Table of Contents
महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ?
सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील ही अत्यंत मुद्देसूद सिरीज आहे. पाठ्यपुस्तक अभ्यास प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण आणि महत्वाची भूमिका बजावत असतात.जर विद्यार्थ्याला आपल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करायची असेल, तर आपल्याला शाळेनंतर स्वत: चा अभ्यास देखील सुरू करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांना महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यास करण्यासाठी ADDA 247 खास तुमच्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज घेऊन आलो आहे. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी ADDA247 च्या माध्यमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे. या सिरीज मधून संपूर्ण परीक्षाभिमुख अभ्यास साहित्य प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज उपयुक्त तसेच यशदायक ठरेल व याने तुमचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास नक्कीच बळ मिळेल. चला तर मग आजचा टॉपिक अभ्यासूया.
भारतातील नद्या
भारत जलप्रणाली : उगमक्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे हिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरील नद्या असे वर्गीकरण केले जाते.
भारतातील नद्या | महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज PDF डाउनलोड करा
हिमालयातील नद्या
- हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या विविध हिमनद्यांतून उगम पावतात, त्यामुळे उन्हाळ्यातही त्यांमधून मोठा विसर्ग होतो.
- पावसाळ्यात त्यांना पूर येतो.
- या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत.
- या गटात सिंधू व तिच्या उपनद्या आणि गंगा व तिच्या उपनद्या अशा दोन समूहांचा समावेश केला जातो.
- सिंधू व तिच्या उपनद्या (झेलम, चिनाब, रावी व बियास) पश्चिम हिमालयात म्हणजेच जम्मू आणि काश्मीर व लडाखमधून वाहतात. त्या एकमेकींना बऱ्याचशा समांतर आहेत.
- सिंधूची एक प्रमुख उपनदी सतलज ही मान सरोवराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेने वाहते.
- सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचे मैदान तयार झाले आहे.
- सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते व अरबी समुद्रास मिळते.
- गंगा नदी हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते.
- हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्ववाहिनी बनते.
- यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची एक प्रमुख उपनदी आहे.
- गंगेची एक मोठी उपनदी बृहद् हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते व हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. हिमालयातून वाहते तेव्हा ती त्सांग पो नावाने ओळखली जाते. हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहास दिहांग असे नाव आहे.
- पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रम्हपुत्रा असे संबोधतात.
- ब्रम्हपुत्रा नदी बांग्लादेशात गंगेस मिळते.
- तेथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे.
- द्वीपकल्पीय नद्यांपैकी सुद्धा काही नद्या गंगेच्या खोऱ्यात येऊन मिळतात. त्यांपैकी महत्त्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा आणि शोण या आहेत.
द्वीपकल्पीय नद्या
- द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिमवाहिनी व पूर्ववाहिनी असे केले जाते.
- द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे.
- द्वीपकल्पीय नद्यांतील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो.
- या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत.
- पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांदरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी असते, पण प्रवेग जास्त असतो.
- केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र व दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच आहेत.
- उत्तर गुजरातमधील खंभातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या.
- यात तापी, नर्मदा, मही व साबरमती या नद्यांचा समावेश होतो.
- तापी व नर्मदा या खचदरीतून वाहतात.
- मही नदी ईशान्य-नैऋत्य दिशेने वाहते, तर अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती उत्तर-दक्षिण दिशेने वाहते.
- याशिवाय अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी होय. ही नदी अरबी समुद्रास कच्छच्या आखातात मिळते.
बंगालच्या उपसागरास मिळणान्या नद्या
- द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे.
- यात गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो.
- गोदावरी, कृष्णा व कावेरी या तीनही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो.
- गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे.
- कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेस आहे.
- भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.
- कावेरी नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांतून वाहते.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series
टॉपिक | संदर्भ | अँप लिंक | वेब लिंक |
वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव | 11 वी इतिहास (जुने) | लिंक | लिंक |
भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग | 10 वी भूगोल | लिंक | लिंक |
राजकीय पक्ष | 10 वी इतिहास व राज्यशास्त्र | लिंक | लिंक |
महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ | 11 वी इतिहास (जुने) | लिंक | लिंक |
वनस्पतींचे वर्गीकरण | 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान | लिंक | लिंक |