Table of Contents
राजर्षी शाहू महाराज
Title | Link | Link |
MPSC परीक्षा 2024 – अभ्यास योजना | MPSC Exam 2024 – Study Plan | अँप लिंक | वेब लिंक |
राजर्षी शाहू महाराज (1874-1922)
- जन्म: लक्ष्मी विलास पॅलेस, कोल्हापूर
- वडील: जयसिंगराव घाटगे
- आई: राधाबाई
- आधीचे नाव: यशवंतराव
- 1884: दत्तकविधान (कोल्हापूर संस्थानचे राजे शिवाजी चौथे यांच्या विधवा पत्नी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतले)
- 1885-1989: राजकोटच्या रात्रपुत्रांसाठीच्या कॉलेजात 4 वर्ष शिक्षण (प्रिंसिपल – मॅकनॉटन)
- 1890-94: धारवाडला I.C.S. अधिकारी फ्रेझर द्वारे शिक्षण.
- 1894: राजकारणाची सूत्रे हातात घेतली.
- 1902: केंब्रिज विद्यापीठाकडून L.L.D. पदवी.
- इंग्रज सरकारकडून मिळालेले सन्मान: G.C.S.I., M.E.O.C., G.C.I.E.
राजर्षी शाहू महाराज: महत्त्वाच्या घटना
- 1888: शाहू महाराज यांच्या हस्ते कोल्हापूर – मिरज रेल्वे मार्गाची पायाभरणी.
- 1895: शाहूपुरी व्यापारी पेठ स्थापन केली.
- स्त्री शिक्षण खात्याची अधिक्षक म्हणून सौ. राधाबाई उर्फ रखमाबाई केळवकर यांची नेमणूक केली.
- 1899: पंचगंगा घाट प्रसंग. त्यामुळे पंचगंगा घाट सर्वांना खुला झाला.
- 1901: वेदोक्त प्रकरण: शाहू महाराज स्वत: क्षत्रिय असून त्यांना वेदोक्त मंत्र श्रवणाचा अधिकार नाकारणारे उन्मत्त राज पुरोहित राजपाध्ये यांचे इनाम व अधिकार शाहू महाराजांनी काढून त्यांची पदावरून हकालपट्टी केली. या प्रकरणात लोकमान्य टिळकांनी सनातनी लोकांची बाजू घेऊन शाहू महाराजांवर टीका केली.
- 1905: उदगाव पीठाच्या शंकराचार्यांनी वेदोक्त प्रकरणात महाराजांची भूमिका मान्य केली.
- 1906: शाहू स्पिंनिंग अँड वेव्हिंग मिल (शाहू मिल) स्थापन केली.
- 1907: कोल्हापूरात सहकारी तत्वावर कापड गिरणी स्थापन केली.
- 1907: राधानगरी धरणाची योजना. पत्नी लक्ष्मीबाईंच्या हस्ते लक्ष्मीबाई तलावाची पायाभरणी केली व त्याला लक्ष्मीबाई तलाव नाव दिले.
- 1908: इचलकरंजी येथे जिंनिंग फॅक्टरी स्थापन केली.
- 1919: डॉ. कुर्तकोटी यांची करवीर पीठाच्या शंकराचार्य पदावरून हकालपट्टी केली.
राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले कायदे
- 1897: दुष्काळात सारा माफिया कायदा.
- 1902: भरतीत मागासवर्गीयांसाठी 50% जागा राखीव.
- 1905: सरकारी नोकरांनी आपल्या व नातलगांच्या नावाने धंदा करू नये, मालमत्ता विकत घेऊ नये, यासाठी कायदा केला.
- 1911: महारांच्या वतनी जमिनी रयतावा म्हणून परत केल्या.
- 1911: आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना फी माफ केली.
- 1917: विधवा विवाह कायदा केला. तसेच विवाह नोंदणी सर्वांना सक्तीची केली.
- 1917: कारभारात मोडी लीपीचा वापर बंद करून बाळबोध लिपीचा वापर सुरू केला.
- 1917: सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला.
- 1918: कोल्हापूरात बलुतेदारी पद्धत बंद केली.
- 1918: आंतरजातीय व मिश्र विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.
- 1918: महार वतन रद्द केले.
- 1918: कुलकर्णी व ग्रामजोश्यांची वतने रद्द करून त्या जागेवर पगारी तलाठी नेमले.
- 1918: गुन्हेगार जमातीच्या लोकांना पोलिस चौकीवर द्यावी लागणारी हजेरीची पद्धत बंद केली.
- 1919: स्त्रीयांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध करणारा कायदा केला. (शिक्षा: 6 महिने कैद व 200 रुपये दंड)
- 1919: सार्वजनिक स्थळे वापरण्याचा अस्पृश्यांना हवक देणारा कायदा केला.
- 1919: 18 वर्ष वयाच्या मुलीला स्वेच्छेनुसार लग्न करता येण्याची तरतूद करणारा कायदा केला.
- 1919: घटस्फोटाचा कायदा केला.
- 1919: खाटकाला गाय विकू नये यासाठी कायदा केला.
- 1920: जोगत्या मुरळी प्रतिबंधक कायदा केला.
- 1921: शिमग्याची अनिष्ट प्रथा रद्द केली.
राजर्षी शाहू महाराज: स्थापन केलेल्या संस्था
- 1911: कोल्हापूरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. (अध्यक्ष: परशूराम घोसरवाडकर, कार्यकारी अध्यक्ष: भास्करराव जाधव)
- 1913: धार्मिक विधींचे प्रशिक्षण देण्यासाठी सत्यशोधक शाळांची स्थापना केली. (प्रमुख: विठ्ठलराव डोणे)
- 1916: निपाणी येथे डेक्कन रयत संस्था स्थापन केली. (अण्णासाहेब लठ्ठे, वालचंद कोठारी, मुकुंदराव पाटिल)
- 1918: कोल्हापूरात आर्य समाजाची शाखा सुरू केली.
- 1920: श्री शिवाजी वैदिक विद्यालयाची स्थापना केली आणि हिंदूसंहिता लागू केली.
- 1920: पारगाव येथे श्रीक्षात्रजगद्गुरु पीठाची स्थापना केली. (पहिले शंकराचार्य: सदाशिव पाटील बेनाडीकर)
राजर्षी शाहू महाराज: महत्वाच्या सभा
- 1903 आणि 1911 मध्ये इंग्रजांनी भरवलेल्या दिल्ली दरबारांना उपस्थित.
- 1917: अध्यक्ष- अखिल भारतीय मराठा शिक्षण परीषद, खामगाव.
- 1918: अध्यक्ष- परळ येथे भरलेली कामगार सभा
- 1919: सत्यशोधक समाज परीषद – कार्ले, सातारा (अध्यक्ष: केशवराव बागडे) येथे उपस्थित.
- 1919: कानपूर येथे भरलेल्या कुर्मी क्षत्रियांच्या सभेत “राजर्षी” ही पदवी प्रदान.
- 1920: माणगावची अस्पृश्यांची परिषद (अध्यक्ष: डॉ आंबेडकर) येथे उपस्थित.
- 1920: अध्यक्ष- अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद, नागपूर.
- 1920: अध्यक्ष- ब्राहमणेतर सामाजिक परिषद, हुबळी.
- 1921: अध्यक्ष- पहिली पाटील परिषद, पुणे.
- 1921: भाम्बुर्डे, शिवाजीनगर येथील शिव स्मारकाचे उद्घाटन.
- 1922: अध्यक्ष- अखिल भारतीय अस्पृश्य परीषद, दिल्ली.
राजर्षी शाहू महाराज: वृत्तपत्रांना मदत
- मूकनायक: डॉ आंबेडकर
- विजयी मराठा: श्रीपतराव शिंदे
- संदेश: अच्युत बळवंत कोल्हटकर
- जागरूक: वालचंद कोठारी
- शिवछत्रपती: किर्तीवान निंबाळकर
- राष्ट्रवीर: शामराव भोसले (बेळगाव)
राजर्षी शाहू महाराज: निधन
- फेब्रुवारी 1922: महात्मा गांधी आणि छत्रपती शाहू महाराज यांची कुरुक्षेत्र येथे भेट.
- 6 मे 1922: पन्हाळा लॉज, मुंबई येथे वयाच्या 48 व्या वर्षी निधन.
छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या कार्यामुळे सामाजिक लोकशाहिचे आधारस्तंभ तसेच हिंदी सामाजिक असंतोषाचे जनक मानले जाते.
छत्रपती शाहूंचे कार्य (थोडक्यात)
- करवीर नगरीच्या छत्रपती शाहू महाराजांना ‘राजर्षी’ हा मानाचा किताब बहाल करण्यात आला. यापूर्वी हा किताब भारतीय इतिहासात फक्त ‘विश्वामित्र’ व ‘जनक’ यांनाच दिला गेला आहे.
- त्यांचा जन्म कागल जहागिरीमध्ये 26 जून 1874 रोजी झाला.
- शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला.
- त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
- अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. 1919 साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली.
- जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.
- इ.स. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
- बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. 1916 साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापन केली.
- त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले.
- त्यांनी राधानगरी धरणाची उभारणी केली.
- शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
- गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात चहाचे दुकान काढून दिले.
- कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50 टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली.
- तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.
- त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते.
MPSC परीक्षेसाठी इतर महत्वाचे लेख
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.