Marathi govt jobs   »   Study Materials   »   नगर पालिका

नगर पालिका: रचना, समित्या व इतर माहिती | अन्न व नागरी पुरवठा भरतीसाठी अभ्यास साहित्य

नगरपालिका: रचना, समित्या व इतर माहिती

नगरपालिका: रचना, समित्या व इतर माहिती: नगर पालिका हा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आगामी काळातील अन्न व नागरी पुरवठा भरती 2023 मध्ये राज्यशास्त्र या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत. शहरांच्या दृष्टीने नगर पालिका हा घटक खूप महत्त्वाचा आहे. या वर हमखास प्रश्न विचारले जातात. या लेखात आपण नगर पालिका: रचना, समित्या या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नगरपालिका: विहंगावलोकन

नगर पालिका: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय राज्यशास्त्र
उपयोगिता अन्न व नागरी पुरवठा भरती परीक्षा
लेखाचे नाव नगरपालिका: रचना, समित्या व इतर माहिती
लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • नगरपालिका
  • रचना
  • समित्या

नगरपालिका

महाराष्ट्र राज्यातील नगर पालिकांचे कार्य हे 1965 च्या नगरपालिका कायद्यानुसार चालते. 15,000 हून अधिक व 3,00,000 कमी लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात नगरपालिकेची निर्मिती करण्यात येते.

नगरपालिकांचे वर्गीकरण

क्षेत्रातील लोकसंख्येच्या आधारावर नगरपालिकांचे 3 वर्गात वर्गीकरण करण्यात आले आहे.

अ.क्र. नगरपालिकांचा वर्ग लोकसंख्या
1. अ वर्ग 1,00,000 पेक्षा जास्त
2. ब वर्ग 40,000 ते 1,00,000
3. क वर्ग 40,000 पेक्षा कमी

नगरपालिकेची रचना

  • सदस्य संख्या: लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नगरपालिकेची सदस्यसंख्या किमान 16 ते कमाल 65 इतकी असते.
  • नगरपालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना ‘नगरसेवक’ असे म्हणतात.
  • नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी उमेदवाराने वयाची 21 वर्षे पूर्ण केलेली असावीत.
  • नगरपालिकेच्या सदस्यांचा कार्यकाल 5 वर्षे इतका असतो.
  • नगराध्यक्ष हा नगरपालिकेचा प्रमुख असतो.
  • नगराध्यक्षांचा कार्यकाल हा 5 वर्ष तर उपनगराध्यक्षांचा कार्यकाल हा अडीच वर्षे इतका असतो.
  • नगराध्यक्ष आपला राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे देतात.

नगरपालिकेच्या समित्या

अ व ब वर्गातील नगरपालिकांमध्ये प्रशाकीय सोयीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या असतात. त्यातील स्थायी समिती ही सर्वात महत्त्वाची समिती आहे.

स्थायी समिती:

  • स्थायी समितीमध्ये एकूण 9 सदस्य असतात.
  • स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष हा नगराध्यक्ष असतो.
  • महिन्यातून किमान एकदा स्थायी समितीची सामान्य सभा होते.

नगर पालिकेच्या इतर समित्या:

  • सार्वजनिक बांधकाम समिती
  • शिक्षण समिती
  • स्वच्छता विषयक, वैद्यकीय आणि आरोग्य समिती
  • पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती
  • नियोजन व विकास समिती
  • महिला व बालकल्याण समिती

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र राज्यातील नगर पालिकांचे कार्य कोणत्या कायद्यानुसार चालते?

महाराष्ट्र राज्यातील नगर पालिकांचे कार्य हे 1965 च्या नगरपालिका कायद्यानुसार चालते.

कोण नगरपालिकेचा प्रमुख असतो?

नगराध्यक्ष हा नगरपालिकेचा प्रमुख असतो.

नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात?

नगराध्यक्ष आपला राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे देतात.