब्रुवारी 2024 | बिरसा मुंडा |
17 फेब्रुवारी 2024 | पंचायत राज समित्या |
18 फेब्रुवारी 2024 | कोळी,भिल्ल व रामोश्यांचे बंड |
19 फेब्रुवारी 2024 | 1991 च्या आर्थिक सुधारणा |
20 फेब्रुवारी 2024 | जगन्नाथ शंकरशेठ |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.