Table of Contents
मुंबई पोलीस भरती 2023
मुंबई पोलीस भरती 2023: मुंबई पोलीस दलात लवकरच 3000 पदांची भरती होणार आहे. सदर भरती ही कंत्राटी तत्वावर होणार असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर केला आहे. मुंबई पोलीस दलात मनुष्यबळ कमी पडत असल्या कारणाने मुंबई पोलीस भरती 2023 अंतर्गत 3000 पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. या लेखात आपण मुंबई पोलीस भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मुंबई पोलीस भरती 2023: विहंगावलोकन
मुंबई पोलीस भरती 2023 लवकरच जाहीर होणार असून मुंबई पोलीस भरती 2023 बद्दल संक्षिप्त आढावा खालील तक्त्यात देण्यात आला आहे.
सहायक प्राध्यापक भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | मुंबई पोलीस |
भरतीचे नाव | मुंबई पोलीस भरती 2023 |
पदाचे नाव |
पोलीस शिपाई |
एकूण रिक्त पदे | 3000 (अपेक्षित) |
मुंबई पोलीस भरती 2023 अधिसूचना | लवकरच जाहीर होईल |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अधिकृत संकेतस्थळ |
https://mumbaipolice.gov.in/
|
मुंबई पोलीस भरती 2023 बद्दल अद्ययावत माहिती
मुंबई पोलीस भरती 2023: मुंबई हे राज्यातील तसेच देशातील एक आघाडीचे शहर आहे. दिवसेंदिवस या शहरात आधुनिकीकरण वाढत चालले आहे आणि त्या सोबतच या शहराची लोकसंख्यादेखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सहाजिकच गुनेगारीचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलावर कामाचा ताण वाढला असून मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. यावर उपाय म्हणून मुंबई पोलीस आयुक्तालयावर 3000 मनुष्यबळाच्या सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य गृह विभागाने दिलेल्या माहिती नुसार, मुंबई पोलीस दलाची मंजूर पदसंख्या ही 40,623 असून त्यातील शिपाई आणि चालक पदाच्या 10000 जागा रिक्त आहेत. त्यातील 7076 जागांची भरती प्रक्रिया चालू असून त्यांना ट्रेनिंग पूर्ण होऊन कामावर रुजू होई पर्यंत 2 वर्ष इतका वेळ लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून 3000 मनुष्यबळ हे 11 महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
मुंबई पोलीस भरती 2023 चा शासन निर्णय
मुंबई पोलीस भरती 2023 चा शासन निर्णय: महाराष्ट्र शासन गृह विभागाने दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई पोलीस भरती 2023 चा शासन निर्णय निर्गमित केला.
11 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झालेला मुंबई पोलीस भरती 2023 चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
मुंबई पोलीस भरती 2023 शासन निर्णय (24 जुलै 2023)
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुपमहाराष्ट्राचा महापॅक