Table of Contents
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ?
सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील ही अत्यंत मुद्देसूद सिरीज आहे. पाठ्यपुस्तक अभ्यास प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण आणि महत्वाची भूमिका बजावत असतात.जर विद्यार्थ्याला आपल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करायची असेल, तर आपल्याला शाळेनंतर स्वत: चा अभ्यास देखील सुरू करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांना महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यास करण्यासाठी ADDA 247 खास तुमच्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज घेऊन आलो आहे. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी ADDA247 च्या माध्यमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे. या सिरीज मधून संपूर्ण परीक्षाभिमुख अभ्यास साहित्य प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज उपयुक्त तसेच यशदायक ठरेल व याने तुमचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास नक्कीच बळ मिळेल. चला तर मग आजचा टॉपिक अभ्यासूया.
Title | अँप लिंक | वेब लिंक |
महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | लिंक | लिंक |
मुळशी सत्याग्रह
- असहकार आंदोलनातील पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून ‘मुळशी सत्याग्रह‘ याकडे पाहिले जाते.
- मुळा-मुठा या नट्यांच्या संगमावर टाटा कंपनी धरण आणि जलविद्युत प्रकल्प हाती घेणार होती.
- त्यामुळे ५४ गावे पाण्याखाली जाणार होती.
- या कंपनीने इंग्रज सरकारच्या बरोबर केलेल्या करारामध्ये कंपनीने येथील जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचा काहीही विचार केला नाही.
- त्यांच्या चरितार्थाची दुसरी व्यवस्थाही केली नाही.
- तेव्हा शंकरराव देव, शिवरामपंत परांजपे, डॉ. फाटक, भोपटकर, तात्यासाहेब केळकर इत्यादींनी या प्रकरणी लक्ष देऊन हे प्रकरण महात्मा गांधींना सांगितले.
- तेव्हा मुळशी प्रकल्प सत्याग्रहाच्या मार्गाने सोडवण्याचे ठरवण्यात आले.
- शंकरराव देव हे मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जातात.
- तर सेनापती बापट यांनीही यावेळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
- १६ एप्रिल १९३१ रोजी मुळा नदीच्या पात्रात सत्याग्रहास सुरुवात झाली.
- सत्याग्रहींनी १२ दिवस धरणाच्या बांधकामाला अहिंसात्मक प्रतिकार केला.
- सेनापती बापट यांनी सत्याग्रह मंडळाचे काम हाती घेतले.
- त्यांच्या नेतृत्वामुळे मुळशी सत्याग्रहाला काहीसे उग्र वळण लागले. ते दडपण्याचे अनेक प्रयत्न झाले.
- इ. स. १९२१ ते १९२४ अशी तीन वर्षे हा सत्याग्रह चालू होता.
- हजारो सत्याग्रही तुरुंगात डांबले गेले.
- सेनापती बापट यांना प्रक्षोभक भाषणाबद्दल इ. स. १९२३ मध्ये एक वर्षाची शिक्षा झाली.
- तर इ. स. १९२३ मध्ये इंजिन ड्रायव्हरवर गोळ्या झाडल्यामुळे सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली.
- त्यानंतर सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल तीन महिन्यांची शिक्षा झाली.