Table of Contents
कोळी,भिल्ल व रामोश्यांचे बंड
कोळी,भिल्ल व रामोश्यांचे बंड : आगामी काळातील MPSC भरती परीक्षा 2024 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने इतिहास या विषयातील कोळी,भिल्ल व रामोश्यांचे बंड हा टॉपिक फार महत्वाचा आहे. आज या लेखात आपण कोळी,भिल्ल व रामोश्यांचे बंड बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोळी,भिल्ल व रामोश्यांचे बंड : विहंगावलोकन
कोळी,भिल्ल व रामोश्यांचे बंड याचे विहंगावलोकन खालील टेबल मध्ये दिलेले आहे.
कोळी,भिल्ल व रामोश्यांचे बंड: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC भरती परीक्षा 2024 व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी |
विषय | इतिहास |
लेखाचे नाव | कोळी,भिल्ल व रामोश्यांचे बंड |
लेखातील प्रमुख मुद्दे | कोळी,भिल्ल व रामोश्यांचे बंड या विषयी सविस्तर माहिती |
उमाजी नाईक यांचा उठाव
- रामोशांची वस्ती प्राधान्याने महाराष्ट्रात आढळते.
- रामोशी स्वतःला रामवंशी समजत. म्हणून या शब्दाची व्युत्पत्ती काही विद्वान ‘रामवंशी’ व काही तज्ज्ञ ‘रानवंशी’ म्हणजे रानात राहणारे अशी करतात.
- रामोशी लोक शरीराने बळकट, उंचेपुरे, बांधेसूद व राकट होते.
- निजामाच्या प्रदेशातील शोरापूरच्या राजास ते आपला प्रमुख मानत असत आणि आपल्या नावापुढे नाईक अशी संज्ञा लावत असत.
- रामोशी लोक धाडसी व स्वतंत्र प्रवृत्तीचे होते. ते शेती, पशुपालन, किल्ल्यांचा बंदोबस्त आणि मोठ्या वाड्यांवर पहारेकरी इत्यादी कामे करत.
- ठरावीक गावांचा महसूल गोळा करण्याचा त्यांना अधिकार असे.
- इंग्रजी राजवटीत त्यांना कामावरून कमी करण्यात आले.
- त्यांची इनामेही जप्त करण्यात आली. त्यामुळे हे लोक दरोडे घालू लागले. त्यामुळे ब्रिटिश कायदे व्यवस्था धोक्यात आली.
- उमाजी नाईक हे रामोशांचे नेते होते. त्यांचा जन्म पुरंदरमधील भिवरी गावात इ. स. 1791 मध्ये झाला.
- प्रा. सदाशिव आठवले त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना म्हणतात, ‘उमाजी एकशे बासष्ट सेमी उंचीचा, मोठ्या डोळ्यांचा, वर्णाने लालसर होता. तो क्रूर नव्हता. त्याचा चेहरा सौम्य व प्रसन्न वाटे.’
- वडिलांच्या काळापासूनच उमाजी ‘पुरंदर’ किल्ल्याच्या बंदोबस्तात होता.
- भोर जवळील ‘विंग’ गावात इ. स. 1818 साली दरोडा टाकत असताना उमाजी पकडला गेला.
- उमाजीच्या अगोदर संतू नाईकाच्या नेतृत्वाखाली सर्व रामोशी समाज एकवटला होता.
- संतूच्या नेतृत्वाखाली उमाजी व त्याचा भाऊ अमृता याने भांबुडर्थ्यांचा लष्करी खजिना लुटला (इ. स. 1824-25).
- संतू – नाईकाच्या मृत्यूनंतर सर्व रामोशांचे पुढारीपण उमाजी नाईकांकडे आले.
- इंग्रजांनी उमाजी विरुद्ध (इ. स. 1826) पहिला जाहीरनामा काढला. त्यामुळे उमाजी व त्यांचा साथीदार पांडूजी यांना धरून देणाऱ्यास 100 रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
- रयत इंग्रजांच्या बाजूने बोलत नाही म्हणून दुसरा जाहीरनामा काढून जे कोणी दरोडेखोरांना साथ देतील त्यांना ठार करण्यात येईल असे जाहीर केले.
- जेजुरी, सासवड, परिंचे, भिवरी, किकवी या भागात डे त्यांनी प्रचंड लुटालूट करून सरकारला जेरीस आणले. इंग्रजांनी तिसरा जाहीरनामा काढून बक्षिसाची रक्कम 1200 रु. केली आणि जाहीर केले की ‘जो सरकारला मदत करणार नाही त्याला बेडवाल्यांचा मिलाफी समजला जाईल.’
- उमाजीने स्वत:ला ‘राजे’ म्हणवून घ्यावयास सुरुवात केली. कुठल्याही डोंगरकपारीत लोक जमत तोच त्याचा दरबार असे. त्याने इंग्रजांना आव्हान देण्यासाठी पुण्याचा कलेक्टर एच. डी. रॉबर्टसन याच्याकडे इ. स. 1827 मध्ये पुढील मागण्या केल्या.
1) इंग्रजांनी अमृता रामोशी व विनोबा यांना मुक्त करावे.
2) रामोशांची परंपरागत वतने परत करावीत.
3) पुरंदर व इतर ठिकाणी असणाऱ्या रामोशांच्या वतनाला इंग्रजांनी हात लावू नये.
- कलेक्टर रॉबर्टसनने 15 डिसेंबर 1827 रोजी जनतेसाठी जाहीरनामा काढून उमाजीला उत्तर दिले. या जाहीरनाम्याच्या द्वारे असे जाहीर केले की,
1) जनतेने रामोशांना पाठिंबा देऊ नये व सहकार्य करू नये.
2) उमाजी, भूजाजी, पांडुजी व येसाजी या बंडखोरांना पकडून देणाऱ्यास प्रत्येकी रु. 5000 बक्षीस दिले जाईल.
3) रामोशी चार परगण्यांमध्ये जनतेला त्रास देत आहे. त्यामुळे त्यांचा कठोरपणे बंदोबस्त केला जाईल.
4) रामोशांसोबत सामील झालेली कोणतीही व्यक्ती आजपासून वीस दिवसांत सरकारात हजर राहिल्यास तिला संपूर्ण माफी देण्याचा विचार केला जाईल.
5) बंडखोरांची माहिती देणाऱ्यास खास बक्षीस दिले जाईल.
- इंग्रज सरकारने उमाजीला पकडण्याची जबाबदारी कै.अलेक्झांडर व कै.मॅकिन्टॉश वर सोपवली, उमाजीशी त्यांचा पहिला संघर्ष मांढरदेवच्या डोंगरावर झाला; परंतु उमाजी इंग्रजांच्या हाती लागला नाही.
- उमाजीचे जवळचे सहकारी काळू व नाना त्याच्या विरोधात गेले. उमाजीला पकडून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. उमाजीचा जुना शत्रू बापूसिंग परदेशी यानेही त्यांना सहकार्य दिले.
- काळू व नाना यांनी विश्वासघाताने उमाजीला पुण्याच्या मुळशी जवळ आवळस येथे आणले. नानाने उत्तोळी येथे 15 डिसेंबर 1831 ला उमाजीला पकडले आणि इंग्रजांच्या स्वाधीन केले.
- उमाजीला कैद करण्यात येऊन चौकशी करण्यात आली. त्याला गुन्हेगार ठरवून 3 फेब्रुवारी 1834 ला फाशी देण्यात आली.
- एका तळागाळातील मराठी नेत्याचा हा ब्रिटिश विरोधी लढा होता. जो तत्कालीन काळात आणि पुढील काळातही सर्वांना प्रेरणादायी ठरला आहे.
कोळ्यांचे उठाव
- कोळ्यांची मुख्यतः वस्ती मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात व कोकण या भागात आहे.
- महाराष्ट्रात कोळ्यांचे साधे कोळी व डोंगरी कोळी असे भेद असून सोनकोळी, महादेवकोळी इ. पोटभेद आहेत.
- किल्ल्यांच्या बंदोबस्तामध्ये त्यांचे महत्त्वाचे स्थान होते.
- परंतु इंग्रजी राजवटीत किल्ल्यांची व्यवस्था पूर्णतः बदलली गेल्यामुळे कोळ्यांच्या नोकऱ्या गेल्या. शेतीवर उदरनिर्वाह करावा तर इंग्रजांनी जमिनी काढून घेतल्या. त्यामुळे कोळ्यांवर उपासमारीची पाळी आली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोळी इंग्रजांच्या विरोधात गेले.
कोळ्यांचे उठाव तीन टप्यांत झाले –
पहिला टप्पा –
- इ. स. 1824 च्या दरम्यान मुंबई भागात नेटिव्ह इन्फंट्रीने उठाव केला.
- तो उठाव ब्रिटिशांनी दडपला व त्या भागात शांतता निर्माण केली.
- पोलीस दलातील कोळी जमातीचा अधिकारी रामजी भांगडिया हा अत्यंत नाराज झाला.
- त्याने आपल्या पदाचा राजीनामा देऊन कोळी जमातीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
- इ. स. 1828 साली रामजी भांगडियाच्या नेतृत्वाखाली कोळयांनी उठाव केला.
- कोळ्यांचा हा दडपण्यासाठी ब्रिटिशांनी कॅ. अलेक्झांडर व मक्किन्टॉशची नियुक्ती केली.
दुसरा टप्पा –
- इ. स. 1839 ला पुण्यात उठाव केला.
- यावेळी त्यांनी दोन घोषणा केल्या. त्यामध्ये दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन पुन्हा मराठी राज्याची स्थापना झाली आहे व संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे. यावेळी सरकारी खजिना ‘घोडनदी’ येथे होता.
- ‘रोझ’ या असिस्टंट कलेक्टरने उठाव मोडून काढण्यासाठी पुणे येथून सैन्य बोलावून घेतले.
तिसरा टप्पा –
- रघु भांगडिया आणि बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे, नाशिक, नगर परिसरात उठाव केला.
- सातारा व पुरंदर भागातही या उठावाचे लोण पसरले.
- इ. स. 1845 मध्ये बापू भांगडियाला पकडण्यात आले.
- त्यांनी नाणेघाट, माळशेज घाट ताब्यात घेतले व कोकणचा मार्ग अडवला.
- के. बेल याने कोळ्यांच्या संदर्भात माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्यांची राहण्याची ठिकाणे, त्यांच्यामध्ये असलेल्या कमतरता, त्यांच्या उठावाची कारणे इ. माहिती घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्यास सुरुवात केली. प्रथम त्यांच्या नेत्यांना पकडण्यात आले. त्यांना कठोर शिक्षा दिल्या. इ. स. 1850 पर्यंत कोळ्यांच्या उठावाचा कायमचा चंदोबस्त करण्यात आला.
भिल्लांचा उठाव
- भिल्लांच्या बरहा, डागची, माऊची, वसावा, तडवी इ. जाती होत.
- लढाऊ बाणा हा भिल्लांचा मूळ पिंड होय.
- पेशवाईच्या अखेरच्या काळात खानदेशात अराजक माजले. याचा फायदा भिल्लांनी घेतला, इ. स. 1803 मध्ये उठाव केला, त्याचे स्वरूप प्रखर होते. यावेळी पेंढारी लोकांचा त्यांना पाठिंबा होता.
- इ. स. 1818 मध्ये भिल्लांनी सातमाळ, अजंठा भागात उठाव केले. यावेळी कै, बिम्ब हा या भागाचा कलेक्टर होता.
- भिल्लांच्या बंदोबस्तासाठी कें. ब्रिग्जने कें. डुसार्टची नियुक्ती केली.
- त्याने भिल्लांचा प्रमुख शेख दुल्ला यास पकडून कठोर शिक्षा दिली.
- चिडून भिल्लांनी खानदेशात जवळजवळ 100 मैलांच्या परिसरात उठाव करून शांतता भंग केली.
- त्यामुळे कॅ. ब्रिग्जने मेजर मोरीन याच्याकडे त्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली. त्याने बंड मोडून काढले.
- इ. स. 1822 मध्ये ‘हिरा’ नावाच्या भिल्लांच्या नेतृत्त्वाखाली उठाव सुरू झाले.
- इ. स. 1825 साली सेवाराम घिसाडी याच्या नेतृत्त्वाखाली भिल्लांनी पुन्हा उठावास सुरुवात केली.
- लेफ्टनंट ऑट्रम हा भिल्लांचे बंड शमवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने सेवारामला पकडले.
MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान(GS) | |
तारीख | टॉपिक |
31 डिसेंबर 2023 | जालियनवाला बाग हत्याकांड |
1 जानेवारी 2024 | गांधी युग |
3 जानेवारी 2024 | रक्ताभिसरण संस्था |
5 जानेवारी 2024 | प्राकृतिक महाराष्ट्र – कोकण किनारपट्टी |
7 जानेवारी 2024 | 1857 चा उठाव |
9 जानेवारी 2024 | प्राण्यांचे वर्गीकरण -असमपृष्ठरज्जू प्राणी |
11 जानेवारी 2024 | राज्यघटना निर्मिती |
13 जानेवारी 2024 | अर्थसंकल्प |
15 जानेवारी 2024 | महाराष्ट्र – स्थान व विस्तार |
17 जानेवारी 2024 | भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल |
19 जानेवारी 2024 | मूलभूत हक्क |
21 जानेवारी 2024 | वैदिक काळ |
23 जानेवारी 2024 | सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी |
25 जानेवारी 2024 | शाश्वत विकास |
27 जानेवारी 2024 | महर्षी कर्वे व त्यांचे कार्य |
29 जानेवारी 2024 | 1942 छोडो भारत चळवळ |
31 जानेवारी 2024 | भारतीय रिझर्व्ह बँक |
1 फेब्रुवारी 2024 | भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे |
2 फेब्रुवारी 2024 | स्वातंत्र्यापूर्वीची भारतीय अर्थव्यवस्था |
3 फेब्रुवारी 2024 | रौलेट कायदा 1919 |
4 फेब्रुवारी 2024 | गारो जमाती |
5 फेब्रुवारी 2024 | लाला लजपत राय |
MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान(GS) | |
तारीख | टॉपिक |
6 फेब्रुवारी 2024 | भारतीय राज्यघटनेचे कलम 15 |
7 फेब्रुवारी 2024 | भारतातील हरित क्रांती |
8 फेब्रुवारी 2024 | मार्गदर्शक तत्वे |
9 फेब्रुवारी 2024 | गौतम बुद्ध : जीवन आणि शिकवण |
10 फेब्रुवारी 2024 | भारतीय नियोजन आयोग आणि NITI आयोग |
11 फेब्रुवारी 2024 | भारतीय राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत |
12 फेब्रुवारी 2024 | महागाईचे प्रकार आणि कारणे |
13 फेब्रुवारी 2024 | श्वसन संस्था |
14 फेब्रुवारी 2024 | अलैंगिक प्रजनन |
15 फेब्रुवारी 2024 | सातवाहन कालखंड |
16 फेब्रुवारी 2024 | बिरसा मुंडा |
17 फेब्रुवारी 2024 | पंचायत राज समित्या |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.