Table of Contents
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख व लेखी परीक्षा तारीख जाहीर : येत्या काळातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र पोलिस भरतीची मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने केलेले आहे. राज्य राखीव पोलिस बल या घटकातील महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती प्रक्रिया सन 2022-2023 ही येत्या 06 जून 2024 पासून सुरु होणार आहे.महाराष्ट्र पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीनंतर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई भरती पदासाठी लेखी परीक्षा एकाच वेळी पार पडणार आहेत. येत्या 30 ऑगस्टपूर्वी पोलिस भरतीची प्रक्रिया संपवण्याचे महाराष्ट्रातील गृहविभागाचे नियोजन आहे. तसेच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण देखील सुरू होणार आहे. उमेदवारांना या लेखात मैदानी चाचणीचा दिनांक व इतर माहिती पाहावयास मिळेल.
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी व लेखी परीक्षा तारीख : विहंगावलोकन
महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल पोलिस शिपाई भरती प्रक्रिया सन 2022-23 ही 06 जून 2024 रोजी सुरु होणार आहे. खालील टेबल मध्ये पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी व लेखी परीक्षा तारीख याचे विहंगावलोकन दिले आहे.
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी व लेखी परीक्षा तारीख जाहीर : विहंगावलोकन | |
श्रेणी | जॉब अलर्ट |
विभागाचे नाव | गृह विभाग |
भरतीचे नाव | महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी व लेखी परीक्षा तारीख |
पदाचे नाव |
महाराष्ट्र पोलीस शिपाई |
निवड प्रक्रिया | मैदानी चाचणी व लेखी परीक्षा |
मैदानी परीक्षेची तारीख | 6 जून 2024 |
लेखी परीक्षेची तारीख | 30 ऑगस्ट 2024 पूर्वी |
अधिकृत संकेतस्थळ | https://maharashtrasrpf.gov.in/ |
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख व लेखी परीक्षा तारीख PDF
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा : अभ्यासक्रम
महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे. सोबतच प्रत्येक विषयासाठी महत्वाचे घटक (Important Topics) सुद्धा खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
अ क्र | विषय | महत्वाचे घटक |
1 | गणित | संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावि आणि लसावि, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळ-काम-वेग, सरासरी, शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमाणे |
2 | बौद्धिक चाचणी | क्रमबध्द मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन |
3 | मराठी व्याकरण | मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द) |
म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले | ||
प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक | ||
4 | सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक |
मैदानी चाचणी मधील समाविष्ट बाबी :
- 5 किमी धावणे
- 100 मीटर धावणे
- गोळा फेक
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महाराष्ट्र महापॅक