Marathi govt jobs   »   Job Notification   »   सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023
Top Performing

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023, अर्ज करण्याची शेवटची तारीख

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023: आज दिनांक 06 नोव्हेंबर 2023 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने गट ब, गट क आणि गट ड च्या 14 संवर्गातील एकूण 2109 पदांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. या लेखात आपण सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 संदर्भातील अधिसुचना, रिक्त पदे, पात्रता निकष आणि इतर बाबींबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023: विहंगावलोकन

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अंतर्गत 14 संवर्गातील एकूण 2109 पदांसाठी सरळसेवा भरती होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन
भरतीचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023
पदाचे नाव
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • लघुलेखक उच्चश्रेणी
  • लघुलेखक निम्नश्रेणी
  • उद्यान पर्यवेक्षक
  • सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
  • स्वच्छता निरीक्षक
  • वरिष्ठ लिपिक
  • प्रयोगशाळा सहाय्यक
  • वाहनचालक
  • स्वच्छक
  • शिपाई
एकूण रिक्त पदे 2109
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ http://mahapwd.gov.in/

 

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अधिसुचना

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023: सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लघुलेखक उच्चश्रेणी, लघुलेखक निम्नश्रेणी, उद्यान पर्यवेक्षक, सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहनचालक, स्वच्छक आणि शिपाई या पदांसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अंतर्गत एकूण 2109 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अधिकृत अधिसूचना खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अधिसूचना लिंक

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 महत्वाच्या तारखा: सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 ते 06 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. उमदेवार सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासू शकतात.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम  तारीख 
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अधिसुचना 14 ऑक्टोबर 2023
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 16 ऑक्टोबर 2023
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 रिक्त जागांचा तपशील

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023: उमदेवार सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांच्या रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात पाहू शकतात.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
पदाचे नाव  एकूण जागा 
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 532
कनिष्ठ अभियंता (विद्युत) 55
कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ 5
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1378
लघुलेखक उच्चश्रेणी 8
लघुलेखक निम्नश्रेणी 2
उद्यान पर्यवेक्षक 12
सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ 9
स्वच्छता निरीक्षक 1
वरिष्ठ लिपिक 27
प्रयोगशाळा सहाय्यक 5
वाहनचालक 2
स्वच्छक 32
शिपाई  41
एकूण 2109

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 पात्रता निकष

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 पात्रता निकष: सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 मध्ये जाहीर झालेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या तत्क्त्यात दिली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 पात्रता निकष 
पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता 
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली सिव्हील अँन्ड रुरल इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग अँड रुरल रिकन्स्ट्रक्शन, ट्रान्स्पोर्टशन इंजिनिअरिंग, कंन्ट्रक्शन टेक्नोलॉजी, सिव्हील अँड एनवायरमेंटल इंजिनिअरिंग अशी अर्हता धारण केलेली असावी.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • विद्युत अभियांत्रिकीमधील तीन वर्षाची पदविका धारण केलेली असेल किंवा शासनाने जाहिर केलेली त्याच्याशी समतुल्य असलेली इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक (पॉवर सिस्टम) अशी अर्हता धारण केलेली असावी.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेली असावी.
  • कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर, नवी दिल्ली यांचे नोंदणीकृत सदस्य असावे.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • शासनाकडून किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून घेण्यात येणारी किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक वर्ष मुदतीची पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण, किंवा शासनाने वेळोवेळी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्रॉफ्टसमन (वास्तुशास्त्रीय आरेखक) पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक) पाठ्यक्रम उत्तीर्ण अशी अर्हता धारण केलेली असावी.
  • स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविकाधारक/पदवीधारक / पदव्युत्तर अशी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार पात्र ठरतात.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
लघुलेखक उच्चश्रेणी
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
लघुलेखक निम्नश्रेणी
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
उद्यान पर्यवेक्षक
  • कृषी किंवा उद्यानविद्या यातील पदवी धारण केलेली असावी आणि
  • निवासी जागे भोवतीची उद्याने किंवा इतर कोणतीही सार्वजनिक किंवा खाजगी उद्याने किंवा रोपवाटीका (नर्सरी) यांची किंवा या तिन्हींची निगा राखण्याच्या व विकास कामाचा तसेच सार्वजनिक उद्यानात व रस्त्याच्या कडेने झाडे लावणे या कामाचा किंवा बागकामाशी संबंधित अन्य कोणताही किमान 2 वर्ष कालावधीचा प्रत्यक्ष अनुभव धारण केलेला असावा. या अनुभवाचे प्रमाणपत्र संबंधित मालक, जनरल मॅनेजर, विभाग प्रमुख किंवा नियुक्ती प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले असावे.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
  • दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेली असावी.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
स्वच्छता निरीक्षक
  • दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • (महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कायदा 1965 (एमएएच एक्सएलआय ऑफ 1965) अंतर्गत विभागीय मंडळाने विहित केलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा आणि शासनाने त्या परिक्षेची समकक्ष ठरविलेली दुसरी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असावा).
  • संचालक, सार्वजनिक आरोग्य यांची मान्यताप्राप्त किंवा शासनाने तिच्याशी समकक्ष ठरविलेली स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्राची परीक्षा उत्तीर्ण असावा. III. जे उमेदवार स्वच्छता अभियांत्रिकी पदवीका धारण करीत आहेत, अशा उमेदवारांना पसंतीक्रम देण्याचा विचार करण्यात येईल.
  • पोट कलम II आणि III मध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणारे आणि वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांना कार्यमग्न ठेवून, स्वच्छतेची कामे करुन घेण्याचा अनुभव 5 वर्षापेक्षा कमी नाही असे उमेदवार.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
वरिष्ठ लिपिक
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
प्रयोगशाळा सहाय्यक
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • विज्ञान शाखेतील पदवीधर (रसायनशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन) किंवा कृषी शाखेतील पदवी धारण केलेली असावी.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
वाहनचालक
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • मोटार वाहन अधिनियम, 1988 (1988 चा 59 मधील तरतूदीनुसार सक्षम अनुज्ञप्ती प्राधिकारी यांनी दिलेला हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना धारण केलेला असावा.
  • शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालविण्याचा 3 वर्षाहून कमी नाही इतक्या कालावधीचा अनुभव धारण केलेला असावा.
  • ज्यांचा वाहन चालविण्याचा स्वच्छ अभिलेख आहे व ज्यांचेकडे चांगली शारिरीक क्षमता असावी.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
स्वच्छक
  • शासनाने किंवा इतर समतुल्य व सक्षम प्राधिकान्याने मान्यता दिलेल्या इयत्ता सातवीमधून बढती दिलेली असावी.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
शिपाई 
  • दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अर्ज लिंक 

आज दिनांक 06 नोव्हेंबर 2023 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन लगेचच आपला अर्ज सादर करा.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अर्ज लिंक

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 निवड प्रक्रिया

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023: सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 साठी सर्व उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा होईल.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अर्ज शुल्क  

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अर्ज शुल्क  : सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अर्ज शुल्क खाली दिले आहे.

  • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी : रु 1000 /-
  • मागासवर्गीय/आ.दृ.घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी: रु. 900/-
  • माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुक्ल आकारले जाणार नाही.

PWD भरती अभ्यासाचे नियोजन कसे करावे?

PWD भरतीसाठी अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी खालील सर्व मुद्यांचा विचार केला पाहिजे. सोबतच अड्डा247 मराठीने आपणासाठी परिपूर्ण स्टडी प्लॅन जाहीर केला आहे. ज्याचा आधार घेऊन आपण आपल्या अभ्यासाला गती देऊ शकता. PWD भरती स्टडी प्लॅन खाली देण्यात आला आहे. 17 ऑक्टोबर 2023 पासून आम्ही खाली तक्त्यात प्रत्येक दिवशी विषयानुसार स्टडी प्लॅन नुसार अभ्यास साहित्य उपलब्ध करून देणार आहोत. त्या संबंधी सर्व लिंक या लेखात अपडेट केल्या जातील त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.

1. परीक्षेच्या स्वरूप व अभ्यासक्रमबद्दल सखोल माहिती मिळावा: PWD भरतीसाठी आपल्याला अद्ययावत परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रमाबद्दल माहिती मिळवणे आवश्यक आहे. अभ्यासासाठी प्राथमिकता असलेल्या विषयांची झाल्यावरच आपल्याला काय वाचावे याबद्दल माहिती मिळते. आपल्याला जो विषय कठीण वाटतो त्याचा सुरवातीला जास्त अभ्यास करा.

2. विषयाचा सखोल अभ्यास: एकदा अभ्यासक्रम माहिती झाल्यावर आपल्याला प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करावा लागतो. त्याने आपल्या पाया मजबूत होतो. यासाठी विषयानुसार कोणत्या दिवशी काय वाचावे यासाठी अड्डा247 मराठीने आपणासाठी 45 दिवसांचा स्टडी प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. या स्टडी प्लॅन नुसार आपणास दिनांक 17 ऑक्टोबर 2023 पासून रोज माहिती अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचा अभ्यास करून आपण आपल्या अभ्यासाला गती मिळवून देवू शकता.

महाराष्ट्र PWD सिव्हील इंजिनिअरिंग 2023 सिलेक्शन बॅच

PWD सिव्हील इंजिनियरिंग
PWD सिव्हील इंजिनियरिंग

3. मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास: अभ्यासासोबत PWD भरतीच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका प्राप्त करा आणि त्याचे प्रश्नांचा अभ्यास करा. प्रश्नपत्रिकांचे अभ्यास करून आपल्याला प्रश्नपत्रिकेतील विषयांची प्राथमिकता आणि प्रश्न प्रकार याबद्दल आपल्याला माहिती मिळेल.

4. मॉक टेस्ट सोडवा: PWD भरतीसाठी योग्य मॉक टेस्ट सोडवणे खूप महत्वाचे आहे. मॉक टेस्टच्या माध्यमातून आपण वेळेचे नियोजन कसे करावे याबद्दल माहिती मिळते. PWD भरतीसाठी ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवणे फार आवश्यक आहे. तरच आपला वेळेवर गोंधळ होणार नाही. यासाठी अड्डा247 मराठीने आपणासाठी महाराष्ट्र PWD JE सिव्हील इंजिनिअरिंग 2023 टेस्ट सिरीज लाँच केली आहे. ज्यात तुम्हाला एकूण 45 टेस्ट सोडवायला मिळणार आहेत, ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.

महाराष्ट्र PWD JE सिव्हील इंजिनिअरिंग 2023 टेस्ट सिरीज बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

5. अभ्यास प्रश्नसंच: PWD भरतीसाठी सरावासाठी आपल्याला नवीन पॅटर्न नुसार प्रश्नसंच सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण सर्व प्रकारच्या प्रश्नाची तयारी व केलेल्या अभ्यासाचे पुनर्विलोकन (रिव्हिजन) करू शकता.

6. अभ्यासाचे व्यवस्थापन करा: PWD भरतीसाठी अभ्यास करण्यासाठी आपल्याला नियमित वेळेत संबंधित विषय वाचणे गरजेचे आहे. तरच आपण अभ्यासाचे योग्य नियोजन करू शकतो.

नागपूर कोतवाल भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

MPSC गट क मुख्य परीक्षा अधिसूचना 2023 MITL भरती 2023
कृषी विज्ञान केंद्र सोलापूर भरती 2023 NHM छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) भरती 2023
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023 इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023
PMRDA भरती 2023 NHM सिंधुदुर्ग भरती 2023
MSRTC धुळे भरती 2023 BEL भरती 2023
मंत्रिमंडळ सचिवालय भरती 2023 NHM उस्मानाबाद भरती 2023
NHM जालना भरती 2023 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023
भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 महापारेषण भरती 2023
धुळे पोलीस पाटील भरती 2023 धुळे कोतवाल भरती 2023
GRSE भरती 2023 AIASL भरती 2023
ESIC महाराष्ट्र भरती 2023 GP पारसिक सहकारी बँक भरती 2023
BEML भरती 2023 रत्नागिरी कोतवाल भरती 2023
जळगाव महानगरपालिका भरती 2023 नाशिक पोलीस पाटील भरती 2023
नाशिक कोतवाल भरती 2023 SBI PO अधिसूचना 2023
ICG भरती 2023 MSRLM भरती 2023
महापारेषण पुणे भरती 2023 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भरती 2023
SSC GD अधिसूचना 2023-24 CPCB भरती 2023
रेल्वे क्रीडा कोटा भरती 2023 NFC भरती 2023
IRCTC मुंबई भरती 2023 IHBL भरती 2023
MPSC प्राध्यापक भरती 2023 जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023
सैनिक स्कूल सातारा भरती 2023
हेड क्वार्टर सदर्न कमांड भरती 2023
MUCBF भरती 2023 MPKV राहुरी भरती 2023
SBI SCO भरती 2023 पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग भरती 2023
MPSC गट ब मुख्य परीक्षा 2023 पूर्व रेल्वे भरती 2023
कृषी सेवक भरती 2023 IDBI कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक भरती 2023
MGNREGA हिंगोली भरती 2023 RBI सहाय्यक अधिसूचना 2023
NSIC AM भरती 2023 PGCIL भरती 2023
CG एपेक्स बँक भरती 2023 MPSC विभागीय PSI अधिसूचना 2023
MGNREGA कोल्हापूर भरती 2023 MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र PWD JE सिव्हील इंजिनिअरिंग 2023 टेस्ट सिरीज
महाराष्ट्र PWD JE सिव्हील इंजिनिअरिंग 2023 टेस्ट सिरीज

Sharing is caring!

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023, विविध संवर्गातील 2109 पदांसाठी भरती जाहीर._6.1

FAQs

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 ची अधिसुचना कधी जाहीर झाली?

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 ची अधिसुचना 14 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झाली.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अंतर्गत किती पदांसाठी भरती जाहीर झाली आहे?

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अंतर्गत 2109 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.