Marathi govt jobs   »   पोलीस भरती अपडेट 2024   »   पोलीस भरती वयोमर्यादा 2024
Top Performing

पोलीस भरती वयोमर्यादा 2024, प्रवर्गानुसार वयोमर्यादा जाणून घ्या

पोलीस भरती वयोमर्यादा 2024

पोलीस भरती वयोमर्यादा 2024: राज्यात लवकरच जवळपास 17,000 पोलीस शिपाई पदांसाठी भरती होणार आहे. पोलीस दलात नोकरी करण्याचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. पोलीस भरती साठी अर्ज करण्यापूर्वी त्यासाठी लागणारी पात्रता जसे कि शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा माहित असणे आवश्यक आहे. या लेखात आपण पोलीस भरती वयोमर्यादा 2024 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

पोलीस भरती 2024: विहंगावलोकन

पोलीस भरती 2024 शासन निर्णय दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आला. पोलीस भरती 2024 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.

पोलीस भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग महाराष्ट्र शासन, गृह विभाग
भरतीचे नाव पोलीस भरती 2024
पदे पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई
एकूण रिक्त पदे 17471
निकारीचे ठिकाण महाराष्ट्र

पोलीस भरती वयोमर्यादा 2024

उमेदवार खालील तक्त्यात प्रवर्गानुसार पोलीस भरती वयोमर्यादा 2024 पाहू शकतात.

प्रवर्ग किमान वय (वर्षामध्ये) कमाल वय (वर्षामध्ये)
खुला 18 28
मागासवर्गीय 18 33
प्रकल्पग्रस्त उमेदवार 18 45
भूकंपग्रस्त उमेदवार 18 45
माजी सैनिक 18 उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेईतका कालावधी अधिक 3 वर्ष
अनाथ 18 33
पदवीधर अंशकालीन 18 55
महिला 18 33
खेळाडू 18 38
पोलीस पाल्य 18 33
गृहरक्षक 18 33

महाराष्ट्र गृह विभाग शासन निर्णय PDF

उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन दिनांक 31 जानेवारी 2024 चा महाराष्ट्र गृह विभागाचा शासन निर्णय PDF डाउनलोड करू शकतात.

महाराष्ट्र गृह विभाग शासन निर्णय PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

पोलीस भरती वयोमर्यादा 2024, प्रवर्गानुसार वयोमर्यादा जाणून घ्या_4.1

FAQs

पोलीस भरती वयोमर्यादा 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

पोलीस भरती वयोमर्यादा 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

पोलीस भरती 2024 मध्ये खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा किती आहे?

पोलीस भरती 2024 मध्ये खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्ष इतकी आहे.