Table of Contents
PMRDA भरती 2023
PMRDA भरती 2023: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे PMRDA मध्ये अनेक वर्षणापासून रखडलेल्या विविध वर्गातील अ, ब, क आणि ड संवर्गातील एकूण 407 पदाच्या भरतीच्या आकृतिबंदास अखेर राज्यसरकारने मंजुरी दिले आहे. PMRDA भरती 2023 अंतर्गत गट अ च्या 82, गट ब च्या 96, गट क च्या 179 आणि गट ड च्या 50 अश्या एकूण 407 रिक्त जागांसाठी अधिकृत PMRDA भरती 2023 अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे. या लेखात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) भरती 2023 बद्दल सर्व माहिती मिळवा.
PMRDA भरती 2023: विहंगावलोकन
PMRDA भरती 2023 अंतर्गत एकूण 407 पदांची भरती होणार आहे. PMRDA भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
PMRDA भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
महामंडळाचे नाव | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) |
भरतीचे नाव | PMRDA भरती 2023 |
रिक्त पदांची संख्या | 407 |
रिक्त पदे | गट अ, ब, क आणि ड संवर्गातील विविध पदे |
निवड प्रक्रिया | ऑनलाइन परीक्षा आणि किंवा मुलाखत |
नोकरीचे स्थान | पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहरासह इतर ग्रामीण भाग |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.pmrda.gov.in/ |
PMRDA भरती 2023 आकृतिबंदास मंजुरी
कंत्राटी मनुष्यबळावर कामकाज सुरू असलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणसाठी (पीएमआरडीए) नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला पीएमआरडीएचा ४०७ पदांचा समावेश असलेला आकृतिबंध राज्य सरकारने मंजूर केला आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून 31 मार्च 2015 रोजी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएची स्थापना झाली होती. तेव्हापासून पीएमआरडीएमार्फत आकृतिबंध व सेवाप्रवेश नियम तयार करण्याचे काम सुरू होते. आकृतिबंध तयार करून शासनाकडे पाठविल्यानंतर जानेवारी 2023 मध्ये शासनाच्या प्राधिकरण कार्यकारी समितीकडून त्यास मान्यता मिळाली. त्यानंतर राज्य शासनाने आकृतिबंध मंजूर करून याबाबत अध्यादेश काढला आहे.
प्रतिनियुक्तीवरील मोजके अधिकारी वगळले तर पीएमआरडीएचा संपूर्ण कारभार सात वर्षे कंत्राटी मनुष्यबळावर विसंबून होता. मात्र, आता पीमआरडीएचा 57 संवर्गाचा आणि एकूण 407 पदसंख्येचा हा आकृतिबंध मंजूर झाला आहे. उमेदवार खाली बद्दल तपशील मिळवू शकतात.
PMRDA भरती 2023 संदर्भातील बातमी
PMRDA भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील
PMRDA भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 407 रिक्त पदांची भरती होणार आहे. वर्ग आणि संवर्गानुसार रिक्त पदांचा तपशील उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकतात.
वर्ग | संवर्ग संख्या | पद संख्या |
गट अ | 25 | 82 |
गट ब | 13 | 96 |
गट क | 17 | 179 |
गट ड | 02 | 50 |
एकूण संख्या | 57 | 407 |
PMRDA भरती 2023साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
PMRDA भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यावर आम्ही या लेखात पदानुसार रिक्त पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता उपलब्ध करून देऊ. वेळोवेळी PMRDA भरती 2023 बद्दल अपडेट मिळवण्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.