Table of Contents
महाराष्ट्राचे राजकीय स्थान
या लेखात आपण महाराष्ट्रातील जिल्यांचे स्थान व सीमा, तसेच कोणते जिल्हे कोणत्या राज्यांना लागून आहेत आणि सागरी किनारा कोणत्या राज्यांना आणि किती लाभलेला आहे याची माहिती घेऊ.
महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांना शेजारील राज्यांच्या सिमा लागून आहे.
छत्तीसगड (2) : गोंदिया, गडचिरोली
मध्यप्रदेश (8) : नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया.
कर्नाटक (7) : नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग
गोवा(1) : सिंधुदूर्ग
तेलंगणा (4) : गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड
गुजरात(4) : पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार
दादरा नगर हवेली(1) : पालघर
महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्यप्रदेश राज्याशी संलग्न आहे तर सर्वात कमी सीमा गोवा राज्याशी सलग्न आहे.
सलग दोन राज्यांना लागून असणारी जिल्ह्यांची सीमा:
- नंदुरबार– गुजरात व मध्य प्रदेश
- धुळे– गुजरात व मध्य प्रदेश
- गडचिरोली– छत्तीसगड व तेलंगणा
- गोंदिया– मध्य प्रदेश व छत्तीसगड
- सिंधुदुर्ग– गोवा व कर्नाटक
- नांदेड– तेलंगणा व कर्नाटक
- पालघर– दादर व नगर हवेली व गुजरात
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
सिमावर्ती भागात नसलेले महाराष्ट्रातील 11 जिल्हे, ज्यांना समुद्रकिनारा किंवा कोणत्याही राज्याची सिमा लागलेली नाही:
1.वर्धा 2.अकोला 3.वाशिम 4.हिंगोली 5.परभणी 6.जालना 7.बीड 8.औरंगाबाद 9.अहमदनगर 10.पुणे 11.सातारा
महाराष्ट्राला 720 किमी चा सागरी किनारा लाभलेला आहे.
किनारपट्टीच्या लांबीनुसार जिल्ह्यांचा क्रम:
- रत्नागिरी (237 किमी)
- रायगड (122 किमी)
- सिंधुदुर्ग(120 किमी)
- मुंबई (उपशहर) (114 किमी)
- पालघर (102 किमी)
- ठाणे (25 किमी)
आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक
IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मराठी मध्ये मासिक चालू घडामोडी, Download करा