Table of Contents
MSRTC धुळे भरती 2023
MSRTC धुळे भरती 2023: विभाग नियंत्रक, रा.प. धुळे यांनी “चालक तथा वाहक (प्रशिक्षणार्थी)” संवर्गातील एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी MSRTC धुळे भरती 2023 जाहीर केली आहे. सदर भरती ही फक्त अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी आहे. MSRTC धुळे भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात MSRTC धुळे भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि अर्ज प्रकिया याबद्दल आपण माहिती पाहणार आहे.
MSRTC धुळे भरती 2023: विहंगावलोकन
MSRTC धुळे भरती 2023 अंतर्गत “चालक तथा वाहक (प्रशिक्षणार्थी)” पदांची भरती होणार आहे. MSRTC धुळे भरती 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.
MSRTC धुळे भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
कार्यालय | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ, धुळे विभाग |
भरतीचे नाव | MSRTC धुळे भरती 2023 |
पदाचे नाव |
चालक तथा वाहक (प्रशिक्षणार्थी) |
एकूण रिक्त पदे | 50(फक्त अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी) |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
नोकरीचे ठिकाण | धुळे जिल्हा |
अधिकृत संकेतस्थळ | https://dhule.gov.in/ |
MSRTC धुळे भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा
MSRTC धुळे भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासू शकतात.
MSRTC धुळे भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
MSRTC धुळे भरती 2023 ची अधिसूचना | 06 ऑक्टोबर 2023 |
MSRTC धुळे भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 07 ऑक्टोबर 2023 |
MSRTC धुळे भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 ऑक्टोबर 2023 |
MSRTC धुळे भरती 2023 अधिसूचना
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ, धुळे विभाग अंतर्गत चालक तथा वाहक (प्रशिक्षणार्थी) संवर्गातील एकूण 50 रिक्त पदांच्या भरतीसाठी MSRTC धुळे भरती 2023 जाहीर झाली असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. MSRTC धुळे भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MSRTC धुळे भरती 2023 अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MSRTC धुळे भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष
MSRTC धुळे भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा पात्रता, दृष्टी, शारीरिक पात्रता आणि वाहन चालविण्याचा परवाना याबद्दल सविस्तर माहिती खालील तक्त्यात दिली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा | दृष्टी | शारीरिक पात्रता (उंची) | वाहन चालविण्याचा परवाना |
चालक तथा वाहक (प्रशिक्षणार्थी) | 10 वी उत्तीर्ण | 21 ते 43 वर्षे | चष्मा विरहीत 6/6 निर्दोष दृष्टी |
|
अथवा
|
MSRTC धुळे भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क
MSRTC धुळे भरती 2023 साठी उमेदवाराने भरती प्रक्रिया शुल्क म्हणून रुपये 250/- मात्र एम. एस. आर. टी. सी. फंड अंकाऊन्ट, धुळे या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा मागणी धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट)/ पोस्टल ऑर्डर अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया शुल्क इतर कोणत्याही स्वरुपात स्विकारले जाणार नाही.
MSRTC धुळे भरती 2023 अर्ज प्रकिया
MSRTC धुळे भरती 2023 अंतर्गत एकूण 50 चालक तथा वाहक (प्रशिक्षणार्थी) पदांची भरती होणार आहे. MSRTC धुळे भरती 2023 साठी ऑफलाईन पद्धीतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याच्या सूचना खाली दिलेल्या आहेत.
- अर्ज विहीत नमुन्यात सर्व दृष्टीने पूर्ण असावा. अपूर्ण माहिती दिली असल्यास किंवा आवश्यक ते प्रमाणीत दाखले जोडले नसल्यास अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- अलीकडच्या काळात काढलेले पासपोर्ट आकारातील स्वतःचे छायाचित्र स्व-स्वाक्षरीसह अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी चिकटवावे.
- पत्र व्यवहाराचा पत्ता आणि कायमस्वरूपी पत्ता सुस्पष्ट व पोष्टाचा पिनकोडसह व्यवस्थित वाचता येईल, असा लिहावा.
- उमेदवाराने अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक अर्हता पासची गुणपत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना, जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या दाखल्याच्या साक्षांकित प्रती स्पष्ट दिसतील अशा स्वरुपात जोडणे आवश्यक आहे.
- उमेदवारांने समक्ष अथवा योग्य त्या साधानाद्वारे (टपालाने) अर्ज पाठवावा. टपालाद्वारे पाठविलेले अर्ज विहीत मुदतीत प्राप्त होतील अशा बेताने पाठविण्यात यावे. टपाल खात्यामुळे अर्ज वेळेत प्राप्त न झाल्यास त्यांस रा.प. महामंडळ जबाबदार राहणार नाही.
MSRTC धुळे भरती 2023: विद्यावेतन
MSRTC धुळे भरती 2023 अंतर्गत उमेदवारास रु. 450 प्रतिमाह एवढे विद्यावेतन अनुज्ञेय राहील.
पदाचे नाव | विद्यावेतन |
कोतवाल | रु. 450 प्रतिमाह |
MSRTC धुळे भरती 2023 अर्ज पाठविण्याचा पत्ता
MSRTC धुळे भरती 2023 साठी ऑफलाईन पद्धीतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर टपालाने अर्ज पाठवायचे आहेत.
पत्ता: विभाग नियंत्रक, म.रा. मा.प. महामंडळ, विभागीय कार्यालय, दक्षता पेट्रोल पंप समोर, पालेशा कॉलेज जवळ, संतोषी माता मंदिर रोड, धुळे ता. जि. धुळे : 424001
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.