Marathi govt jobs   »   Study Materials   »   मराठीतील विरामचिन्हे
Top Performing

मराठीतील विरामचिन्हे: ZP भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

मराठीतील विरामचिन्हे

विरामचिन्हे: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेत मराठी विषयात अनन्यसाधारण महत्व आहे. सरळसेवा भरती जसे कि, जिल्हा परिषद भरती 2023, आरोग्य भरती 2023, नगर परिषद भरती 2023, MIDC भरती 2023 व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणावर प्रश्न विचारल्या जातात. मराठी व्याकरणाचा चांगला अभ्यास केला तर आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येतात. मराठी लिहितांना किंवा वाचतांना आपण मध्येच काही क्षण थांबतो हा विराम विविध विरामचिन्हांनी दर्शविल्या जातो. आज या लेखात आपण याच विरामचिन्हांबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

विरामचिन्हे: विहंगावलोकन

मराठीत एकूण 10 विरामचिन्हे आहेत. या लेखात विरामचिन्ह व त्याचा उपयोग याबद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.

मराठीतील विरामचिन्हे: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता जिल्हा परिषद भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
विषय मराठी व्याकरण
लेखाचे नाव मराठीतील विरामचिन्हे
लेखातील प्रमुख मुद्दे
  • विरामचिन्ह म्हणजे काय?
  • मराठीतील विरामचिन्हे
  • विरामचिन्हे व त्यांचे उपयोग

विरामचिन्ह म्हणजे काय?

संभाषण करतांना आपण थांबतो म्हणजेच विराम घेतो आणि तो चिन्हांनी दर्शविला जातो त्या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात. विरामचिन्हांचे महत्व खाली देण्यात आले आहे.

  • लिहिताना किवा वाचताना कुठे थांबायचे किती वेळ थांबायचे, कोणत्या शब्दाला जास्त महत्व द्यायचे कोणत्या शब्दाला कमी महत्व द्यायचे हे सर्व आपल्याला लिहिताना व वाचताना विराम चिन्हांच्या मदतीनेच समजून येत असते.
  • लिहिणाऱ्याच्या मनातील नेमक्या भावना काय ते आपल्याला विराम चिन्हांच्या मदतीने समजून येते.

मराठीतील विरामचिन्हे

मराठी भाषेमध्ये10 प्रकारची विरामचिन्हे आहे ती पुढीलप्रमाणे आहेत.

  • पूर्णविराम
  • अर्धविराम
  • स्वल्पविराम
  • अपूर्णविराम (उपपुर्णविराम)
  • प्रश्नचिन्ह
  • उद्गारवाचक
  • अवतरणचिन्ह
  • संयोगचिन्ह
  • अपसरण चिन्ह (डॅश) (स्पष्टीकरण चिन्ह)
  • विकल्प चिन्ह

विरामचिन्हे व त्यांचे उपयोग

मराठीतील सर्व चिन्हे व त्यांचे उपयोग खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

.क्र. चिन्हाचे नाव चिन्ह उपयोग
1 पूर्णविराम .
  • वाक्य पूर्ण झाल्यावर किंवा शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी पूर्णविराम वापरतात. उदा. राम गावाला गेला. गो. ग. आगरकर (गोपाल गणेश आगरकर)
2 अर्धविराम ;
  • दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना अर्धविराम वापरतात. उदा. विजय हुशार आहे; पण तो अभ्यास करत नाही.
3 स्वल्पविराम ,
  • एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरल्या जातो. उदा. माझ्याकडे उमा, महेश आणि रवि यांचे मोबाईल नंबर आहेत.
4 अपूर्णविराम
(उपपुर्णविराम)
:
  • वाक्याच्या शेवटी तपशील घावयाचा असल्यास अपूर्णविरामाचा वापर होतो. उदा. पुढील आसन क्रमांकाचे उमेदवार उत्तीर्ण झाले: 5,7,9,12,15,18
5 प्रश्नचिन्ह ?
  • प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरल्या जाते. उदा. गोपाल कोठे गेला?
6 उद्गारवाचक चिन्ह !
  • उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणार्‍या शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक वापरल्या जाते. उदा. बापरे! केवडा मोठा साप!
7 अवतरणचिन्ह ” ”     ‘ ‘
  • दुहेरी अवतरणचिन्ह बोलणार्‍याला तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता वापरतात.
  • एकेरी अवतरणचिन्ह एखाधा शब्दावर जोर लावायचा असल्यास किंवा दुसर्‍याचे मत अप्रत्येक्षपणे सांगतांना वापरतात. उदा. तो म्हणाला, “मी बाहेर जाईन.”
8. संयोगचिन्ह
  • दोन शब्द जोडतांना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोगचिन्ह वापरतात, उदा. क्रिडा-संकुल
9 अपसरण चिन्ह
(डॅश)
(स्पष्टीकरण चिन्ह)
  • बोलतांना विचारमाला तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास अपसरण चिन्ह वापरतात.
10 विकल्प चिन्ह /
  • एखाधा शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोन शब्दांमध्ये हे चिन्ह वापरतात. उदा. मी रेल्वेने/बसने जाईन.
जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

मराठी व्याकरण या विषयावर इतर महत्वाचे लेख

महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा भरती साठी मराठी व्याकरणावर अड्डा247 ने एक लेखमालिका सुरु केली आहे. दररोज यात नवनवीन घटकांची भर पडत आहे. मराठी व्याकरणाचे इतर महत्वाचे लेख पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

घटक लिंक
मराठी शब्दसंपदा येथे क्लिक करा
मराठी व्याकरणाची ओळख येथे क्लिक करा
संधी येथे क्लिक करा
नाम येथे क्लिक करा
सर्वनाम येथे क्लिक करा
विशेषण येथे क्लिक करा
क्रियापद येथे क्लिक करा
काळ येथे क्लिक करा
क्रियापदाचे अर्थ येथे क्लिक करा
क्रियाविशेषण अव्यय येथे क्लिक करा
शब्दयोगी अव्यय येथे क्लिक करा
उभयान्वयी अव्यय येथे क्लिक करा
केवलप्रयोगी अव्यय येथे क्लिक करा
प्रयोग येथे क्लिक करा
समास येथे क्लिक करा
वाक्याचे प्रकार येथे क्लिक करा
शब्दसिद्धी येथे क्लिक करा

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

मराठीतील विरामचिन्हे: जिल्हा परिषद भरती 2023 साठी अभ्यास साहित्य_5.1

FAQs

मराठीत एकूण किती विरामचिन्हे आआहेत?

मराठीमध्ये एकूण 10 विरामचिन्हेआहेत

दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना कोणते चिन्ह वापरल्या जाते?

दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना अर्धविरामाचा वापर केल्या जातो.

उद्गारवाचक चिन्ह कधी वापरल्या जाते?

उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणार्‍या शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरतात.

एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते चिन्ह वापरल्या जाते?

एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविरामाचा वापर केल्या जातो.