18 जुलै: आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे 18 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाहीसाठी संघर्ष आणि जगभरातील शांतता वाढविण्यात नेल्सन मंडेला यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळण्यात येतो. 18 जुलै 2009 रोजी न्यूयॉर्कमध्ये प्रथम मंडेला दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र महासभेने 10 नोव्हेंबर 2009 रोजी एक ठराव संमत करून 18 जुलैला “आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस” म्हणून घोषित केले.
नेल्सन मंडेला यांच्याविषयी:
- नेल्सन रोलीहल्लाला मंडेला यांचा जन्म 18 जुलै, 1918 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या ट्रान्सकी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव नॉनकाफी नासेकेनी आणि वडीलांचे नाव नोकोसी मफकॅनिस्वा गाडला मंडेला असे होते.
- 1944 मध्ये त्यांनी आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि एएनसी यूथ लीग (एएनसीवायएल) स्थापन करण्यात योगदान दिले.
- 1993 मध्ये नेलसन मंडेला आणि फ्रेडरिक विलेम डी क्लार्क यांना संयुक्तपणे ‘शांततेच्या मार्गाने रंगभेद संपुष्टात आणण्यासाठी आणि दक्षिण आफ्रिकेत लोकशाही चा पाया घालण्यासाठी नोबेल शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
- मंडेला 1999 मध्ये राजकारणातून निवृत्त झाले. त्यांच्या राहत्या घरी जोहान्सबर्ग येथे 5 डिसेंबर 2013 त्यांचे निधन झाले.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो