आरबीआयने ‘रिटेल डायरेक्ट’ योजना सुरु केली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ‘आरबीआय रिटेल डायरेक्ट’ योजना सुरू केली असून त्याद्वारे ते प्राथमिक व माध्यमिक अशा दोन्ही सरकारी कर्जरोख्यांची (जी-सेक) थेट खरेदी-विक्री करू शकतात. बँक-म्युच्युअल फंड सारख्या संचालित संसाधनांच्या व्यवस्थापकांच्या पलीकडे जी-सेक्समधील किरकोळ सहभाग वाढविण्यासाठी आणि जी-सेकच्या मालकीचे लोकशाहीकरण करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून सरकारी कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक वाढावी या करता असून त्यात किरकोळ गुंतवणूकदारांना (व्यक्तींना) आरबीआयकडे ‘रिटेल डायरेक्ट गिल्ट अकाउंट’ (आरडीजी खाते) ऑनलाईन पोर्टलद्वारे उघडण्याची आणि देखभाल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- आरबीआय 25 वे गव्हर्नर: शक्तीकांत दास
- मुख्यालय: मुंबई
- स्थापना: 1 एप्रिल 1935, कोलकाता
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा