Table of Contents
PCMC भरती कागदपत्र पडताळणीचा दुसरा टप्पा जाहीर
PCMC भरती कागदपत्र पडताळणीचा दुसरा टप्पा जाहीर: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी PCMC भरती कागदपत्र पडताळणीचा दुसरा टप्प्यासंदर्भात अधिकृत सूचना जाहीर केली आहे. सदर कागदपत्र पडताळणी दिनांक 19 व 20 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. या आधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, कोर्ट लिपिक, ॲनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदांसाठी निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केली होती. या लेखात, आपण PCMC भरती कागदपत्र पडताळणीचा दुसरा टप्पाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
PCMC भरती कागदपत्र पडताळणीचा दुसरा टप्पा 2023: विहंगावलोकन
खालील तक्त्यात आपण PCMC भरती कागदपत्र पडताळणीचा दुसरा टप्पा 2023 बद्दल विहंगावलोकन तपासू शकता.
PCMC भरती कागदपत्र पडताळणीचा दुसरा टप्पा 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
महानगरपालिका | पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) |
भरतीचे नाव | PCMC भरती 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 386 |
PCMC निकालाची तारीख (लिपिक व सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता) | 30 ऑगस्ट 2023 |
कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक | 17 ऑगस्ट 2023 |
निकालाची तारीख (इतर सर्व पदे) | 07 ऑगस्ट 2023 |
PCMC निकाल 2023 पात्र उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी | 01 डिसेंबर 2023 |
PCMC भरती कागदपत्र पडताळणीचा दुसरा टप्पा | 19 व 20 डिसेंबर 2023 |
लेखाचे नाव | PCMC भरती कागदपत्र पडताळणीचा दुसरा टप्पा |
PCMC चे अधिकृत संकेतस्थळ | www.pcmcindia.gov.in |
PCMC भरती कागदपत्र पडताळणीचा दुसरा टप्पा 2023: अधिकृत सूचना
दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने PCMC भरती 2023 मधील पात्र उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन केले आहे. दिनांक 19 व 20 डिसेंबर 2023 रोजी कागदपत्र पडताळणी होणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्याबाबतची अधिकृत सूचना PDF डाउनलोड करू शकतात.
PCMC भरती कागदपत्र पडताळणीचा दुसरा टप्पा 2023: अधिकृत सूचना PDF
कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचा पत्ता
पात्र उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले सभागृह, मुंबई-पुणे हाईवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी पुणे 411018 येथे सकाळी 10:00 वाजता उपस्थित रहावे.
कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी परिशिष्ठ “अ” मधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या दिनांकास ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले सभागृह, मुंबई-पुणे हाईवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी पुणे 411 018 येथे सकाळी 10:00 वाजता उपस्थित रहावे.
- उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी करीता येताना परिशिष्ठ “ब” मध्ये नमूद केल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे तसेच त्या कागदपत्रांचा सक्षम प्राधिका-यांने साक्षांकित केलेला एक संच सोबत आणावा.
- कागदपत्रे पडताळणीस अनुपस्थित राहणा-या व अपूर्ण कागदपत्रे सादर करणा-या अथवा कागदपत्रे तपासणी अंती उमेदवार शैक्षणिक अर्हता तसेच इतर बाबींची पुर्तता करीत नसल्याचे निदर्शनास आल्यास, अशा उमेदवारांचा पुढील निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. याची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- दोन्ही टप्यातील कागदपत्रे पडताळणीकरीता बोलविण्यात आलेल्या उमेदवारांचे पदनिहाय व प्रवर्गनिहाय अंतिम गुणरेषा (Cut Off) सोबत जोडलेले आहे. याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- कागदपत्रे पडताळणीचा दुसरा टप्यानंतर संबंधित प्रवर्गासाठी निवड यादीमध्ये उपलब्ध न झालेल्या उमेदवारांची निवड यादी व एकत्रित (Consolidated) प्रतिक्षा यादी गुणवत्तेनुसार अंतिमरित्या महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत येईल. याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.