75,000 रिक्त पदांच्या पदभरती प्रक्रियेला महाराष्ट्रात वेग : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, महाराष्ट्र राज्यातील 75 हजार पदांच्या रिक्त भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्या अनुषंगाने काही विभागांमार्फत पदभरतीच्या कार्यवाहीची सद्यस्थिती तपसण्यासाठीचे पाऊले आता महाराष्ट्र सरकार वेगाने उचलत आहे. त्यापैकी उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, गट-ब (अराजपत्रित) संवर्ग, मंडळ अधिकारी, तलाठी,कोतवाल, अव्वल कारकून, महसूल सहायक, लघुटंकलेखक, वाहनचालक, गट-क संवर्ग व शिपाई, गट-ड संवर्गाची विहित विवरणपत्रातील माहिती आजच सादर करण्याची विनंती सरकारकडून केली गेली आहे. या संबंधित अधिकृत सूचना खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.