Table of Contents
Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment 2021: आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर (Nagpur Municipal Corporation (NMC)) अंतर्गत विविध पदे भरण्यात येत आहेत. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात, कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूरची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, ऑफलाईन अर्जाचा नमुना, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.
Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment 2021 | नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021
Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment 2021: आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर (Nagpur Municipal Corporation (NMC)) अंतर्गत विशेषज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, स्टाफ नर्स, आरोग्य सेविका या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने अधिसूचना जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिनांक 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज पाठवू शकतात. या लेखात, Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment 2021 चा सर्व तपशील नमूद आहेत.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली
Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment 2021 Notification | नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021- अधिसूचना
Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment 2021- Notification: दिनांक 22 ऑक्टोबर 2021 रोजी आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर (Nagpur Municipal Corporation (NMC)) अंतर्गत विविध पदांची अधिसूचना जाहीर झाली. विशेषज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, स्टाफ नर्स, आरोग्य सेविका या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना व अर्ज करायचा नमुना आपल्यला खाली दिलेल्या लिंक क्लिक करून पाहता येईल.
नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021 pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment 2021- Important Dates | नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021- महत्वाच्या तारखा
Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment 2021- Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.
Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment 2021: Important Dates | |
Events | Dates |
नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती- अधिसूचना | 22 ऑक्टोबर 2021 |
अर्ज स्वीकारण्याची सुरवातीची तारीख | 22 ऑक्टोबर 2021 |
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख | 02 नोव्हेंबर 2021 |
मुलाखतीची तारीख | लवकरच जाहीर येईल |
Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment 2021- Vacancies | नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021- रिक्त जागांचा तपशील
Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment 2021- Vacancies: नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021 ने खालील पदांसाठी एकूण 77 जागा जाहीर केल्या आहेत. तक्त्यात खाली दिलेल्या पोस्टनिहाय रिक्त जागेचा तपशील देण्यात आला आहे.
Sr. No | Post / पदाचे नाव | No of Vacancies / रिक्त पदांची संख्या |
1 | विशेषज्ञ | 07 |
2 | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 08 |
3 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 24 |
4 | औषध निर्माता | 02 |
5 | स्टाफ नर्स | 24 |
6 | आरोग्य सेविका | 12 |
एकूण | 77 |
NMC Recruitment 2021- Eligibility Criteria | NMC अंतर्गत पदभरती 2021- पात्रता निकष
Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment 2021- Eligibility Criteria: म.न.पा. नागपूर (Nagpur Municipal Corporation (NMC)) अंतर्गत विशेषज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, स्टाफ नर्स, आरोग्य सेविका या सर्व पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.
अ. क्र. | पद | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
1 | विशेषज्ञ | M.D (बालरोगतज्ज्ञ / स्त्रीरोगतज्ज्ञ) DGO / DCH/ DA | 17 ते 45 (सेवानिवृत्त शासकीय अधिकारी असल्यास कमाल वय 70) |
2 | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | MBBS, मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य | |
3 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | B.Sc, MLT/DMLT, Maharashtra State Education Technical Board यांचे प्रमाणपत्र, संगणकाचे ज्ञान आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य |
खुला प्रवर्ग 18 ते 38
मागास प्रवर्ग 18 ते 43 |
4 | औषध निर्माता | 12 वी (फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी) B. Pharm, फार्मसी कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य | |
5 | स्टाफ नर्स | B.Sc. (Nursing) किंवा GNM नर्सिंग कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य | |
6 | आरोग्य सेविका | 10 वी व ANM, ANM नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य |
NMC Recruitment 2021- Monthly Salary | NMC अंतर्गत पदभरती 2021- महिन्याचे मानधन
NMC Recruitment 2021- Monthly Salary: म.न.पा. नागपूर (Nagpur Municipal Corporation (NMC)) अंतर्गत विशेषज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, स्टाफ नर्स, आरोग्य सेविका या सर्व पदांसाठी मिळणारे एकूण मानधन खालील तक्त्यात दिले आहे.
अ. क्र. | पद | एकूण मानधन (रु) |
1 | विशेषज्ञ | 75000 |
2 | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 60000 |
3 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 17000 |
4 | औषध निर्माता | 17000 |
5 | स्टाफ नर्स | 20000 |
6 | आरोग्य सेविका | 18000 |
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या रिक्त पदसंख्येत वाढ
Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment 2021- Fee | नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021- फी
Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment 2021- Fee and Address: नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021 साठी कोणतीही फी नाही आहे. फक्त ऑफलाईन अर्ज करायचा आहे.
NMC Recruitment 2021- Address for Sending Application | NMC अंतर्गत पदभरती 2021- अर्ज पाठवायचा पत्ता
NMC Recruitment 2021- Address for Sending Application: नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करायचा नमुना वर दिलेल्या pdf मध्ये आहे. त्याची प्रिंट काढून तो अर्ज भरावा आणि खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
अर्ज पाठवायचा पत्ता: कॉपोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर सोसायटी, आरोग्य विभाग सिव्हील लाईन्स, महानगरपालिका नागपूर – 440001
Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment 2021-
Terms and Condition | नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021- अटी व शर्ती
Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment 2021- Terms and Condition: नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021 ऑफलाईन आज सादर करावयाच्या काही अटी व शर्ती आहेत. ज्याचे पालन प्रत्येक आवेदन करण्याऱ्या उमेदवारास करायचे आहे. त्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे.
- अनुभवाच्या बाबतीत फक्त शासकिय, निम शासकिय स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- उमेद्वारांनी जाहिरातीत नमुद पदासाठी स्वतंत्रपणे पदनिहाय मुलाखतीकरिता सकाळी वाजता सर्व आवश्यक दस्तावेजांसह उपस्थित राहावे. सदरील पदे हि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत निव्वळ कंत्राटी स्वरुपाची राहतील. त्यांचा नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसलाही संबंध राहणार नाही. पदांसाठीचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
- वरील सर्व पदे ही कंत्राटी पध्दतीने भरण्यात येत असल्याने त्यास नागरी सेवा नियम लागू होणार नाही.
- एकूण पदांच्या संख्येत अथवा आरक्षणामध्ये बदल होवू शकतो.
- सदरील पदे ही निव्वळ कंत्राटी पध्दतीने केवळ प्रकल्प कालावधी पूरते भरावयाचे असून प्रकल्प बंद होताच सदर पदे आपोआप संपुष्टात येतील.
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेद्वारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीस पात्र उमेद्वाराने मुलाखतीकरीता खालील आवश्यक कागदपत्रे सत्यप्रत (Original) व साक्षांकीत (xerox) प्रतींचा एक संच या सह उपस्थित राहावे. (नुकताच काढलेला पासपोर्ट साईझ फोटो -1 व स्वतःचा ई-मेल व दुरध्वनी क्रमांक, अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र, जन्म तारखेचे प्रमाणपत्र (शाळा/ महाविद्यालय सोडण्याचे प्रमाणपत्र / जन्माचे प्रमाणपत्र), ओळखपत्र आधार कार्ड/ मतदान कार्ड / ड्रायव्हींग लायसंस, पदाकरीता लागणारी मुळ शैक्षणिक अर्हतेची अंतिम वर्षाची गुणपत्रीका व पदानुसार शासनातर्फे प्राप्त रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, पदाकरीता लागणारी मुळ शैक्षणिक अर्हतशिवाय प्राप्त पदव्युत्तर पदवी (PG Degree) आणि पदव्युत्तर पदवीका (PG Diploma) प्रमाणपत्र.)
IBPS Clerk 2021 अधिसूचना जाहीर | IBPS Clerk 2021 Notification Out
- उच्च शैक्षणीक अर्हता धारकांस व अनुभव असलेल्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाईल.
- कोणत्याही वेळेस भरती अथवा निवड प्रक्रिया रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार निवड समिती एन.यु.एच. एम. म.न.पा. नागपूर यांना राहतील त्यावर कोणतीही हरकत/आक्षेप घेता येणार नाही.
- आवेदन पत्र स्विकृत / अस्विकृत करण्याचे अधिकार, निवड प्रक्रियेत वेळेवर बदल करण्याचे तसेच त्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याबाबतचे संपूर्ण अधिकार अध्यक्ष निवड समिती तथा आयुक्त म.न.पा. नागपूर यांचेकडे राखून ठेवलेले आहे.
- उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास त्यांना मुलाखतीस व नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल.
- मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- अर्जाच्या छाननीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल,
- निवड झालेल्या उमेदवाराने रुजू होतांना विहीत नमुन्यात रुपये १००/- च्या बॉन्डपेपरवर करारनामा करून दयावा लागेल. (सेवेदरम्यान करारनाम्याच्या अटी काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील)
- पदाकरीता बिंदू नामावलीनुसार राखीव प्रवर्गास अनुसरुन पदभरती जाहिरात दिल्यानंतर पुढील प्रक्रियेव्दारे अपेक्षित राखीव प्रवर्गाचे उमेदवार पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध न झाल्यास रिक्त पदांच्या भरतीची आवश्यकता लक्षात घेऊन व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कालमर्यादेत राबविण्याचे अभियान आहे ही बाब लक्षात घेऊन ११ महिने कालावधीसाठी प्रतिक्षा यादीतील निवड केलेल्या खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांना तात्पुरती नियुक्ती देण्यात येईल. IBPS PO 2021 Notification Out
IBPS PO 2021 अधिसूचना जाहीर | IBPS PO 2021 Notification Out
FAQs Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment 2021
Q1. नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?
Ans. नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख 22 ऑक्टोबर 2021 आहे
Q2. नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
Ans. नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2021 आहे
Q3. नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021 अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?
Ans. नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021 अधिसूचनेनुसार 77 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
Q4. नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021 अर्ज करण्याची फी किती आहे?
Ans. नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021 अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही.