Table of Contents
महाराष्ट्रातील पर्वतरांगा
महाराष्ट्रातील पर्वतरांगा: जमिनीचा उंचसखलपणा, प्रदेशाचा उतार व त्याची दिशा आणि उंची यांच्या आधारे एखादया प्रदेशाची प्राकृतिक रचना समजते. प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश व पठारी प्रदेश असे तीन प्रमुख विभाग पडतात. महाराष्ट्राचा बहुतांश भूभाग बेसाल्ट या अग्निज खडकांनी बनलेला आहे. महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलामधील एक महत्वाचा घटक म्हणजे महाराष्ट्रातील पर्वतरांगा होय.
Title | Link | Link |
MPSC परीक्षा 2024 – अभ्यास योजना | MPSC Exam 2024 – Study Plan | अँप लिंक | वेब लिंक |
महाराष्ट्रातील पर्वतरांगा: सह्याद्री पर्वत
सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. सु. 150 द.ल. वर्षांपूर्वी गोंडवनभूमी या महाखंडाचे विभाजन झाले. त्यावेळी दख्खनच्या पठाराचेही विभाजन झाले असावे. त्यामुळे आजच्या पश्र्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभंगरेषा निर्माण झाली असावी. या विभंगरेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे पठाराच्या पश्र्चिम कडेला उंची प्राप्त झाली असावी. भारतीय व्दिपकल्प पठाराची ही पश्र्चिम कडा म्हणजेच पश्र्चिम घाट होय.
सह्याद्रीचे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन भाग पडतात. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस निलगिरी पर्वत पुंजापर्यंतची श्रेणी उत्तर सह्याद्री व तेथून प्रामुख्याने पालघाट खिंडीपासूनची (खंड) दक्षिणेकडील पर्वतश्रेणी दक्षिण सह्याद्री म्हणून ओळखली जाते. पालघाट खिंडीमुळे सह्यादीची सलगता खंडित झाली आहे. उत्तर सह्याद्रीचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात येतो. महाराष्ट्रातील या पर्वतश्रेणीमुळे कोकण व देश (पश्र्चिम महाराष्ट्र) हे दोन स्वाभाविक विभाग अलग झाले आहेत.
सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावलेल्या नद्या: सह्याद्रीत उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नदयांमध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी या प्रमुख नदया आहेत. याशिवाय इतर असंख्य पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या रांगांमध्ये तसेच त्यांच्या फाटयांमध्ये उगम पावून मुख्य नदयांना जाऊन मिळतात. सह्याद्रीचे पूर्वेकडे गेलेले फाटे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या पांझरा, गिरणा, कादवा, दारणा, प्रवरा, मुळा, घोडनदी, नीरा, कोयना, वारणा, पंचगंगा इ. उपनदयांचा उगमही सह्याद्रीतच होतो.
महाराष्ट्रातील पर्वतरांगा: शंभू महादेव पर्वतरांग
शंभू महादेव पर्वतरांग ही महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख डोंगररांग आहे. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागात आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर सह्याद्री ही प्रमुख पर्वतश्रेणी उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेली आहे. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून अनेक फाटे पूर्व किंवा आग्नेय दिशेत विस्तारलेले आहेत. मुख्य महादेव रांगेपासून पुढे चंदन-वंदन, वर्धनगड आणि महिमानगड असे तीन प्रमुख फाटे किंवा सोंडी दक्षिणेस विस्तारलेल्या आहेत. त्यांपैकी चंदन-वंदन फाटा खंबाटकी घाटाच्या पूर्वेस असलेल्या हरळीपासून सुरू होऊन दक्षिणेस 35 किमी.पर्यंत कृष्णा-वसना या नद्यांच्या संगमस्थानापर्यंत पसरलेला आहे. या डोंगररांगेमुळे कृष्णा व वसना या नद्यांची खोरी अलग झाली असून चंदन आणि वंदन हे दोन डोंगरी किल्ले या रांगेच्या साधारण मध्यावर आहेत. वर्धनगड डोंगररांग खटाव तालुक्यातील मोळ या गावापासून सुरू होऊन दक्षिणेस सांगली जिल्ह्यातील कृष्णेच्या काठावरील कुंडलपर्यंत गेलेली आहे. कोरेगाव-खटाव या तालुक्यांच्या सीमेवर, या डोंगररांगेच्या एका सोंडेवर वर्धनगड (1067 मी.) किल्ला आहे. वर्धनगड डोंगररांगेमुळे कृष्णेच्या वसना-वंगना आणि येरळा या उपनद्यांची खोरी अलग झाली आहेत. वर्धनगड फाट्यास जेथून सुरुवात होते, त्याच्या पूर्वेस 14 किमी.वर महिमानगड डोंगररांग सुरू होते. हिचा विस्तार आग्नेयीस सांगली जिल्ह्यातील खानापूरपर्यंत झाला आहे. या डोंगररांगेत महिमानगड (981 मी.) हा किल्ला आहे. या रांगेमुळे येरळा व माण (माणगंगा) या नद्यांची खोरी अलग झाली आहेत. दक्षिणेकडे विस्तारलेल्या महादेव डोंगररांगेच्या सोंडीवर संतोषगड (ताथवडा) व वारूगड हे दोन किल्ले आहेत. कोरेगाव तालुक्यातील महादेव डोंगररांगेच्या फाट्यांमध्ये हर्णेश्वर, चवणेश्वर, जरंडा, नांदगिरी व चंदन या पाच टेकड्या असून त्यांतील नांदगिरी किंवा कल्याणगड, चंदन व जरंडा हे डोंगरी किल्ले आहेत.
महाराष्ट्रातील पर्वतरांगा: हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग
हरिश्चंद्र-बालाघाट पर्वतरांग ही पश्चिम-मध्य महाराष्ट्रात वायव्य-आग्नेय दिशेने पसरलेली डोंगररांग आहे. सह्याद्रीचाच एक फाटा असलेली ही रांग, अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड डोंगररांगेपासून सुरू होते. बालाघाट डोंगररांगेचे प्रमुख तीन फाटे आहेत.
पहिली रांग बीड जिल्ह्यातून पुढे परभणी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून नांदेड जिल्ह्यापर्यंत जाते. या रांगेची लांबी सु. 320 किमी, रुंदी 5 ते 9 किमी. व सस.पासून उंची सु. 600 ते 750 मी. आहे. पश्चिमेकडील भाग सर्वांत जास्त उंचीचा (चिंचोलीजवळ 889 मी.) असून पूर्वेकडे क्रमाक्रमाने उंची कमी होत जाते.
याच रांगेचा दुसरा फाटा आष्टी तालुक्यापासून (बीड जिल्हा) आग्नेयीस उस्मानाबाद जिल्ह्यातून पुढे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यापर्यंत जातो. तिसरा फाटा परभणी जिल्ह्याच्या दक्षिण भागात सुरू होऊन आग्नेयीस आंध्र प्रदेशातील निझामाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीपाशी संपतो. यांतील पहिल्या दोन डोंगररांगांदरम्यानचा पठारी भाग ‘बालाघाट पठार’ या स्थानिक नावाने ओळखला जातो.
ही डोंगररांग म्हणजे दख्खनच्या पठारावरील लाव्हापासून बनलेले व बेसाल्ट खडकांचे ठळक भूविशेष आहेत. ठिकठिकाणी सपाट डोंगरमाथ्याचा व रुंद खिंडींचा हा प्रदेश असून तो पूर्वेस भीमेच्या सखल खोऱ्यात विलीन होतो. बालाघाट डोंगररांग गोदावरी व मांजरा, भीमा या नद्यांचा जलविभाजक आहे.
महाराष्ट्रातील पर्वतरांगा: सातपुडा पर्वत
भारतीय द्वीपकल्पावरील महाराष्ट्र–मध्य प्रदेश या राज्यांदरम्यानची एक पर्वतश्रेणी. विंध्य पर्वताच्या दक्षिणेस विंध्यला साधारण समांतर अशी ही पर्वतश्रेणी आहे. मध्य भारतातील पूर्व-पश्चिम गेलेल्या या दोन पर्वतश्रेण्यांनीच उत्तर भारतीय मैदान व दक्षिणेकडील दख्खनचे पठार हे भारताचे दोन मुख्य प्राकृतिक विभाग अलग केले आहेत. गुजरातमधील अरबी समुद्रकिनाऱ्यापासून सुरू होऊन पूर्वेस महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यांपर्यंत या श्रेणीचा विस्तार आढळतो. उत्तरेकडील नर्मदा व दक्षिणेकडील तापी या एकमेकींना साधारण समांतर वाहत जाणाऱ्या दोन पश्चिमवाहिनी नद्यांच्या खचदऱ्या या श्रेणीमुळे अलग झाल्या आहेत. म्हणजेच सातपुड्याची उत्तर सीमा नर्मदेने व दक्षिण सीमा तापी-पूर्णा या नद्यांनी सीमित केली आहे.
सातपुडा पर्वतश्रेणीत असलेल्या उंच पठारी प्रदेशांतील बेतूल व मैकल ही दोन पठारे महत्त्वाची आहेत. सातपुड्याचा मध्यभाग बेतूल या लाव्हाजन्य पठाराने व्यापला असून तो उत्तरेस महादेव टेकड्यांनी, तर दक्षिणेस गाविलगड टेकड्यांनी सीमित केलेला आहे. बेतूल पठाराची उंची 1200 मी. पर्यंत वाढत गेली असून त्याचा माथा घरंगळणी स्वरूपाचा व गवताळ आहे.
महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार पर्वतरांगा
महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्या जिल्ह्यातील पर्वतरांगा खाली दिल्या आहे.
जिल्हा | पर्वतरांगा |
मुंबई | पाली, अंटोप हिल, शिवडी, खंबाला, मलबार हिल |
रायगड | रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सह्यान्द्री पर्वत |
धुळे | धानोरा, व गाळण्याचे डोंगर |
पुणे | सह्यान्द्री पर्वत, हरिश्चंद्र, शिंगी, तसुबाई, पुरंदर, ताम्हिनी, अंबाला टेकड्या |
सांगली | आष्टा, होणाई टेकड्या, शुकाचार्य, कामलभैरव, बेलगबाद, आडवा, मुचींडी, दंडोबा |
सोलापूर | महादेव पर्वत,बालाघाट डोंगर, शुकाचार्य |
जालना | अजिंठ्याची रांग, जाबुवंत टेकड्या |
हिंगोली | अजिंठ्याची रांग, हिंगोलीचे पठार |
लातूर | बालाघाटचे डोंगर |
बीड | बालाघाटचे डोंगर |
अकोला | गाविलगड टेकड्या, सातपुडा पर्वत |
अमरावती | सातपुडा पर्वत, गाविलगड च्या रांगा, पोहरा व चिकोडीचे डोंगर |
वर्धा | रावनदेव, गरमासुर, मालेगाव, नांदगाव, ब्राह्मणगाव टेकड्या |
भंडारा | अंबागडचे डोंगर, गायखुरी व भिमसेन टेकड्या |
चंद्रपूर | परजागड व चांदूरगडचे, चिमूर व मुल टेकड्या |
जळगाव | सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्तीचे डोंगर |
अहमदनगर | सह्याद्री, कळसुबाई, अदुला, बाळेश्वर, हरिश्चंद्र डोंगर |
सातारा | सह्यान्द्री, परळी, बनमौली, महादेव, यावतेश्वेर, मेंढोशी |
कोल्हापूर | सह्यान्द्री, पन्हाळा, उत्तर व दक्षिण, दुधगंगा, चिकोडी टांग |
छत्रपती संभाजी नगर | अजिंठा, सातमाळा, सुरपलायान |
परभणी | उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट रांग |
नांदेड | सातमाळा, निर्मल, मुदखेड, बलाघाटचे डोंगर |
उस्मानाबाद | बालाघाट, तुळजापूर, व नळदुर्ग डोंगर |
यवतमाळ | अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या |
बुलढाणा | अजिंठा डोंगर, सातपुडा पर्वत |
नागपूर | सतपुड्याचे डोंगर, गरमसूर, महादागड, पिल्कापर टेकड्या |
गोंदिया | नवेगाव, प्रतापगड, चिंचगड, व दरकेसाचे डोंगर |
गडचिरोली | चीरोळी, टिपागड, सिर्कोडा, सुरजागड, भामरागड, चिकियाला डोंगर |
MPSC Gazetted Civil Services Exam 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान (GS) | ||
तारीख | वेब लिंक | अँप लिंक |
2 मे 2024 | पहिले इंग्रज-मराठा युद्ध | पहिले इंग्रज-मराठा युद्ध |
3 मे 2024 | आधुनिक भारताचा इतिहास वनलायनर्स | आधुनिक भारताचा इतिहास वनलायनर्स |
4 मे 2024 | भारताचे सरकारी खाते | भारताचे सरकारी खाते |
6 मे 2024 | सिंधू संस्कृती : महत्वाचे वन-लाइनर | सिंधू संस्कृती : महत्वाचे वन-लाइनर |
7 मे 2024 | भारतातील सर्वात उंच आणि सर्वात लांब – वन लाइनर्स | भारतातील सर्वात उंच आणि सर्वात लांब – वन लाइनर् |
8 मे 2024 | भारतीय राष्ट्रीय चळवळीतील प्रसिद्ध घोषणा | भारतीय राष्ट्रीय चळवळीतील प्रसिद्ध घोषणा |
9 मे 2024 | राष्ट्रपती राजवट – कलम 356 | राष्ट्रपती राजवट – कलम 356 |
10 मे 2024 | कुतुब-उद्दीन ऐबक | कुतुब-उद्दीन ऐबक |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.