Table of Contents
PDKV भरती 2023
PDKV भरती 2023: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कुशल मदतनीस आणि कार्यालयीन सहाय्यक पदाच्या भरतीसाठी PDKV भरती 2023 जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 22 जून 2022 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे. PDKV भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची मुलाखत ऑनलाईन पद्धतीने 27 जून 2023 रोजी घेण्यात येईल. या लेखात आपण PDKV भरती 2023 ची अधिसूचना, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्वपूर्ण माहिती याबद्दल माहिती पाहणार आहोत.
PDKV भरती 2023: विहंगावलोकन
कुशल मदतनीस आणि कार्यालयीन सहाय्यक पदाच्या भरतीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023 जाहीर झाली आहे.PDKV भरती 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विद्यापीठाचे नाव | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला |
भरतीचे नाव | PDKV भरती 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 05 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन (ई-मेल द्वारे) |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
नोकरीचे ठिकाण | अकोला |
अधिकृत संकेतस्थळ | www.pdkv.ac.in |
PDKV भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा
PDKV भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 22 जून 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
PDKV भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
PDKV भरती 2023 ची अधिसूचना | 17 जून 2023 |
PDKV भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 17 जून 2023 |
PDKV भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 जून 2023 |
PDKV भरती 2023: मुलाखत | 27 जून 2023 |
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023 ची अधिसूचना
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023 अंतर्गत एकूण 05 पदाची भरती होणार आहे. सदर पदभरती साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 22 जून 2023 पर्यंत खाली दिलेल्या ई-मेल द्वारे अर्ज सादर करू शकतात. PDKV भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
PDKV भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील
PDKV भरती 2023 अंतर्गत एकूण 05 पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आला आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
कुशल मदतनीस | 04 |
कार्यालयीन सहाय्यक | 01 |
एकूण | 05 |
PDKV भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष
PDKV भरती 2023 साठी आवश्यक पदानुसार शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
कुशल मदतनीस |
|
उमेदवाराचे कमाल वय 35 वर्षे असावे. |
कार्यालयीन सहाय्यक |
|
PDKV भरती 2023 ची अर्ज प्रक्रिया
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 22 जून 2023 पर्यंत विहित अर्जाचा नमुना भरून त्यासोबत आवश्यक प्रमाणपत्रे स्कॅन करून खाली दिलेल्या ई -मेल ऍड्रेसवर पाठवायचे आहेत. PDKV भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना व ई-मेल ऍड्रेस खाली देण्यात आला आहे.
पदाचे नाव | अर्जाचा नमुना |
कुशल मदतनीस | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
कार्यालयीन सहाय्यक | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
ई-मेल ऍड्रेस: cvrudrpdkv@gmail.com
PDKV भरती 2023 अंतर्गत मिळणारे वेतन
PDKV भरती 2023 मधील कुशल मदतनीस आणि कार्यालयीन सहाय्यक पदास मिळणारे वेतन खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | वेतन |
कुशल मदतनीस | रु. 15000 |
कार्यालयीन सहाय्यक | रु. 12000 |
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023 निवड प्रक्रिया
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांची निवड ही 27 जून 2023 रोजी घेण्यात येणाऱ्या मुलाखतीच्या आधारवर केल्या जाणार आहे. सदर मुलाखत ही झूम अँपवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मुलाखतीचा तपशील उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |