आरबीआयने सरकारी कर्जरोख्यांच्या लिलाव पद्धतीमध्ये केला बदल
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी कर्जरोख्यांच्या लिलाव पद्धतीमध्ये बदल जाहीर केला आहे. यापुढे एकसमान किंमत लिलाव पद्धतीचा वापर करून 2-वर्ष, 3-वर्ष, 5-वर्ष, 10-वर्ष, 14-वर्षे कालावधीचे आणि अस्थायी दर रोखे [फ्लोटिंग रेट बाँड (एफआरबी)] कर्जरोख्यांची विक्री करण्यात येईल. इतर स्थिरमुदत कर्जरोखे जसे 30 वर्ष आणि 40 वर्ष मुदतीच्या कर्जरोख्यांचा यापुर्वीप्रमाणेच बहुविध किमतींवर आधारित पद्धतीने लिलाव केला जाईल.
एकसमान किंमत लिलाव पद्धत:
यामध्ये सर्व यशस्वी निविदाधारकांनी नियत कर्जरोखे एकस्मान्र दराने म्हणजेच लिलावाच्या कट-ऑफ दराने विकत घेणे आवश्यक आहे, त्यांनी कोणत्या दराची बोली लावली होती हे विचारात घेतले जाट नाही.
बहुविध किमत लिलाव पद्धत:
या मध्ये यशस्वी निविदाधारकांनी नियत कर्जरोखे ज्या दराला बोली लावली होती त्या दराला विकत घेणे आवश्यक आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- आरबीआयचे 25 वे गव्हर्नर: शक्तीकांत दास
- मुख्यालय: मुंबई
- स्थापना: 1 एप्रिल 1935, कोलकाता
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा