Marathi govt jobs   »   Study Materials   »   महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ
Top Performing

महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ | Revolutionary movement in Maharashtra : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ?

सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील ही अत्यंत मुद्देसूद सिरीज आहे.  पाठ्यपुस्तक  अभ्यास प्रक्रियेत  एक महत्त्वपूर्ण आणि महत्वाची भूमिका बजावत असतात.जर विद्यार्थ्याला आपल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करायची असेल, तर आपल्याला शाळेनंतर स्वत: चा अभ्यास देखील सुरू करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांना महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यास करण्यासाठी ADDA 247 खास तुमच्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज घेऊन आलो आहे.  ज्याद्वारे  तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी ADDA247 च्या माध्यमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी  फायदेशीर ठरेल. महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे. या सिरीज मधून संपूर्ण परीक्षाभिमुख अभ्यास साहित्य प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज उपयुक्त तसेच यशदायक ठरेल व याने तुमचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास नक्कीच बळ मिळेल. चला तर मग आजचा टॉपिक अभ्यासूया.

महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ

क्रांतिकारी चळवळीची खरी सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांनी महाराष्ट्रात केली. यानंतर इंग्रजांच्या जुलमी धोरणामुळे इ. स. १८९६ नंतर महाराष्ट्रीयन तरुण सशस्त्र क्रांतीकडे वळू लागले.

महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ | महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज PDF डाउनलोड करा

चाफेकर बंधूंचे बलिदान

महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ | Revolutionary movement in Maharashtra : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_3.1

  • दामोदरपंत चाफेकर, त्यांचे बंधू बाळकृष्ण व वासुदेव यांनी २२ जून १८९७ ला मध्यरात्री गणेश खिंडीत पुण्याचे कमिशनर रँड, लेफ्टनंट आयर्स्ट हे गर्व्हनरकड़ील मेजवानी आटोपून घोडागाडीतून शहरात येत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
  • ब्रिटिश अधिकाऱ्यांनी खुनाचा तपास लगवून दामोदर चाफेकरांना फाशीची शिक्षा दिली.
  • दुसरे बंधू बाळकृष्णपंत चाफेकर यांनाही पकडले व फाशी दिली.
  • द्रविड बंधूंच्या विश्वासघातामुळे आपले दोन भाऊ फाशी गेले, म्हणून वासुदेव चाफेकर यांनी द्रविड बंधूना ठार केले. त्यांच्या खुनाच्या आरोपात वासुदेव चाफेकरानाही फाशी झाली.

कोल्हापूरचा शिवाजी क्लब

  • महाराष्ट्रात यावेळी अनेक गुप्त संघटना कार्यरत होत्या.
  • त्यामुळे वर्धा व नागपूर येथे ‘आर्य बांधव समाज’ पुण्यातला ‘चाफेकर क्लब’ तसेच कोल्हापूर येथे ‘शिवाजी क्लब’ निर्माण झाला होता.
  • या क्लबच्या सभासदांनी चाफेकर बंधूंना कैद करण्यात आल्यानंतर ‘युरोपियनांचे खून करणे चांगले! चाफेकरांना तुरुंगातून मुक्त केले पाहिजे, असा प्रचारसुरू केला.
  • राजर्षी शाहूं महाराजांचे अनेक स्नेही अधिकारी देखील या क्लबचे आधारस्तंभ होते.
  • वासुदेव चाफेकर यांना पकडल्यानंतर १९फेब्रुवारी १८९९ रोजी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या-देवळावर-एक-पत्रक लटकवलेले आढळले. त्यात म्हटले होते, ‘तरुणांनो जागे व्हा, तुम्ही शस्त्रे हातात घ्या आणि ज्यांनी लो. टिळकांना तुरुंगात टाकले त्यांच्याविरुद्ध ती वापरा.’

बीडचा उठाव

  • इ. स. १८९९ ला बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व सदाशिव नीळकंठ जोशी यांनी केले.
  • या काळात त्यानी स्वतः विविध नावे स्वीकारून हा उठाव यशस्वी करण्याचा प्रयत्न केला.
  • इतिहास संशोधक य. दि. फडके यांच्या मते कोल्हापूरच्या शिवाजी क्लबशी या जोशींचे संबंध असावेत, मात्र उठाव फसल्यावर सदाशिव जोशी हे जे भूमिगत झाले ते कायमचेच. 

गुप्त संघटनांची निर्मिती 

  • इ. स. १९२० पूर्वी महाराष्ट्रात क्रांतिकारकांचे आश्रयस्थान लो. टिळक होते.
  • त्यामुळे लो. टिळकवादी गुप्त संघटना (मंडळे) महाराष्ट्रभर स्थापन झाल्या होत्या.
  • वर्धा आणि नागपूर येथे ‘आर्य बांधव-समाज’ निर्माण झाला होता. त्याचे काम श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये, अभ्यंकर इ. पाहत असत.
  • यवतमाळच्या गुप्त संघटनेत डॉ. सिद्धनाथ काणे, जनार्दन पुरुषोत्तम वाजणे, टोंगे यांचा समावेश होता.
  • अमरावतीमधील गुप्त संघटनेला दादासाहेब खापर्डेंचा आधार होता.
  • हैदराबाद येथेही नरहरपंत घारपुरे, बोरामणीकर,सातवळेकर काम करत.
  • इ. स. १९०४ ला बेळगाव येथेही गंगाधर देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली गुप्त संघटना स्थापन झाली होती.
  • महाराष्ट्रीयन क्रांतिकारकांवर वि. दा. सावरकरांच्या १८५७ चे ‘स्वातंत्र्यसमर’ आणि इटलीच्या ‘मॅझिनीचे चरित्र’ या ग्रंथांचा प्रभाव होता.

बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण

  • भारतीय क्रांतिकारकांना जपानचे विशेष आकर्षण होते.
  • आगपेट्या तयार करण्याचे तंत्रज्ञान किंवा साबण बनवण्याचा कारखाना उभा करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान मिळवण्यासाठी भारतीय तरुण जपानला जात असत. मात्र येताना बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन येत असत.
  • महाराष्ट्रातील कोल्हापूरचे के. डी. कुलकर्णी (केडबा) जपानला गेले होते; परंतु त्यांना १९१९ ला पोलिसांनी पकडून सात वर्षांची शिक्षा दिली.
  • त्यानंतर सोलापूरचे गोविंद नारायण पोतदार जपानला जाऊन आले. ते बॉम्ब तयार करण्यास शिकले होते. त्यांनी माहीम येथे कारखाना घातला होता.

नेपाळशी संबंध

  • लो. टिळकांच्या अनुमतीने नाट्याचार्य काकासाहेब खाडीलकर (कृष्णाजी प्रभाकर) हे इ. स. १९०२ ते १९०४ या कालावधीमध्ये नेपाळला वास्तव्य करून होते.
  • तेथे त्यांनी ‘शिवाजी क्लब’ चे एक कार्यकर्ते हणमंतराव कुलकर्णी यांच्या सहकार्याने बंदुका तयार करण्याचा कारखाना काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा सुगावा ब्रिटिश अधिकाऱ्यांना लागला.
  • त्यावेळी ‘कृष्णाजी प्रभाकर’ असा भाग घेणारा माणूस नाही, याचा आम्हाला विश्वास आहे, असा नेपाळच्या पंतप्रधानांनी निर्वाळा दिला. त्यामुळे खाडिलकर या प्रकरणामधून वाचले.

बडोदा संस्थान

  • १९०५ मध्ये केशवराव देशपांडे, माधवराव जाधव, अरविंद घोष व देवधा यांनी चांदोड स्टेशनजवळ ‘गंगानाथ भारतीय विद्यालय’ स्थापन केले.
  • परंतु विद्यार्थी व शिक्षक राजद्रोहात्मक कृत्य करत असल्याचा संशय आल्याने बडोद्याच्या राजप्रतिनिधीने दिवाणाकडे जाब मागितला. त्यामुळे इ. स. १९०८ साली ते विद्यालय बंद करावे लागेल. 

डॉ. सिद्धनाथ काणे 

  • हे यवतमाळच्या टिळकवादी गुप्त मंडळांतील सभासद होते.
  • ते कलकत्ता येथे वैद्यकीय शिक्षण घेत होते.
  • त्यांचा संबंध बारिंद्र घोषांच्या गुप्त संघटनेशी आला.
  • नरहर विठ्ठल भावे व नागपुरचे आबाजी पातूरकर यांच्या साहाय्याने डॉ. काण्यांनी फ्रेंचांच्या ताब्यातील चंद्रनगरहून आठ पिस्तुले, एक बंदुक व बॉम्ब बनवण्याचे साहित्य घेऊन ते यवतमाळला आणले होते.

पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट

महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ | Revolutionary movement in Maharashtra : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_4.1

  • सेनापती पांडुरंग महादेव बापट हे अमदनगर जिल्ह्यातील पारनेर गावचे.
  • ते १९०४ मध्ये लंडनला गेले.
  • महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी ‘माझ्या परतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी मी आजपासून आजीवन काया वाचा मनाने झटेन आणि तिची हाक येताच तिच्या सेवेसाठी धावत येईन. या कामी मला देहाचा होम करावा लागला तरी मी फिरून याच भारतखंडात जन्म घेईन व अपुरे राहिलेले काम करून दाखविन.’ अशी शपथ घेतली होती.
  • शामजी कृष्ण वर्मा यांच्या ‘इंडिया हाऊस’चे ते सदस्य बनले.
  • श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मदतीने सेनापती बापट बॉम्ब तयार करण्याचे तंत्र शिकण्यासाठी पॅरिसला गेले व बॉम्ब तयार करण्याचे ज्ञान आत्मसात केले.
  • त्या संबंधीची पुस्तिका त्यांनी भारतात पाठवली.
  • इंग्लडमध्ये असताना त्यांनी ब्रिटिश सत्तेवर टीका करणारा निबंध वाचला त्यामुळे त्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली.
  • लो. टिळकांच्या विनंतीवरून शामजी कृष्ण वर्मांनी बापटांना दोन हजार रुपये दिले.
  • बापट भारतात बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान घेऊन परतले. ही बातमी सरकारला मिळाल्याने बापट काही काळ भूमिगत राहिले.
  •  इ. स. १९१४ नंतर त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग सोडला आणि ते विधायक कार्याकडे वळल.

स्वातंत्र्यवीर सावरकर व अभिनव भारत संघटना

  • शालेय शिक्षण घेत असताना दामोदर चाफेकरांना झालेल्या फाशीचा त्यंच्यावर प्रभाव पडला.
  • ‘मॅझिनी’ या इटालियन देशभक्ताचाही प्रभाव होता. 
  • सावरकरांनी ‘मित्र-मेळा’ ही संस्था स्थापन केली.
  • इ. स. १९०४ मध्ये वडीलबंधू गणेश उर्फ बाबाराव सावरकर यांच्या सहकार्याने ‘अभिनव भारत’ ही क्रांतिकारी संघटना स्थापना केली.

महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ | Revolutionary movement in Maharashtra : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_5.1

 

अभिनव भारत संघटनेची उद्दिष्ट्ये – 

  1. परदेशामध्ये शस्त्रे खरेदी करून ती गुप्तपणे भारतात पाठवणे.
  2. भारतीय सैनिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध प्रचार करणे. 
  3. स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या कार्यक्रमाद्वारे लोकमत तयार करणे. 
  4. शक्य त्या ठिकाणी गनिमी काव्याने लढा चालवणे. 
  5. उठावासाठी योग्य संधी शोधणे.
  • जुलै १९०६ रोजी सावरकरांनी शामजी कृष्ण वर्मा यांची शिवाजी शिष्यवृत्ती मिळवली आणि ते इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी मॅझिनीच्या चरित्राचे भाषांतर केले. 
  • ‘इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स १८५७’ हा ग्रंथ लिहिला.
  • ‘इंडिया हाऊस’ मध्ये गुप्तपणे बॉम्ब बनवण्याचे कामही चलू केले होते आणि काही पिस्तुले विकत घेऊन भारतात गुप्तपणे पाठवणे सुरू केले.
  • इ. स. १९१० ला जानेवारीमध्ये ते पॅरिसला गेले. ब्रिटिश सरकारने त्यांना ‘फरारी’ घोषित केले.
  • पॅरिसमधून ते लंडनला आले त्यावेळी त्यांना व्हिक्टोरिया स्टेशनवर पकडण्यात आले.
  • भारतात आणण्यासाठी मोरिया बोटीवर त्यांना पाठवण्यात आले.
  • स्वा. वि. दा. सावरकरांनी शौचाला जाण्याच्या निमित्ताने शौचालयातील पोर्ट होलमधून उडी घेतली. परंतु फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले आणि इंग्रज अधिकान्यांच्या ताब्यात दिले.
  • सावरकरांना नाशिक येथे आणण्यात आले. तेथेच त्यांच्यावर खटला चालवण्यात आला.
  • सावरकरांना पंचवीस वर्षे जन्मठेप व काळया पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. 
  • जॅक्सनच्या खूनाला साह्य केल्याप्रकरणी ३० जानेवारी १९११ रोजी सावरकरांना दुसऱ्यांदा पंचवीस वर्षांची जन्मठेप ठोठावली.

बाबाराव सावरकर व अभिनव भारत

  • बाबाराव सावरकर ‘अभिनव भारत’ चे काम पाहात होते.
  • पोलिस उपनिरीक्षक महंमद हुसैनशी बाबारावांचा संघर्ष झाला. त्यामध्ये त्यांना एक महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली.
  • या शाखेतील सदस्यांना दांडपट्टा शिकवण्यासाठी इब्राहिम भाई या लप्करी सेवानिवृत्त व्यक्तीची निवड करण्यात आली.
  • त्यांनी कलकत्त्याच्या त्र्यंबक चक्रवर्ती या व्यापाऱ्याकडून बंदुका, रायफली, दारुगोळा इ. साहित्य मिळवले.
  • कोठूरे येथील बूर्वेचा वाडा हा अभिनव भारतचे शस्त्रागार होते.
  • दुर्दैवाने अभिनव भारतमधील एका फितुर क्रांतिकारकामुळे बाबाराव सावरकरांना अटक झाली. 
  • बाबारावांना (१९०९) काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.

अनंत कान्हेरे 

  • सत्र न्यायालयाने बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याची बातमी कळताच अनंत कान्हेरे हे अत्यंत संतप्त बनले.
  • २१ डिसेंबर १९०९ ला किर्लोस्कर नाटक मंडळींने खास जॅक्सन या अधिकान्यासाठी देवल नाट्य कंपनी मार्फत शारदा  नाटकाचा कार्यक्रम विजयानंद थिएटर नाशिक येथे आयोजित केला होता.
  • जॅक्सन साहेब आलेले असताना अनंत कान्हेरेने त्याच्या छातीत गोळ्या झाडून त्याचा खुन केला.
  • त्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
  • गणू वैद्य या क्रांतिकारकास पकडण्यात आले. त्याने क्रांतिकारकांच्या संदर्भातील माहिती पोलिसांना दिली.
  • अभिनव भारतच्या पेण शाखेवर व कोठूरच्या बर्वे वाड्यावर धाड पडली.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series

टॉपिक  संदर्भ  वेब लिंक अँप लिंक
वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव 11 वी इतिहास (जुने) लिंक लिंक
भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग 10 वी भूगोल लिंक लिंक
राजकीय पक्ष 10 वी इतिहास व राज्यशास्त्र लिंक लिंक

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ | Revolutionary movement in Maharashtra : महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series_7.1

FAQs

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज ही कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे ?

महाराष्ट्रातील सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज उपयुक्त आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज मध्ये कोणते विषय कवर होतील ?

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज मध्ये परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारे इतिहास,भूगोल,पर्यावरण,अर्थशास्त्र,सामान्य विज्ञान तसेच पंचायत राज व राज्यशास्त्र हे सर्वच विषय दररोज कवर होणार आहेत.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज चा परीक्षांसाठी काय फायदा आहे ?

पाठ्यपुस्तके स्पर्धापरीक्षा अभ्यास प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण आणि महत्वाची भूमिका बजावत असतात. जर विद्यार्थ्याला आपल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर आपल्याला शाळेनंतर स्वत: चा अभ्यास देखील सुरू करावा लागेल. त्याचसाठी आम्ही ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज घेऊन आलो आहोत.