Marathi govt jobs   »   पशुसंवर्धन विभाग भरती 2023   »   पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023

पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023, पदानुसार परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम तपासा

Table of Contents

पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023

पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023: महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे. परीक्षेचा वेळापत्रकासोबतच पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023 सुद्धा जाहीर करण्यात आला. पशुसंवर्धन परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर आपल्याला पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023 माहिती हवी. तरच आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळू शकते. परीक्षेचे स्वरूप व परीक्षाच अभ्यासक्रम आपल्याला अभ्यासाला योग्य दिशा देतात. या लेखात पशुसंवर्धन विभाग परीक्षेचे स्वरूप व पशुसंवर्धन विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

अवश्य पहा: पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023

पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षेचा अभ्यासक्रम
विभाग पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव पशुसंवर्धन विभाग भरती 2023
पदांची नावे
  • पशुधन पर्यवेक्षक
  • वरिष्ठ लिपीक
  • लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • तारतंत्री
  • यांत्रिकी
  • बाष्पक परिचर
एकूण रिक्त पदे 446
लेखाचे नाव पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023
लेख तुम्हाला काय प्रदान करतो पशुसंवर्धन विभाग परीक्षेचे स्वरूप 202023 आणि पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023
परीक्षेची तारीख 09,11 आणि 12 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.ahd.maharashtra.gov.in

पशुसंवर्धन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 (पशुधन पर्यवेक्षक, तारतंत्री आणि बाष्पक परिचर)

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 मधील पशुधन पर्यवेक्षक, तारतंत्री आणि बाष्पक परिचर या पदांसाठी एकूण 100 प्रश्न 200 गुणांकरिता विचारल्या जातील. त्यातील मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान आणि सामान्य अभिक्षमता या विषयावर प्रत्येकी 15 प्रश्न 30 गुणांसाठी विचारल्या जातील. तर व्यावसायिक ज्ञान या विषयावर 40 प्रश्न 80 गुणांसाठी विचारल्या जातील. या सर्व पदांच्या परीक्षेचा दर्जा दहावी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. पशुधन पर्यवेक्षक, तारतंत्री आणि बाष्पक परिचर या सर्व पदांच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. विषय  स्तर प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 10 वी 15 30 120 मिनिटे
2 इंग्रजी भाषा 10 वी 15 30
3 सामान्य ज्ञान 10 वी 15 30
4 सामान्य अभिक्षमता 10 वी 15 30
5 व्यावसायिक ज्ञान 10 वी 40 80
एकूण   100 200  

टीप:

  • वरील सर्व पदांच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • प्रत्येक योग्य उत्तरासाठी 2 गुण देण्यात येईल.
  • परीक्षेचे माध्यम मराठी असेल.
  • परीक्षेचा दर्जा दहावी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • नकारात्मक गुणांकन पद्धती बद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही.

पशुसंवर्धन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 मधील प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या परीक्षेत एकूण 100 प्रश्न 200 गुणांकरिता विचारल्या जातील. त्यातील मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान आणि सामान्य अभिक्षमता या विषयावर प्रत्येकी 15 प्रश्न 30 गुणांसाठी विचारल्या जातील. तर व्यावसायिक ज्ञान या विषयावर 40 प्रश्न 80 गुणांसाठी विचारल्या जातील. प्रयोगशाळा तंत्रज्ञ परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. तथापि त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा इयत्ता 12 वी दर्जाच्या समान राहील. प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या परीक्षेचे स्वरूप खाली देण्यात आले आहे.

अ. क्र. विषय  स्तर प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 12 वी 15 30 120 मिनिटे
2 इंग्रजी भाषा 12 वी 15 30
3 सामान्य ज्ञान पदवी 15 30
4 सामान्य अभिक्षमता पदवी 15 30
5 व्यावसायिक ज्ञान पदवी 40 80
एकूण   100 200  

टीप:

  • वरील सर्व पदांच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • प्रत्येक योग्य उत्तरासाठी 2 गुण देण्यात येईल.
  • परीक्षेचे माध्यम मराठी असेल.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. तथापि त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा स्तर इयत्ता 12 वी दर्जाच्या समान राहील.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • नकारात्मक गुणांकन पद्धती बद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही.

पशुसंवर्धन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 (वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक व उच्च श्रेणी लघुलेखक)

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 मधील वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक व उच्च श्रेणी लघुलेखक या पदांच्या परीक्षेत एकूण 100 प्रश्न 200 गुणांकरिता विचारल्या जातील. त्यातील मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान आणि सामान्य अभिक्षमता या विषयावर प्रत्येकी 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारल्या जातील. या सर्व पदांच्या परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. तथापि त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा इयत्ता 12 वी दर्जाच्या समान राहील. वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक व उच्च श्रेणी लघुलेखक या सर्व पदांच्या परीक्षेचे स्वरूप खाली देण्यात आले आहे.

अ. क्र. विषय  स्तर प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 12 वी 25 50 120 मिनिटे
2 इंग्रजी भाषा 12 वी 25 50
3 सामान्य ज्ञान पदवी 25 50
4 सामान्य अभिक्षमता पदवी 25 50
एकूण   100 200  
  • वरील सर्व पदांच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • प्रत्येक योग्य उत्तरासाठी 2 गुण देण्यात येईल.
  • परीक्षेचे माध्यम मराठी असेल.
  • परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. तथापि त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा स्तर इयत्ता 12 वी दर्जाच्या समान राहील
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • नकारात्मक गुणांकन पद्धती बद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही.

पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023

पशुसंवर्धन विभागातील सर्व पदांच्या परीक्षेत मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान व सामान्य अभिक्षमता या विषयांवर प्रश्न विचारल्या जातील. त्याचप्रमाणे पशुधन पर्यवेक्षक, तारतंत्री, बाष्पक परिचर आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या परीक्षेत व्यावसायिक ज्ञान यावर प्रश्न विचारल्या जाणार आहेत. विषयानुसार पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023 खाली देण्यात आला आहे.

पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023 (मराठी भाषा)

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 अंतर्गत वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक व उच्च श्रेणी लघुलेखक पदांच्या परीक्षेत मराठी भाषेवर 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारल्या जातील तसेच पशुधन पर्यवेक्षक, तारतंत्री, बाष्पक परिचर आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या परीक्षेत 15 प्रश्न 30 गुणांसाठी विचारल्या जातील. मराठी विषयातील प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहे.

  • शब्दांच्या जाती (मराठी व्याकरणातील सर्व 08 शब्दांच्या जाती)
  • लिंग
  • वचन
  • विभक्ती
  • प्रयोग
  • समास
  • काळ
  • अलंकार
  • मराठीतील शब्दसंपदा (समानार्थी शब्‍द, विरुद्धार्थी शब्‍द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
  • वाक्यरचना (वाक्याचे प्रकार, वाक्यातील त्रुटी शोधणे)
  • म्हणी व वाक्प्रचार
  • उताऱ्यावरील प्रश्न

पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023 (इंग्रजी भाषा)

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 अंतर्गत वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक व उच्च श्रेणी लघुलेखक पदांच्या परीक्षेत इंग्रजी भाषेवर 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारल्या जातील तसेच पशुधन पर्यवेक्षक, तारतंत्री, बाष्पक परिचर आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या परीक्षेत 15 प्रश्न 30 गुणांसाठी विचारल्या जातील. मराठी विषयातील प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहे.

  • Parts of Speech
  • Spot the error
  • Voice
  • Direct Indirect Speech
  • Articles
  • Fill in the blanks
  • Synonyms
  • Antonyms
  • Spelling/detecting misspelled words
  • Idioms and Phrases
  • One word substitution
  • Improvement of sentences
  • Comprehension Passage

पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023 (सामान्य ज्ञान)

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 अंतर्गत वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक व उच्च श्रेणी लघुलेखक पदांच्या परीक्षेत सामान्य ज्ञान विषयात 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारल्या जातील तसेच पशुधन पर्यवेक्षक, तारतंत्री, बाष्पक परिचर आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या परीक्षेत 15 प्रश्न 30 गुणांसाठी विचारल्या जातील. सामान्य ज्ञान या विषयात प्रामुख्याने राज्यघटना, पर्यावरण, इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी आणि स्टॅटिक जनरल नॉलेज या सर्व विषयांचा समावेश होतो. सामान्य ज्ञानमधील प्रमुख विषय व त्यातील घटक खालीलप्रमाणे आहे.

  • आधुनिक भारताचा इतिहास
  • भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
  • महाराष्ट्रातील समाज सुधारक
  • आंतरराष्ट्रीय संघटना
  • भारतातील प्रथम व्यक्ती
  • भारतीय राज्यघटना
  • चालू घडामोडी भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध
  • हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये

पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023 (सामान्य अभिक्षमता)

सामान्य अभिक्षमता या विषयात प्रामुख्याने दोन विषयांचा समावेश होतो ते म्हणजे अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी. खापाल पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान विषयावर 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारल्या जातील तर इतर सर्व पदांच्या परीक्षेत 15 प्रश्न 30 गुणांसाठी विचारल्या जातील. सामान्य अभिक्षमता या विषयात अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा समावेश होता. अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी विषयातील प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहे.

अंकगणित

  • मूलभूत क्रिया
  • काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे
  • सरासरी
  • नफा – तोटा
  • शेकडेवारी
  • भागीदारी
  • सरळव्याज व चक्रवाढ व्याज
  • परिमिती
  • क्षेत्रफळ
  • वय
  • सरासरी
  • गुणोत्तर व प्रमाण
  • ल.सा.वी. व मी.सा.वी.
  • दशांश आणि अपूर्णांक

बुद्धिमत्ता चाचणी

  • अंकमालिका
  • अक्षर मलिका
  • वेगळा शब्द व अंक ओळखणे
  • समसंबंध – अंक, अक्षर
  • आकृती
  • वाक्यावरून निष्कर्ष
  • वेन आकृती
  • आकृत्या मोजणे
  • कोडी
  • नातेसंबंध
  • दिशा
  • दिनदर्शिका
  • घड्याळ
  • आकृत्यांवरील प्रश्न

पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023 (व्यावसायिक ज्ञान)

पशुसंवर्धन भरती 2023 मधील पशुधन पर्यवेक्षक, तारतंत्री, बाष्पक परिचर आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या परीक्षेत व्यावसायिक ज्ञानया विषयावर एकूण 40 प्रश्न 80 गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत. पदानुसार व्यावसायिक ज्ञान या विषयचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी खाली दिलेली PDF डाउनलोड करा.

पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023 – व्यावसायिक ज्ञान

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023 जाहीर झाला आहे का?

होय, पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023 जाहीर झाला आहे.

पशुसंवर्धन विभागाची परीक्षा किती गुणांची आहे?

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 अंतर्गत सर्व पदांची परीक्षा 200 गुणांची आहे.

पाहुसंवर्धन विभाग परीक्षेचे माध्यम काय आहे?

पाहुसंवर्धन विभाग परीक्षेचे माध्यम मराठी आहे.

मी पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023 कोठे पाहू शकतो?

आपण या लेखात सविस्तर पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023 तपासू शकता.