Table of Contents
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग
महाराष्ट्रातील भौगोलिक समानता, भाषा, नैसर्गिक संपदा, मृदा यांच्या आधारावर एकूण 5 प्रादेशिक विभागात विभागणी होते.
1.कोकण :
क्षेत्रफळ : 30,728 चौ.कि.मी
जिल्हे : 7 (ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग)
संस्कृत शब्द कोकण यांचा अर्थ बाह्य बाजूचा तुकडा असा होतो.
महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते.
कोकण या प्रादेशिक विभागाचे क्षेत्रफळ 30,728 चौ.कि.मी. असून एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 9.98% एवढे आहे.
2.पश्चिम महाराष्ट्र :
क्षेत्रफळ: 89,855 चौ.कि.मी
जिल्हे : 7 (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व नाशिक, अहमदनगर)
सह्याद्री पर्वताच्या पुर्वेला पश्चिम महाराष्ट्राचा भाग येतो. हा भाग देश म्हणून देखील ओळखला जातो.
पश्चिम महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 89,855 चौ. कि.मी.असून एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 29.20% एवढे आहे.
3.मराठवाडा
क्षेत्रफळ : 64,813 चौ.कि.मी
जिल्हे: 8 (औरंगाबाद, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, उस्मनाबाद, नांदेड व जालना)
गोदावरी नदीच्या खोऱ्यात हा प्रादेशिक विभाग वसलेला आहे.मराठवाडा या प्रादेशिक विभागाचे एकूण क्षेत्रफळ 64,813 चौ.कि.मी.असून एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 21.08% एवढे आहे.
4.विदर्भ
क्षेत्रफळ : 97,406 चौ.कि.मी.
जिल्हे : 11 (यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, गोदिया, भंडारा)
नैसर्गिक संपदा, खनिज संपदा, डोंगररांगा इत्यादी या प्रादेशिक विभागाचे वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्राच्या पूर्वेला वर्धा, वैनगंगा, पैनगंगा इत्यादी प्रमुख नद्यांच्या खोऱ्यात विदर्भ प्रादेशिक विभाग वसलेला आहे.
विदर्भाचे एकूण क्षेत्रफळ 97,406 चौ.कि.मी.असून एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 31.65% एवढे आहे.
5.खान्देश
क्षेत्रफळ : 24,911 चौ.कि.मी
जिल्हे : 3 (धुळे, नंदुरबार, जळगाव)
खान्देश हा प्रदेश तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे. अकबराच्या राजवटीत या प्रदेशाला ‘दानदेश’ असे म्हटले जात असे.
खान्देशाचे एकूण क्षेत्रफळ 24,911 चौ.कि.मी. असून एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 8.09% एवढे आहे.
महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य
महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागाची क्षेत्रफळानुसार क्रमवारी:-
1.विदर्भ 97,406
2.पश्चिम महाराष्ट्र 89,885
3.मराठवाडा 64,813
4.कोकण 30,728
5.खान्देश 24,911