Table of Contents
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023: महाराष्ट्र नगर परिषद संचालनालयाने दिनांक 31 ऑक्टोबर 2023 च्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिनांक 02 व 03 नोव्हेंबर 2023 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क, महाराष्ट्र नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट क व महाराष्ट्र नगरपरिषद लेखापाल/लेखापरीक्षक या संवर्गाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नगर परिषद संचालनालयाने दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 जाहीर केली होती. नगर परिषद संचालनालयाने एकूण 1782 रिक्त पदांचा भरतीसाठी नगर परिषद भरती 2023 जाहीर केली होती. आता नगर परिषद वेळापत्रक 2023 जाहीर करण्यात आले आहे. आज आपण या लेखात नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली असून त्यासंबंधी नगर परिषद संचालनालयाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. या लेखात नगर परिषद वेळापत्रकाबद्दल माहिती देण्यात आली आहे.
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संचालनालय | महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय |
भरतीचे नाव | नगर परिषद भरती 2023 |
सेवा |
|
एकूण रिक्त पदे | 1782 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
लेखाचे नाव | नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 |
परीक्षेची तारीख | 09 नोव्हेंबर 2023 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahadma.maharashtra.gov.in |
नगर परिषद भरती 2023
नगर परिषद भरती 2023: महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकेमध्ये गट क संवर्गातील एकूण 1782 रिक्त पदाच्या भरतीसाठी 13 जुलै 2023 रोजी नगर परिषद भरती 2023 जाहीर झाली होती. नगर परिषद भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
नगर परिषद परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाली असून नगर परिषद भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
नगर परिषद भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
नगर परिषद भरती 2023 अधिसूचना | 13 जुलै 2023 |
नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 13 जुलै 2023 |
नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 ऑगस्ट 2023 |
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 1 | 25 ऑक्टोबर 2023 ते 03 नोव्हेंबर 2023 |
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 2 | 09 नोव्हेंबर 2023 |
नगर परिषद निकाल 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
नगर परिषद शुद्धिपत्रक (31 ऑक्टोबर 2023)
महाराष्ट्र नगर परिषद संचालनालयाने दिनांक 31 ऑक्टोबर 2023 च्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिनांक 02 व 03 नोव्हेंबर 2023 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क, महाराष्ट्र नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट क व महाराष्ट्र नगरपरिषद लेखापाल/लेखापरीक्षक या संवर्गाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून अधिकृत प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करू शकतात.
नगर परिषद प्रसिद्धीपत्रक (31 ऑक्टोबर 2023) डाउनलोड लिंक
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023: पदानुसार वेळापत्रक
नगर परिषद परीक्षेचे पदानुसार वेळापत्रक दि. 16 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झाले आहे. 16 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झालेले संवर्गनिहाय वेळापत्रकाचे प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
नगर परिषद संवर्ग निहाय वेळापत्रक 2023 (16 ऑक्टोबर 2023 चे प्रसिद्धीपत्रक)
नगर परिषद भरती परीक्षेचे स्वरूप व परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
नगर परिषद भरती 2023 मधील सर्व पदांसाठी मध्ये दोन पेपर आहेत यात पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा समावेश आहेत. तर पेपर 2 हा विषयाशी संबंधित ज्ञानावर आधारित आहे. नगर परिषद परीक्षेत एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत. परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असतील. नगर परिषद भरती परीक्षेचे स्वरूप व परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
नगर परिषद भरती 2023 बद्दल इतर लेख
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |