Table of Contents
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023: उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाने कोतवाल संवर्गातील एकूण 38 रिक्त पदांच्या भरतीसाठी उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 जाहीर झाली आहे. उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 03 जुलै 2023 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. या लेखात उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि अर्ज प्रकिया याबद्दल माहिती पाहणार आहे.
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023: विहंगावलोकन
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 अंतर्गत उस्मानाबाद, लोहारा, उमरगा, कळंब, परंडा, तुळजापूर आणि भूम तालुक्यात कोतवाल पदांची भरती होणार आहे. उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
कार्यालय | उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय |
भरतीचे नाव | उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 |
पदाचे नाव |
कोतवाल |
एकूण रिक्त पदे | 38 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
नोकरीचे ठिकाण | उस्मानाबाद |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा |
अधिकृत संकेतस्थळ |
https://osmanabad.gov.in/
|
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 03 जुलै 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासू शकतात.
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 ची अधिसूचना | 19 जून 2023 |
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 23 जून 2023 |
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 03 जुलै 2023 |
उस्मानाबाद कोतवाल प्रवेशपत्र 2023 | 18 आणि 19 जुलै 2023 |
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 लेखी परीक्षेची तारीख | 20 जुलै 2023 |
उस्मानाबाद कोतवाल उत्तरतालिका 2023 | 27 जुलै 2023 |
उस्मानाबाद कोतवाल भरती परीक्षेचा निकाल 2023 | 02 ऑगस्ट 2023 |
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 अधिसूचना
उस्मानाबाद जिल्यातील उस्मानाबाद, लोहारा, उमरगा, कळंब, परंडा, तुळजापूर आणि भूम या तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 23 जून 2023 ते 03 जुलै 2023 या कालावधीत अर्ज सादर करू शकतात. तालुक्यानुसार उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
तालुक्याचे नाव | अधिसूचना PDF |
उस्मानाबाद | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
लोहारा | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
उमरगा | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
कळंब | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
परंडा | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
तुळजापूर | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
भूम | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 अंतर्गत एकूण 38 कोतवाल पदांची भरती होणार आहे.
तालुक्याचे नाव | रिक्त पदे |
उस्मानाबाद | 07 |
लोहारा | 05 |
उमरगा | 02 |
कळंब | 06 |
परंडा | 08 |
तुळजापूर | 08 |
भूम | 02 |
एकूण | 38 |
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील तक्त्यात दिली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
कोतवाल | 04 थी उत्तीर्ण | 18 ते 42 वर्षे |
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली देण्यात आले आहे.
- खुला प्रवर्ग: रु. 500
- मागास प्रवर्ग: रु. 400
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 अर्ज प्रकिया
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 अंतर्गत एकूण 38 कोतवाल पदांची भरती होणार आहे. उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना आपणास संबंधित तहसील कार्यायालयात रु. 20 अर्ज शुल्क अदा करून मिळणार आहे. तसेच अधिसूचनेत अर्जाचा नमुना देण्यात आला आहे. अर्ज सादर करायच्या स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.
- जाहिराती सोबत प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या विहित नमुन्यातील अर्ज त्यामधील माहिती/तपशील सुस्पष्टपणे नमूद करून सादर करावा.
- अर्जासोबत स्वतःचे नाव व पत्ता नमूद केलेला व रुपये 5 चे पोस्टाचे तिकीट लावलेला लिफाफा जोडावा.
- उमेदवाराने त्यांचे अलीकडील काळातील छायाचित्र आवेदन पत्रावर विहित जागी स्वसाक्षाकिंत करून घट्ट चिटकावे.
- शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात.
- अर्जासोबत जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत साक्षांकित करून जोडावी.
- अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती व्यतिरिक्त सर्व मागास प्रवर्गातील उमेदवारांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे चालु आर्थिक वर्षातील नॉन क्रिमिलेअर साक्षांकित प्रत अर्जासोबत जोडावी.
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023: वेतन
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 अंतर्गत उमेदवारास रु. 15000 एवढे वेतन मिळणार आहे.
पदाचे नाव | वेतन |
कोतवाल | रु. 15000 |
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 निवड प्रक्रिया
उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारावर केल्या जाणार आहे. उस्मानाबाद कोतवाल भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.
- लेखी परीक्षा
- प्रमाणपत्र पडताळणी
- वैद्यकीय चाचणी
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप