Table of Contents
राष्ट्रपतींचे अधिकार आणि कार्य: आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य
राष्ट्रपतींचे अधिकार आणि कार्य– महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये राष्ट्रपतींचे अधिकार आणि कार्य यावर हमखास प्रश्न विचारल्या जातात. आगामी आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा Topic आहे. आज आपण या लेखात राष्ट्रपतींचे अधिकार आणि कार्य विषयी माहिती पाहणार आहोत.
राष्ट्रपतींचे अधिकार आणि कार्य: विहंगावलोकन
राष्ट्रपतींचे अधिकार आणि कार्य: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
विषय | भारतीय राज्यघटना |
उपयोगिता | आदिवासी विकास विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी |
लेखाचे नाव | राष्ट्रपतींचे अधिकार आणि कार्य |
लेख तुम्हाला काय प्रदान करतो? |
|
राष्ट्रपती हे भारताचे ‘राज्य प्रमुख’ असून सर्व कारभार त्यांच्या नावाने चालविला जातो. राष्ट्रपती भारताचे प्रथम नागरिक असून ते देशाची एकता, एकात्मता व अखंडता यांचे प्रतिक असतात. कलम 52 मध्ये ‘भारताचा एक राष्ट्रपती असेल’ अशी तरतूद करण्यात आली आहे. जरी भारतीय राज्यघटनेच्या कलम 53 मध्ये असे नमूद केले आहे की राष्ट्रपती आपल्या अधिकारांचा प्रत्यक्ष किंवा अधीनस्थ अधिकाराने वापर करू शकतात, काही अपवाद वगळता, सर्व कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींना दिलेले आहेत.
राष्ट्रपती संबंधातील महत्वाची कलमे
राष्ट्रपती संबंधातील महत्वाच्या कलमांचा आढावा :
राष्ट्रपती (President) संबंधातील महत्वाची कलमे | कलमे |
भारताचे राष्ट्रपती (President) | 52 |
संघशासनाचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींकडे असेल | 53 |
राष्ट्रपतींची निवडणूक (President’s Election) | 54 |
राष्ट्रपतीं पदाची निवडणुकीची पद्धत | 55 |
राष्ट्रपतींचा कार्यकाळ | 56 |
राष्ट्रपती पदासाठी पात्रता | 58 |
राष्ट्रपती पदाची शपथ (President’s Oath) | 60 |
राष्ट्रपतींवरील महाभियोगाची कार्यपद्ध | 61 |
राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार | 72 |
राष्ट्रपतींना प्राप्त नकाराधिकार | 111 |
राष्ट्रपतींचा अध्यादेश / वटहुकूम जारी करण्याचा अधिकार | 123 |
सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. | 143 |
राष्ट्रपतींची कार्ये:
- संकटकालीन परिस्थिती निर्माण झाल्यावर राष्ट्रीय आणीबाणी घोषित करणे.
- आर्थिक आणीबाणी जाहीर करणे.
- लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करून विधेयकाचे कायदयात रूपांतर करणे.
- संसदेचे वर्षातून दोन वेळा अधिवेशन बोलवणे.
- युद्धाची घोषणा करणे.
- अपवादात्मक परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून शिक्षा कमी करण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे.
- आवश्यकता भासल्यास विशेष किंवा संयुक्त अधिवेशन बोलावणे.
- लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी बरखास्त करणे.
- पंतप्रधानांची नेमणूक करणे व त्यांनी सुचवलेल्या व्यक्तींची मंत्रिपदावर नेमणूक करणे.
- सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करणे.
- सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा कमी करणे.
- राष्ट्रपती राजवट लागू करणे.
- संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख म्हणून पद स्वीकारणे.
- राज्यांचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची नेमणूक करणे.
भारतातील 1947 ते 2022 पर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची यादी व त्यांचा कालावधी :
Sr. No. | Name | Starting date | Closing date |
1 | डॉ. राजेंद्र प्रसाद | 26 जानेवारी 1950 | 03 मे 1962 |
2 | डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन | 03 मे 1962 | 03 मे 1969 |
3 | डॉ. झाकीर हुसेन | 03 मे 1969 | 03 मे 1969 |
4 | वराहगिरी वेंकट गिरी | 03 मे 1969 | 20 जुलै 1969 |
5 | मोहम्मद हिदायतुल्ला | 20 जुलै 1969 | 24 ऑगस्ट 1969 |
6 | वराहगिरी वेंकट गिरी | 24 ऑगस्ट 1969 | 24 ऑगस्ट 1974 |
7 | फखरुद्दीन अली अहमद | 24 ऑगस्ट 1974 | 11 फेब्रुवारी 1977 |
8 | बसप्पा दानाप्पा जट्टी | 11 फेब्रुवारी 1977 | 25 जुलै 1977 |
9 | नीलम संजीव रेड्डी | 25 जुलै 1977 | 25 जुलै 1982 |
10 | ग्यानी झैल सिंग | 25 जुलै 1982 | 25 जुलै 1987 |
11 | रामास्वामी व्यंकटरमण | 25 जुलै 1987 | 25 जुलै 1992 |
12 | शंकर दयाळ शर्मा | 25 जुलै 1992 | 25 जुलै 1997 |
13 | कोचेरिल रमण नारायणन | 25 जुलै 1997 | 25 जुलै 2002 |
14 | डॉ. एपीजे अब्दुल कलाम | 25 जुलै 2002 | 25 जुलै 2007 |
15 | प्रतिभा पाटील | 25 जुलै 2007 | 25 जुलै 2012 |
16 | प्रणव मुखर्जी | 25 जुलै 2012 | 25 जुलै 2017 |
17 | श्री राम नाथ कोविंद | 25 जुलै 2017 | 21 जुलै 2022 |
18 | द्रौपदी मुर्मू | 21 जुलै 2022 | आजपर्यंत |
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.