Table of Contents
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023: पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूरने विविध संवर्गातील एकूण 16 पदाच्या भरतीसाठी पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 जाहीर केली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 07 ते 09 ऑगस्ट 2023 या कालावधीत खाली दिलेल्या पत्यावर हजर राहायचे आहे. आज या लेखात पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि मुलाखतीचा तपशील इत्यादी बाबींचा समावेश आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023: विहंगावलोकन
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 अंतर्गत जीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, उपजीविका तज्ञ, सर्वेक्षण सहाय्यक, GIS तज्ञ, ग्राफिक डिझायनर. सिव्हिल इंजिनियर आणि बचाव मदत टीम या सर्व पदांची भरती होणार असून पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात मिळवू शकता.
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
व्याघ्र प्रकल्पाचे नाव | पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान |
भरतीचे नाव | पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 16 |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaforest.gov.in |
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 अंतर्गत 07 ते 09 ऑगस्ट या कालावधीत मुलाखती घेण्यात येणार असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 ची अधिसूचना | 17 जुलै 2023 |
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 अंतर्गत मुलाखतीची तारीख | 07 ते 09 ऑगस्ट 2023 |
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 ची अधिसूचना
पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानने विविध संवर्गातील एकूण 16 रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार 07 ते 09 ऑगस्ट 2023 रोजी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर राहू शकतात. पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 अधिसूचना PDF
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 16 रिक्त पदांची भरती होणार असून रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
जीवशास्त्रज्ञ | 01 |
पशुवैद्यकीय अधिकारी | 01 |
निसर्ग पर्यटन व्यवस्थापक | 02 |
सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक | 02 |
उपजीविका तज्ञ | 02 |
सर्वेक्षण सहाय्यक | 01 |
GIS तज्ञ | 01 |
ग्राफिक डिझायनर | 01 |
सिव्हिल इंजिनियर | 01 |
बचाव मदत टीम | 04 |
एकूण | 16 |
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जीवशास्त्रज्ञ | वन्यजीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्रा मध्ये पदव्युत्तर किमान 60% गुणांसह उत्तीर्ण व पीएचडी. |
पशुवैद्यकीय अधिकारी | स्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल. |
निसर्ग पर्यटन व्यवस्थापक | कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका |
सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक | कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका |
उपजीविका तज्ञ | सामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी (MSW) / ग्रामीण व्यवस्थापनात / कृषी व्यवस्थापनात एमबीए ग्रामीण क्षेत्रात उपजिवीका तज्ञ म्हणुन किमान 2 वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजिवीका तज्ञ या कामाचा कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव. |
सर्वेक्षण सहाय्यक | कोणत्याही शाखेतील पदवीधर, टंकलेखन वेग इंग्रजी 40 शप्रमी, मराठी 30 शप्रमी. सर्वेक्षण / जमीन विषयक / जीआयएस मध्ये अनुभव. |
GIS तज्ञ | विज्ञान पदवी किंवा भूगोल विषयात बी. ए. व जीआयएस विषयाचा कमीत कमी 3 वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव. |
ग्राफिक डिझायनर | कोणत्याही शाखेतील पदवीधर, ग्राफिक डिझायनिंग मध्ये पदवी किंवा पदविका |
सिव्हिल इंजिनियर | सिव्हिल शाखेतील पदवी, सदर क्षेत्रात काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव |
बचाव मदत टीम | किमान SSC उत्तीर्ण, MS-CIT उत्तीर्ण, उमेदवारास वन विभागात प्रत्यक्ष वन्यप्राणी बचाव / रेस्क्यु कार्य मोहीमेचा अनुभव प्रमाणपत्र |
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 साठी मुलाखतीचे ठिकाण
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 साठी इच्छूक व पात्र उमेदवारांना 07 ते 09 ऑगस्ट 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखतीचा पत्ता व मुलाखतीचे वेळापत्रक खाली देण्यात आले आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 पदानुसार मुलाखतीचे वेळापत्रक
मुलाखतीचा पत्ता: हरीसिंग सभागृह, आयकर भवन समोर, जपानी गार्डन चौक, सेमीनरी हिल्स, नागपुर
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023: निवड प्रक्रिया
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 साठी आलेल्या अर्जाची छाननी केल्यावर पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |