Marathi govt jobs   »   PCMC Recruitment   »   PCMC परीक्षा विश्लेषण 2023
Top Performing

PCMC परीक्षा विश्लेषण 2023, 27 मे रोजी झालेल्या लिपिक पदासाठी झालेल्या परीक्षेचे संपूर्ण विश्लेषण पहा

PCMC परीक्षा विश्लेषण 2023

PCMC परीक्षा विश्लेषण 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत लिपिक पदाची परीक्षा 27 मे 2023 रोजी TCS मार्फत घेण्यात आली. परीक्षेला गेलेल्या उमेदवारांच्या मिलाल्याल्या प्रतिसादानुसार लिपिक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. या लेखात आपण 27 मे 2023 रोजी झालेल्या लिपिक पदाच्या PCMC परीक्षा विश्लेषण 2023 विस्तृत स्वरुपात पाहणार आहोत. ज्यात विषयवार चांगले प्रयत्न, एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.

PCMC परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन

लिपिक पदाची परीक्षा दिनांक 27 मे 2023 रोजी झाली. या लेखात PCMC परीक्षा विश्लेषण 2023 देण्यात आले आहे. उमेदवार PCMC परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात तपासू शकतात.

PCMC परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका
भरतीचे नाव PCMC भरती 2023
लेखाचे नाव PCMC परीक्षा विश्लेषण 2023
पदांचे नाव

लिपिक

PCMC लिपिक पदाच्या परीक्षेची तारीख 2023 27 मे 2023
परीक्षेची वेळ दुपारी 4.30
नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही
एकूण गुण 100
अधिकृत संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in

 

PCMC परीक्षेचे स्वरूप 2023 (लिपिक)

PCMC भरती परीक्षा 2023 अंतर्गत लिपिक पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची होती. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे एकूण 100 प्रश्न विचारण्यात आले होते. लिपिक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

विषय एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी
मराठी भाषा 25 50 120 मिनिट
इंग्रजी भाषा 25 50
सामान्य ज्ञान 25 50
बौद्धिक चाचणी 25 50
एकूण 100 200

PCMC परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट

लिपिक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते माध्यम होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे. गुड अटेंम्ट म्हणजे कट ऑफ नाही. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या बरोबर प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण परीक्षेचा कट ऑफ क्लिअर करू शकतो

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 21-22 सोपी ते मध्यम
2 इंग्रजी भाषा 20-21 सोपी ते मध्यम
3 सामान्य ज्ञान 21-22 सोपी ते मध्यम
4 बौद्धिक चाचणी 21-22 सोपी ते मध्यम
एकूण 83-87 सोपी ते मध्यम

विषयानुरूप PCMC परीक्षा विश्लेषण 2023

लिपिक पदाच्या परीक्षेत गणित, बौद्धिक चाचणी, मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे एकूण 100 प्रश्न प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे या लेखात विषयानुरूप PCMC परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

PCMC परीक्षा विश्लेषण 2023: मराठी विषयाचे विश्लेषण

PCMC परीक्षा 2023 मधील मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने शब्दांच्या जाती, काळ, समास, वाक्यरचना, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, उतारा यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
शब्दांच्या जाती 6
लिंग 2
समानार्थी शब्द 2
विरुद्धार्थी शब्द 2
वचन 2
म्हणी व वाक्प्रचार 2
समास 4
उतारा (पुरंदर किल्ला) 5
एकूण 25

PCMC परीक्षा विश्लेषण 2023: इंग्रजी विषयाचे विश्लेषण

PCMC भरती परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Singular-Plural form, Cloze test, Sentence rearrangement, Error detection, Incorrect spelling यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Topics No. of Questions
Paragraph (Spices) 5
Parts of Speech 6
Sentence Rearrangement 4
Error Detection 4
Incorrect Spelling 1
Voice 2
Narration 2
Tense 1
Total 25

PCMC परीक्षा विश्लेषण 2023: सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

लिपिक पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
विषय प्रश्न संख्या
भारतीय राज्यघटना 3
इतिहास 3
भूगोल 4
चालू घडामोडी 13
स्टॅटिक जी.के 2
एकूण  25

सामान्य ज्ञान या विषयात विचारलेले काही प्रश्न खालील प्रमाणे आहे.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर एक प्रश्न होता.
  • भारताच्या वायव्येस कोणत्या देशांच्या सीमा लागतात?
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेवर एक प्रश्न होता.
  • 82 अंश 30′ रेखा भारताच्या कोणत्या शहरातून वाहते?
  • पुढीलपैकी कोणती संस्था पंचायत राजच्या सगळ्यात शेवटची आहे?
  • जून 2022 मध्ये कोणत्या राज्यात भूस्खलन झाले?
  • हिमालयाच्या पूर्वेकडील सीमा कोणती नदी निश्चित करते?
  • बंकिमचंद्र चटर्जी यांनी कोणते पुस्तक लिहिले?
  • भारतात ताग उत्पादनात प्रथम राज्य कोणते?

PCMC परीक्षा विश्लेषण 2023: बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

PCMC भरती परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने सरळरूप देणे, मिश्रण, संख्या मालिका पूर्ण करणे, टक्केवारी, नफा-तोटा, भागीदारी, अक्षरमाला, आकृती, दिशा, नातेसंबंध, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, कोडी आणि जोड्या जुळवणे या घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
गटात न बसणारी संख्या 4
अक्षरमाला 4
संख्यामाला 4
दिशा 2
सांकेतिक भाषा 3
कोडी 2
नातेसंबध 1
समसंबंध 2
 आकृती 3
एकूण 25
Mumbai Police Admit Card 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

PCMC भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख
PCMC परीक्षा तारीख 2023 PCMC प्रवेशपत्र 2023
PCMC भरती 2023 PCMC परीक्षेचे स्वरूप 2023
PCMC परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 PCMC भरतीसाठी पुस्तकांची यादी 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

PCMC Test Series 2023
PCMC टेस्ट सिरीज 2023

Sharing is caring!

PCMC परीक्षा विश्लेषण 2023, 27 मे 2023 रोजी झालेल्या लिपिक पदाच्या परीक्षेचे विश्लेषण_5.1

FAQs

PCMC परीक्षा 2023 अंतर्गत लिपिक पदाची परीक्षा कधी झाली?

PCMC परीक्षा 2023 अंतर्गत लिपिक पदाची परीक्षा 27 मे 2023 रोजी झाली.

PCMC परीक्षा 2023 ची काठीण्य पातळी कशी होती?

PCMC परीक्षा 2023 ची एकूण काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.

PCMC परीक्षा 2023 साठी एकूण गुड अटेंम्ट किती आहेत?

PCMC परीक्षा 2023 साठी एकूण गुड अटेंम्ट 83 ते 87 आहे.

PCMC परीक्षा विश्लेषण 2023 मी कुठे पाहू शकतो?

आपण या लेखात PCMC परीक्षा विश्लेषण 2023 विस्तृत स्वरुपात दिले आहे.