Marathi govt jobs   »   Job Notification   »   PDCC Bank Clerk Recruitment 2021
Top Performing

PDCC Bank Clerk Recruitment 2021 | Apply Now for 356 Posts | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लेखनिक पदासाठी भरती 2021

PDCC Bank Clerk Recruitment 2021

PDCC Bank Clerk 2021 Notification: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे या बँकेकरीता लेखनिक हुदयाची रिक्त पदे सरळसेवा भरतीद्वारे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करणेसाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकेचे संकेत स्थळावर म्हणजेच: https://ndccbank.co.in/careers/ किंवा या पोस्ट मध्ये तुम्ही संपूर्ण तपशील तपासू शकता.

PDCC Bank Clerk 2021 Notification

PDCC Bank Clerk 2021 Notification: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे ने दिनांक ७ ऑगस्ट रोजी लेखनिक(Clerk) पदासाठी एकूण 356 रिक्त पदांसाठी जाहिरात (Notification) जाहीर केले आहे.

PDCC Bank Clerk 2021 official Notification (जाहिरात) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

PDCC Bank Clerk Recruitment 2021: Important Dates

PDCC Bank Clerk Recruitment 2021 Important Dates: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक(Clerk) पदासाठी अर्ज करण्याची तारीख 7 आगस्ट 2021 ते 16 ऑगस्ट 2021 आहे. बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात पाहू शकता.

PDCC Bank Clerk Recruitment 2021: Important Dates

Events

Date

PDCC Bank Clerk 2021 Notification (जाहिरात) 7 ऑगस्ट 2021
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) 7 ऑगस्ट 2021
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 16 ऑगस्ट 2021
ऑनलाईन परिक्षा शुल्क स्विकारण्याचा अंतिम दिनांक 7 ऑगस्ट 2021 ते 17 ऑगस्ट 2021 सायं. 5.०० वाजेपर्यंत
ऑनलाइन परिक्षा शुल्क भरणा माहिती संकेत स्थळावर अद्ययावत (Update) करण्याची अंतिम दिनांक 7 ऑगस्ट 2021 ते 18 ऑगस्ट 2021
ऑनलाईन परिक्षा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रसिद्ध करण्यात येईल.
ऑनलाईन परिक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रसिद्ध करण्यात येईल.
कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रसिद्ध करण्यात येईल.

 

PDCC Bank Clerk Recruitment: Online Application

PDCC Bank Clerk 2021 Recruitment: Online Application: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक(Clerk) पदासाठी अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. विद्यार्थीं 16 ऑगस्ट च्या आधी हा अर्ज करू शकतात.

PDCC Bank Clerk 2021 Recruitment: Online Application लिंक

PDCC Bank Clerk Recruitment: Application Fee

PDCC Bank Clerk Recruitment: Application Fee: ऑनलाईन परिक्षेकरीता रु.885/- (सर्व करांसह) शुल्क आकारले जाईल, सदर ऑनलाईन परिक्षा शुल्क हे ना परतावा राहील. एकदा भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परिक्षा किंवा निवडीसाठी राखीव ठेवता येणार नाही.

PDCC Bank Clerk Recruitment: Vacancy 2021

PDCC Bank Clerk Recruitment: Vacancy 2021: यावर्षी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे ने लेखनिक(Clerk) पदासाठी एकूण 356 रिक्त जरा जाहीर केल्या आहेत.

PDCC Bank Clerk Recruitment: Eligibility Criteria 2021

PDCC Bank Clerk Recruitment: Eligibility Criteria 2021: लेखनिक पदाच्या सरळसेवा भरतीसाठी पात्र उमदेवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

Required Educational Qualification | आवश्यक शैक्षणिक अर्हता

उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किमान 50% गुणाने उत्तीर्ण असावा आणि उमेदवार एम.एस.सी.आय.टी. किंवा शासन मान्यता प्राप्त आणि संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा (संगणक पदवी असल्यास अट शिथिल).

Age Limit | वयोमर्यादा

किमान 21 वर्ष कमाल 38 वर्षे. दि.30.06.2021 रोजी उपरोक्त वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

 

PDCC Bank Clerk Recruitment 2021: Salary

PDCC Bank Clerk Recruitment 2021: Salary: अंदाजे एकत्रित वेतन रु.22000/- व बँकेच्या नियमानुसार लागू असणारे भत्ते.

 

PDCC Bank Clerk Recruitment 2021: Online Exam Pattern

PDCC Bank Clerk Recruitment 2021: Online Exam Pattern: 

अ.क्र (Sr. No.)  विषयाचे नाव (Subject Name) गुण (Marks)
1 बँकींग व सहकार 30
2 सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 20
3 कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था 10
4 मराठी भाषा ज्ञान 10
5 संगणक व माहिती तंत्रज्ञान 10
6 बुद्धीमापन चाचणी 10
एकूण गुण (Total Marks) 90

 

PDCC Bank Clerk Recruitment 2021: Selection Process

PDCC Bank Clerk Recruitment 2021: Selection Process:

1) ऑनलाईन परिक्षा (Online Exam)

लेखनिक श्रेणीतील पदाकरीता 90 गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. सदर ऑनलाईन परिक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. ऑनलाईन परिक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. तसेच ऑनलाईन परिक्षेचे माध्यम मराठी असेल,

2) कागदपत्रे पडताळणी (Document verification)

ऑनलाईन परिक्षेतील गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पद संख्येच्या १:३ प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची आसन क्रमांक निहाय यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर मुलाखतीस पात्र उमेदवारांस मुलाखतीपुर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मुळ प्रमाणपत्रांची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी व मुलाखतीस ऑनलाईन पद्धतीने मुलाखतपत्र उपलब्ध करून दिले जाईल. सदर मुलाखतपत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावरुन डाऊनलोड करावे, मुलाखतपत्र डाऊनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास support@punedccbank.in या ई-मेल द्वारे व 9511262588, 7517824568 या हेल्पलाईनद्वारे संपर्क साधावा. कागदपत्रे पडताळणीवेळी उमेदवाराने मुळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारच बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र होईल.

3) मुलाखत (Interview)

कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँक गठीत समितीकडून मुलाखत घेण्यात येईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहील्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही, सदर मुलाखत १० गुणांची असून सदर गुणांचे भारांकन बँक धोरणानुसार असेल, त्यामध्ये १० पैकी ५ गुण संबंधित उमेदवारांच्या खालील शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील व उर्वरित ५ गुण मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येतील.

4) उमेदवारांची अंतिम निवड सूची (Final Selection List of Candidates:)

उमेदवारांचे ऑनलाईन परिक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण १०० गुणांपैकी गुणानुक्रमे गुणांसह अंतिम निवड सूची व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येईल. त्याचप्रमाणे ३५६ पद संख्या विचारात घेता, अंतिम निवडसूची व प्रतिक्षा यादीमध्ये समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांमध्ये पुणे जिल्हयातील उमेदवार उमेदवार धारण करीत असलेली उच्च / शैक्षणिक अर्हता, अनुभव, वयाची सेवाजेष्ठता व आडनावाच्या इंग्रजी अक्षरांनुसार याक्रमाने प्राधान्य देऊन अनुक्रमे उमेदवारांची यादी मर्यादित येते.


YouTube channel- Adda247 Marathi
 | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra Mahapack
Maharashtra Mahapack

Sharing is caring!

PDCC Bank Clerk Recruitment 2021 | Apply Now for 356 Posts_4.1