Marathi govt jobs   »   Study Materials   »   महानगरपालिका
Top Performing

महानगरपालिका: रचना, कार्ये व इतर माहिती | अन्न व नागरी पुरवठा भरतीसाठी अभ्यास साहित्य

महानगरपालिका: रचना, कार्ये व इतर माहिती

महानगरपालिका: महाराष्ट्र राज्यात 1949 च्या बॉम्बे प्रोव्हिन्शिअल म्युनिसिपल कार्पोरेशन ॲक्ट नुसार 1950 पर्यंत मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका अस्तित्वात होती. आगामी काळातील अन्न व नागरी पुरवठा भरती 2023 मध्ये राज्यशास्त्र या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत. मोठ्या शहरांच्या दृष्टीने महानगर पालिका हा घटक खूप महत्त्वाचा आहे. या वर हमखास प्रश्न विचारले जातात. या लेखात आपण महानगरपालिका: रचना, कार्ये या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

महानगरपालिका: विहंगावलोकन

महानगर पालिका: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय राज्यशास्त्र
उपयोगिता अन्न व नागरी पुरवठा भरती परीक्षा
लेखाचे नाव महानगरपालिका: रचना, कार्ये व इतर माहिती
लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • महानगरपालिका
  • रचना
  • कार्ये

महानगरपालिकेची रचना

  • ज्या नगरपालिका क्षेत्रांची लोकसंख्या 5 लाखाच्या पुढे जाते, त्या क्षेत्रात महानगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाद्वारे घेतला जातो.
  • क्षेत्रातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार महानगरपालिकेचे चार गटांमध्ये विभाजन केले आहे.
  • महानगरपालिकेच्या सदस्यांची संख्या क्षेत्रातील लोकसंख्येनुसार किमान 65 ते कमाल 221 इतकी असते.
  • महानगरपालिकेचा कार्यकाल 5 वर्षे इतका असतो. दर 5 वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणुका होतात.
  • महानगरपालिकेच्या सदस्यांना नगरसेवक असे म्हणतात.

महापौर

  • महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात. तसेच ते महानगरपालिकेचे कार्यकारी प्रमुख देखील असतात.
  • महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाल अडीच वर्षे इतका असतो.
  • महापौरांना आपला राजीनामा द्यायचा असेल तर तो विभागीय आयुक्त यांना द्यावा लागतो.

महानगरपालिकेची कार्ये:

महानगपालिका आपल्या क्षेत्रात नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवण्यापासून इतर सर्व कार्ये करत असते. तिच्या कार्यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो:

सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य सेवा पुरवणे

सार्वजनिक पाणी पुरवठा करणे

नाले सफाई, रोगराई निर्मुलन करणे

लहान मुलांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे

आपल्या क्षेत्रातील लोकांच्या जन्म -मृत्यूची नोंद ठेवणे इ.

महाराष्ट्रातील महानगर पालिकांची यादी

महाराष्ट्रातील महानगर पालिकांची यादी: महाराष्ट्रातील महानगर पालिकेची यादी खालील तक्त्यात दिली आहे.

अ. क्र. नाव जिल्हा स्थापना
1 बृहन्मुंबई महानगरपालिका / BMC मुंबई शहर जिल्हा,
मुंबई उपनगर जिल्हा
1888
2 ठाणे महानगरपालिका / Thane Municipal Corporation ठाणे 01ऑक्टोबर 1982
3 कल्याण-डोंबिवली महानगरपालिका / Kalyan-Dombivali Municipal Corporation ठाणे 01 ऑक्टोबर 1983
4 मीरा-भाईंदर महानगरपालिका / Mira Bhayander Municipal Corporation ठाणे 28 फेब्रुवारी 2002
5 भिवंडी-निजामपूर महानगरपालिका / Bhiwandi-Nizampur Municipal Corporation ठाणे 16 डिसेंबर 2001
6 नवी मुंबई महानगरपालिका / Navi Mumbai Municipal Corporation ठाणे 01 जानेवारी 1992
7 उल्हास नगर महानगरपालिका / Ulhas Nagar Municipal Corporation ठाणे 1998
8 पनवेल महानगरपालिका / Panvel Municipal Corporation रायगड 01 ऑक्टोबर 2016
9 वसई-विरार महानगरपालिका / Vasai-Virar Municipal Corporation पालघर 03 जुलै 2009
10 पुणे महानगरपालिका / Pune Municipal Corporation पुणे 15 फेब्रुवारी 1950
11 पिंपरी -चिंचवड महानगरपालिका / Pimpri-Chinchwad Municipal Corporation पुणे 11 ऑक्टोबर 1982
12 सोलापूर महानगरपालिका / Solapur Municipal Corporation सोलापूर 01 मे 1964
13 कोल्हापूर महानगरपालिका / Kolhapur Municipal Corporation कोल्हापूर 15 डिसेंबर 1972
14 सांगली-मिरज-कुपवाडा महानगरपालिका / Sangli-Miraj-Kupwada Municipal Corporation सांगली 09 फेब्रुवारी 1998
15 इचलकारंजी महानगरपालिका / Ichalkaranji Municipal Corporation कोल्हापूर 05 मे 2022
16 नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal Corporation नाशिक 07 नोव्हेंबर 1982
17 मालेगाव महानगरपालिका / Malegaon Municipal Corporation नाशिक 17 डिसेंबर 2001
18 अहमदनगर महानगरपालिका / Ahamednagar Municipal Corporation अहमदनगर 30 जून 2003
19 धुळे महानगरपालिका / Dhule Municipal Corporation धुळे 30 जून 2003
20 जळगाव महानगरपालिका / Jalgaon Municipal Corporation जळगाव 21 मार्च 2003
21 औरंगाबाद महानगरपालिका / Aurangabad Municipal Corporation औरंगाबाद 08 डिसेंबर 1982
22 परभणी महानगरपालिका / Parbhani Municipal Corporation परभणी 01 नोव्हेंबर 2011
23 लातूर महानगरपालिका / Latur Municipal Corporation लातूर 25 ऑक्टोबर 2011
24 नांदेड – वाघाळा महानगरपालिका / Nanded – Waghala Municipal Corporation नांदेड 26 मार्च 1997
25 अमरावती महानगरपालिका / Amravati Municipal Corporation अमरावती 15 ऑगस्ट 1983
26 अकोला महानगरपालिका / Akola Municipal Corporation अकोला 01 ऑक्टोबर 2001
27 नागपूर महानगरपालिका / Nagpur Municipal Corporation नागपुर 02 मार्च 1951
28 चंद्रपूर महानगरपालिका / Chandrapur Municipal Corporation चंद्रपुर 25 ऑक्टोबर 2011

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

 

 

Sharing is caring!

महानगरपालिका: रचना, कार्ये व इतर माहिती | अन्न व नागरी पुरवठा भरतीसाठी अभ्यास साहित्य_4.1

FAQs

महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाल किती असतो?

महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाल अडीच वर्षे इतका असतो.

महानगरपालिकेचा कार्यकाल किती असतो?

महानगरपालिकेचा कार्यकाल 5 वर्षे इतका असतो.

महानगरपालिका बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

हानगरपालिका बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.