Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   Police Bharti 2024 Shorts

Police Bharti 2024 Shorts | कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार

Police Bharti 2024 Shorts 

Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police Bharti 2024 ची जाहिरात पहिली असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच महाराष्ट्रात Police Bharti 2024 होणार आहे. त्यात भरपूर जागा आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे Police Bharti 2024 Shorts. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

Title

Link Link

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना 

Maharashtra Police Constable Recruitment 2024 : Study Plan

अँप लिंक  वेब लिंक 
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan

 

अँप लिंक वेब लिंक 

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला Police Bharti 2024 Shorts चे विहंगावलोकन मिळेल.

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता महाराष्ट्र पोलीस भरती 2024
विषय मराठी व्याकरण
टॉपिक कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार

मराठी व्याकरण – कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार

कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात:

  1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग
  2. नवीन कर्मणी प्रयोग
  3. समापन कर्मणी प्रयोग
  4. शक्य कर्मणी प्रयोग
  5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग
  • प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग: प्राचीन मराठी काव्यातील सकर्मक धातूला ‘ज’ प्रत्यय जोडून तयार केलेल्या वाक्यांचा यात समावेश होतो. उदा. नळे इंद्रासी असे बोलिजेले.
  • नवीन कर्मणी प्रयोग: ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात. उदा. कंस कृष्णाकडून मारला गेला.
  • समापन कर्मणी प्रयोग: ज्या कर्मणी प्रयोगातून कृती पूर्ण झाल्याचे सूचित केले जाते. क्रियापद शक्यतो ऊन/हून झाला/झाली या प्रकारचे असते. उदा. त्याचा गृहपाठ करून झाला.
  • शक्य कर्मणी प्रयोग: जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदा. मुलाच्याने धावले जाते.
  • प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग: कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदा. त्याने पत्र लिहीले.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

FAQs

कर्मणी प्रयोगाचे एकूण किती उपप्रकार पडतात ?

कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.
1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग
2. नवीन कर्मणी प्रयोग
3. समापन कर्मणी प्रयोग
4. शक्य कर्मणी प्रयोग
5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग

प्रयोग म्हणजे काय?

कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला प्रयोग असे म्हणतात.

मराठी व्याकरणात वाक्याचे किती प्रकार आहे?

मराठी व्याकरणात वाक्याचे 2 मुख्य प्रकार आहे.