Table of Contents
Police Bharti 2024 Shorts
Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police Bharti 2024 ची जाहिरात पहिली असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच महाराष्ट्रात Police Bharti 2024 होणार आहे. त्यात भरपूर जागा आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे Police Bharti 2024 Shorts. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.
पोलीस भरती 2024 अभ्यास साहित्य योजना Police Recruitment 2024 : Study Material Plan |
वेब लिंक | अँप लिंक |
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan
|
वेब लिंक | अँप लिंक |
Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन
खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला Police Bharti 2024 Shorts चे विहंगावलोकन मिळेल.
Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | महाराष्ट्र पोलीस भरती 2024 |
विषय | सामान्य विज्ञान |
टॉपिक | लाल रक्त पेशी |
लाल रक्त पेशी
- आकार – गोलाकार, द्विअंतर्वक्र (Circular, Biconcave) आणि केंद्रक नसलेल्या (Non-nucleated)
यांना Erythrocytes असे म्हणतात.आकाराने खूप लहान असतात म्हणजेच 7 मायक्रोमीटर व्यास, 2.5 मायक्रोमीटर जाडी असते. - Haemoglobin (हिमोग्लोबीन) नावाच्या घटकामुळे RBC ला लाल रंग प्राप्त होतो.
- आयुष्य – RBC 127 दिवस जगतात.
- त्या प्लीहा (Spleen) मध्ये जाऊन मरतात. (i.e. Grave Yard of RBC)
- गर्भामध्ये (Foetus) RBC या यकृतात (Liver) किंवा प्लीहा (Spleen) मध्ये तयार होतात.
- प्रौढ माणसात (Adult) RBC या अस्थिमज्जेत (Bone marrow) तयार होतात.
- RBC मधील महत्त्वाचा घटक- हिमोग्लोबिन (Hemoglobin): एका RBC मध्ये लाखो हिमोग्लोबीन असतात.
- हिमोग्लोबीनमध्ये हिम (Heme) म्हणजे लोह (Iron) व ग्लोबीन (globin) म्हणजे प्रथिन होय.
- ऑक्सिजनचे वहन हिमोग्लोबीन द्वारे केले जाते.
- सामान्यतः पुरुषामध्ये 13-18gm/100ml व स्त्रियांमध्ये 11.5-16.5gm/100ml हिमोग्लोबीनचे प्रमाण असते.
- हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे अनेमिया नावाचा रोग होतो, तर हिमोग्लोबीन जास्त झाल्यामुळे पॉलीसायथेमीया नावाचा रोग होतो.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.