Marathi govt jobs   »   Study Materials   »   राजकीय पक्ष | Political Party

राजकीय पक्ष | Political Party : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ?

सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील ही अत्यंत मुद्देसूद सिरीज आहे.  पाठ्यपुस्तक  अभ्यास प्रक्रियेत  एक महत्त्वपूर्ण आणि महत्वाची भूमिका बजावत असतात.जर विद्यार्थ्याला आपल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करायची असेल, तर आपल्याला शाळेनंतर स्वत: चा अभ्यास देखील सुरू करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांना महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यास करण्यासाठी ADDA 247 खास तुमच्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज घेऊन आलो आहे.  ज्याद्वारे  तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी ADDA247 च्या माध्यमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी  फायदेशीर ठरेल. महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे. या सिरीज मधून संपूर्ण परीक्षाभिमुख अभ्यास साहित्य प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज उपयुक्त तसेच यशदायक ठरेल व याने तुमचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास नक्कीच बळ मिळेल. चला तर मग आजचा टॉपिक अभ्यासूया.

राजकीय पक्ष | Political Party : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series

राष्ट्रीय पक्ष – राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या पुढील निकषांची पूर्तता व्हावी लागते.

(अ) चार किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान ६% वैध मते मिळवणे आवश्यक असते. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून किमान चार सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजेत.

किंवा
(ब) एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान २% मतदारसंघांमधून तसेच किमान तीन राज्यांमधून उमेदवार निवडून येणे
आवश्यक असते.

राजकीय पक्ष | महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज PDF डाउनलोड करा

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : 

राजकीय पक्ष | Political Party : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_3.1

  • १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.
  • स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी करणारी चळवळ होती. 
  • स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस एकसर्वांत प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला.
  • धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास,दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी’समान हक्क, व्यापक समाजकल्याण’ हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. 
  • लोकशाही समाजवाद,आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यांवर यापक्षाचा विश्वास आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष : राजकीय पक्ष | Political Party : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_4.1

  • मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्याया पक्षाची स्थापना १९२५ साली झाली.
  • भारतातला हा एक जुना पक्ष आहे.
  • मजूर,कष्टकरी वर्ग व कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो.
  • या पक्षाचाभांडवलशाहीला विरोध आहे.
  • १९६० च्या दशकात चीन व सोव्हिएट युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे, यावरून या पक्षातील नेत्यांमध्येवैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली व त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) हा पक्ष १९६४ साली स्थापन झाला.

भारतीय जनता पक्ष राजकीय पक्ष | Political Party : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_5.1

  • भारतीय जनता पक्षहा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष आहे.
  • भारतीय जनसंघ हा पक्ष १९५१ मध्ये स्थापन झाला.
  • १९७७ मध्ये स्थापनझालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला, परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फारकाळ टिकले नाही.
  • पक्ष फुटला व त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने १९८० मध्ये नवा पक्ष स्थापन केला.
  • प्राचीनभारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे अशीया पक्षाची भूमिका आहे. 

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) :राजकीय पक्ष | Political Party : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_6.1

  • धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा आदर करतो.
  • साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे.
  • कामगार,शेतकरी, शेतमजूर यांच्याहितसंबंधांची जपणूक करणे हे या पक्षाचे धोरण आहे.

बहुजन समाज पक्ष :राजकीय पक्ष | Political Party : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_7.1

  • बहुजन समाज पक्ष समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे.
  • बहुजनांचे हित हे या पक्षाचेउद्दिष्ट असून १९८४ साली या पक्षाची स्थापना झाली.
  • दलित, आदिवासी,इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्य यांचा समावेश ‘बहुजन’ या शब्दात होतो.
  • बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : राजकीय पक्ष | Political Party : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_8.1

  • काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १९९९ मध्ये झाली.
  • लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर पक्षाचा विश्वास आहे.
  • काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष १९९९ ते२०१४ पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता.
  • तसेच केंद्रामध्येही २००४ ते २०१४ इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा एक घटक पक्ष होता.

तृणमूल काँग्रेस :राजकीय पक्ष | Political Party : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_9.1

  • ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना १९९८ मध्ये झाली.
  • २०१६ मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली.
  • लोकशाही,धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचे धोरण आहे.

प्रादेशिक किंवा राज्यपातळीवरील पक्ष

प्रादेशिक किंवा राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष स्पष्ट केले आहेत.
(अ) लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान ६% मते मिळवणे आणि किमान दोन सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते.
किंवा
(ब) विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान ३% जागा किंवा किमान ३ जागा प्राप्त करणे आवश्यक आहे.

काही प्रमुख प्रादेशिक किंवा राज्यपातळीवरील पक्ष

राजकीय पक्ष | Political Party : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_10.1

राजकीय पक्ष | Political Party : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_11.1

राजकीय पक्ष | Political Party : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_12.1

राजकीय पक्ष | Political Party : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_13.1

राजकीय पक्ष | Political Party : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_14.1

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series

टॉपिक  संदर्भ  वेब लिंक अँप लिंक
वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव 11 वी इतिहास (जुने) लिंक लिंक
भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग 10 वी भूगोल लिंक लिंक

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!