Table of Contents
NHM उस्मानाबाद भरती 2023
NHM उस्मानाबाद: NHM उस्मानाबाद अंतर्गत “कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, लॅब टेक्निशियन” च्या विविध रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. पदे भरण्यासाठी एकूण 30 रिक्त जागा उपलब्ध आहेत. फॉर्म सबमिट करताना अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.
NHM उस्मानाबाद 2023: विहंगावलोकन
इच्छुक उमेदवारांसाठी, आम्ही NHM उस्मानाबाद भरती 2023 चे संपूर्ण विहंगावलोकन प्रदान केले आहे जसे की नोकरीचे स्थान, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, रिक्त जागा इ. विहंगावलोकन सारणी NHM उस्मानाबाद 2023 चा सारांश खालील तक्त्यात प्रदान केला आहे.
NHM उस्मानाबाद भरती 2023 : विहंगावलोकन | |
संघटना | राष्ट्रीय आरोग्य अभियान |
भरतीचे नाव | NHM उस्मानाबाद भरती 2023 |
पदाचे नाव | कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
पदसंख्या | 30 जागा |
नोकरी ठिकाण | उस्मानाबाद |
अधिसूचना | NHM उस्मानाबाद भरती 2023 |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 ऑक्टोबर 2023 |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रूम नंबर 218, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद |
अधिकृत संकेतस्थळ | www.osmanabad.gov.in |
NHM उस्मानाबाद भरती 2023 महत्वाच्या तारखा
NHM उस्मानाबाद भरती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 13 ऑक्टोबर 2023 पर्यन्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज आवश्यक कागदपत्रासह राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, उस्मानाबाद येथे सबमिट करायचे आहे.
कार्यक्रम | तारीख |
अर्ज सुरू करण्याची तारीख | 05 ऑक्टोबर 2023 |
अर्ज करण्याची शेवठची तारीख | 13 ऑक्टोबर 2023 |
NHM उस्मानाबाद भरती 2023 अधिसूचना
जाहीरातीमधील पदे ही राज्य शासनाची नियमीतची पदे नसून सदरील पदे निव्वळ कंत्राटी स्वरुपातील आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागु राहणार नाहीत, तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही. NHM उस्मानाबाद भरती 2023 अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
NHM उस्मानाबाद भरती 2023 अधिसूचना
NHM उस्मानाबाद भरती 2023 रिक्त जागा
NHM उस्मानाबाद भरती अंतर्गत एकूण 30 पदांची अधिसूचना जाहीर झाली आहे. रिक्त जागांचा पदनिहाय तपशील पाहूया.
पदाचे नाव | पद संख्या |
कीटकशास्त्रज्ञ | 07 |
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | 09 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 14 |
एकूण | 30 |
NHM उस्मानाबाद भरती 2023 साठी शैक्षणिक पात्रता
NHM उस्मानाबाद भरती 2023 अधिसूचनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमार्यादा |
कीटकशास्त्रज्ञ | 5 वर्षांच्या अनुभवासह एम.एससी प्राणीशास्त्र | खुला 18 ते 38
राखीव 18 ते 43 |
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | आरोग्य मध्ये MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर | खुला 18 ते 38
राखीव 18 ते 43 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 12th / डिप्लोमा | खुला 18 ते 38
राखीव 18 ते 43 |
NHM उस्मानाबाद भरती 2023 अर्ज शुल्क
NHM उस्मानाबाद भरती 2023 साठी श्रेणीनिहाय अर्ज शुल्क खाली नमूद केले आहे.
NHM उस्मानाबाद भरती 2023 अर्ज फी | |
सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी | रु. 150 |
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी | रु. 100 |
NHM उस्मानाबाद भरती 2023 निवड प्रक्रिया
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) उस्मानाबाद भरती 2023 उमेदवाराची खालील निकषानुसार गुणांकन यादी तयार करण्यात येईल.
विवरण | तपशील | अधिकतम गुण |
पदासाठी आवश्यक Qualifying Exam मधील गुण (अंतीम वर्षाच्या गुणाच्या आधारे) | मिळालेल्या गुणाच्या टक्केवारीचे 50 प्रमाणे गुणोत्तर काढावे. | 50 गुण |
पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास (संबंधीत विषयामध्येच अधिकची शैक्षणिक अर्हता असल्यास विचारात घ्यावी) | अधिकतम 20 गुण मिळालेल्या गुणच्या टक्केवारीचे 20 प्रमाणे गुणोत्तर काढावे. | 20 गुण |
संबंधीत पदाशी निगडीत अनुभव | प्रत्येक 1 वर्षासाठी 6 गुण (1 वर्षाकरीता 6 गुण, जास्तीत जास्त 30 गुण) | 30 गुण |
एकूण | 100 गुण |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |