Marathi govt jobs   »   Study Materials   »   कोकणातील नदीप्रणाली

कोकणातील नदीप्रणाली | River system in Konkan : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

कोकणातील नदीप्रणाली

Title  लिंक लिंक 
आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन अँप लिंक वेब लिंक

River System in Konkan Region of Maharashtra | कोकण नदीप्रणाली

River System in Konkan Region of Maharashtra: महाराष्ट्राच्या पश्चिमेला असलेल्या कोकण किनारा आणि सह्याद्री पर्वत यांदरम्यान वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचा समवेश कोकण नदीप्रणालीत होतो. कोकणातील नद्यांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे

  • अरुंद कोकण किनारपट्टी आणि पश्चिमेकडे तीव्र उतार असलेला सह्याद्री यामुळे कोकणातील नद्यांची लांबी खूप कमी आहे. (साधारण – 49 किमी ते 155 किमी)
  • त्या अतिशय वेगाने वाहत येत असल्याने खूप कमी गाळ वाहून आणतात
  • बहुतेक सर्व नद्या अरबी समुद्राला मिळतात.
  • यांच्या मुखाजवळ खाड्या निर्माण झाल्या आहेत

Important Rivers in Kokan Region of Maharashtra

कोकणातील महत्त्वाच्या नद्या खालीलप्रमाणे आहेत:

  1. वैतरणा नदी
  • उगम: – त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी डोंगराच्या पश्चिमेला
  • लांबी: – 154 किमी
  • कोकणातील सर्वात मोठी नदी (लांब नदी)
  • वाडा, शहापूर आणि पालघर या तालुक्यातून वाहते
  • उपनद्या: – डाव्या तीराने – तानसा, दहरेजा

उजव्या तीराने – सूर्या, पिंजाळ

  1. उल्हास नदी
  • उगम: – रायगड जिल्ह्यातील राजमाची तेकड्याच्या उत्तर भागात
  • लांबी: – 122 किमी (लांबीनुसार दुसरा क्रमांक)
  • रायगड, ठाणे पालघर अशी वाहते
  • उपनद्या: – उजव्या तीराने – मुरबाडी, काळू, भातसा

डाव्या तीराने – बारवी, भिवपुरी

  1. पाताळगंगा नदी
  • उगम: – गडबाद डोंगर, बोर घाट
  • लांबी: – 45 किमी
  • रायगड जिल्ह्यातून धरमतर च्या खाडीमार्गे अरबी समुद्राला मिळते
  • उपनदी: – डाव्या तीराने – भोगवती
  1. अंबा नदी
  • उगम: – राजमाची डोंगर, जांभूळपाडा
  • लांबी: – 74 किमी
  • रायगड जिल्ह्यातील सुधागड व पाली तालुक्यातून वाहते
  • धरमतर च्या खाडी मार्गे अरबी समुद्राला मिळते
  1. कुंडलिका नदी
  • उगम: – सुधागड, हिरडेवाडी
  • लांबी: – 65 किमी
  • सुधागड व रोहा तालुक्यातून वाहते
  • रोह्याच्या खाडी मार्गे अरबी समुद्राला मिळते
  1. सावित्री नदी
  • उगम: – महाबळेश्वर
  • लांबी: – 38 किमी
  • उपनद्या: – उजव्या तीराने – काळ, गंधार, घोड
  • रत्नागिरी व रायगड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते
  • बाणकोटच्या खाडीजवळ अरबी समुद्राला मिळते
  1. वशिष्ठी नदी
  • उगम: – सह्याद्री पर्वतरांग, रत्नागिरी जिल्हा
  • लांबी: – 68 किमी
  • उपनद्या: – डाव्या तीराने – गडगडी

उजव्या तीराने – जगबुडी

  • दाभोळ च्या खाडीमार्गे अरबी समुद्राला मिळते.

Rivers System in Konkan and their sources | कोकणातील नद्या व त्यांची उगमस्थाने

Rivers in Konkan and their sources: खालील तक्त्यात कोकणातील नद्या (River System in Konkan Region of Maharashtra) व त्यांची उगमस्थाने दिली आहे.

अनु.क्र.

नदीचे नाव उगमस्थान
01 सूर्या

बापगाव

02

दमणगंगा पेठ
03 तानसा

मेंगलपाडा

04

काळू माळशेज घाट
05 उल्हास

लोणावळा

06

अंबा जांभूळपाडा
07 काळ

लिंगणा किल्ला

08

सावित्री महाबळेश्वर
09 शस्त्री

कुंभार्ली घाट

10

काजळी विशालगड
11 वाघोठाण

खारेपाटण

12

गड कणकवली
13 आचरा

कणकवली

14

पिंजाळ नाशेर
15 वैतरणा

ब्रह्मगिरी पर्वत

16

भातसा कसारा
17 मुरबाडी

किमलीवली

18

पाताळगंगा खंडाळा
19 कुंडलिका

हिरडेवाडी

20

गांधार लिंगाणा किल्ला
21 गायत्री

महाबळेश्वर

22

बाव अंबाघाट
23 मुचकुंदी

विशालगड

24

देवगड शिरोळा

25

कर्ली देवगड
26 तेरेखोल

गुंटेवाडी

Important Confluence of Rivers in Konkan | कोकणातील नद्यांची महत्त्वाची संगमस्थळे

Important Confluence of Rivers in Konkan: खालील तक्त्यात कोकणातील नद्यांची (River System in Konkan Region of Maharashtra) महत्त्वाची संगमस्थळे दिली आहे.

अनु.क्र.

नद्या संगमस्थळ
01 सूर्या – पिंजाळ

वाडा

02

सूर्या -वैतरणा मासवण
03 उल्हास – काळू

टिटवाळा

04

गांधार – सावित्री महाड
05 शास्त्री – सोनवी

संगमेश्वर

Dams on Konkan River System | कोकणातील नद्यांवरील धरणे

Dams on Konkan River System: खालील तक्त्यात कोकणातील नद्यांवरील धरणे (River System in Konkan Region of Maharashtra) दिली आहे.

क्र.

धरणाचे नाव नदी (जिल्हा)
01 धामणी (सूर्या)

सूर्या (पालघर)

02

वैतरणा मोडकसागर (ठाणे)
03 भातसा

भातसई (ठाणे)

04

तानसा तानसा (ठाणे)
05 मोर्बे

धावारी (रायगड)

06

डोलावहल कुंडलिका (रायगड)
07 बारवी

बारवी (ठाणे)

River System in Konkan Region of Maharashtra: Creeks, Rivers and Districts in Konkan | कोकणातील खाड्या, नद्या आणि जिल्हे 

Creeks, Rivers and Districts in Konkan: खालील तक्त्यात कोकणातील खाड्या, नद्या आणि जिल्हे (River System in Konkan Region of Maharashtra) दिली आहे.

क्र.

खाडीचे नाव नदीचे नाव जिल्हा
01 दातीवरा वैतरणा

पालघर

02

वसई उल्हास पालघर
03 ठाणे उल्हास

ठाणे

04

मणोरी दहिसर मुंबई
05 मालाड ओशिवरा

मुंबई

06

माहीम मिठी मुंबई
07 धरमतर पाताळगंगा व अंबा

रायगड

08

रोहा कुंडलिका रायगड
09 राजापुरी काळ

रायगड

10

बाणकोट सावित्री रायगड व रत्नागिरी ची सीमा
11 केळशी भारजा

रत्नागिरी

12

दाभोळ वशिष्ठी रत्नागिरी
13 जयगड शास्त्री

रत्नागिरी

14

भाट्ये काजळी रत्नागिरी
15 पूर्णगड मुचकुंदी

रत्नागिरी

16

जैतापूर काजवी रत्नागिरी
17 विजयदुर्ग शुक

रत्नागिरी व सिंधुदुर्ग ची सीमा

18

देवगड देवगड सिंधुदुर्ग

19

आचरा

आचरा

सिंधुदुर्ग

20

कलावली गड सिंधुदुर्ग
21 कर्ली कर्ली

सिंधुदुर्ग

22

तेरेखोल तेरेखोल

सिंधुदुर्ग

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

कोकणातील नदीप्रणाली | River system in Konkan : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन_4.1

FAQs

What is the source of river Damanganga?

Damanganga River originates from Peth.

Malad river flows through which district?

Malad river flows through Mumbai district