Marathi govt jobs   »   सहकार आयुक्तालय भरती 2023   »   सहकार भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023

सहकार भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 जाहीर, अधिकृत सूचना तपासा

सहकार भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 जाहीर

सहकार भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023: सहकार आयुक्तालय विभागाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर सहकार भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 जाहीर केले आहे. सहकार भरती निकाल 2023 निवड यादी दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी जाहीर केला आहे. आज या लेखात आपण सहकार भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

सहकार भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023: विहंगावलोकन

सहकार भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाले असून सहकार भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

सहकार भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव सहकार आयुक्तालय भरती 2023
लेखाचे नाव सहकार भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023
पदांची नावे
  • सहकारी अधिकारी श्रेणी 1
  • सहकारी अधिकारी श्रेणी 2
  • लेखापरीक्षक श्रेणी 2
  • सहायक सहकार अधिकारी / वरिष्ठ लिपिक
  • उच्च श्रेणी लघुलेखक
  • निम्न श्रेणी लघुलेखक
  • लघुटंकलेखक
एकूण रिक्त पदे

309

सहकार आयुक्तालय परीक्षेची तारीख 2023 14 आणि 16 ऑगस्ट 2023
सहकार आयुक्तालय निकाल 2023  11 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.sahakarayukta.maharashtra.gov.in

सहकार भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 PDF

दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी सहकार आयुक्तालय विभागाने सहकार भरती 2023 मधील पात्र उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीचे आयोजन केले आहे. दिनांक 26 ते 29 डिसेंबर 2023 या कालावधीत कागदपत्र पडताळणी होणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सहकार भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 PDF डाउनलोड करू शकतात.

सहकार भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 PDF

कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचा पत्ता

पात्र उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, इमारत, 5 बी. जे. रोड, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक लि. पुणे मुख्यालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411001 येथे उपस्थित रहावे.

कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना 

  • संबधीत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांचे मार्फत, त्यांचे विभागामध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित रहाणेबाबत नोंदणीकृत डाक / ई-मेलद्वारे देखील कळविण्यात येईल.
  • सदरची निवडसूची केवळ तात्पुरती निवडसूची असून, कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची विहीत पदाकरिता निवड झाली आहे असे समजण्यात येऊ नये. तात्पुरत्या निवडसूचीतील उमेदवारांच्या कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणी अंती उमेदवारांची अंतिम निवडसूची प्रसिध्द केली जाईल.
  • तात्पुरत्या निवडसूचीतील उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीनंतर उमेदवार सदर पदावरील निवडीसाठी अपात्र ठरल्यास गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारास कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविण्यात येईल.
  • सामान्य प्रशासन विभागाचे दि.29/05/2019 रोजीचे शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींसाठी ठेवण्यात आलेले आरक्षण हे समांतर आरक्षण आहे. समांतर आरक्षण हे सामाजिक व खुला या दोन्ही भागात विभक्त होणारे आरक्षण आहे. परंतु दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदे खुला किंवा सामाजिक आरक्षण प्रवर्गात दर्शविण्यात येत नाहीत. दिव्यांगासाठी राखीव पदे वेगळी दर्शविण्यातयेतात.
  • दिव्यांगासाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश तो ज्या प्रवर्गाचा आहे त्या प्रवर्गातून करण्यात येतो. त्यानुसार निवड झालेला दिव्यांग उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गातील आहे. त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण या समांतर आरक्षणातील एक पद कमी करून ते दिव्यांग या समांतर आरक्षणातून भरण्यात येत आहे. 
  • तात्पुरत्या निवडसूचीतील उमेदवारांच्या कागदपत्रे/प्रमाणपत्रे तपासणी पूर्ण झालेनंतर अंतिम निवडसूची प्रसिध्द करणेत येईल.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Mahapack
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

सहकार भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 कधी जाहीर झाले?

सहकार भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 12 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाले.

सहकार भरती कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे?

सहकार भरती कागदपत्र पडताळणी 26 ते 29 डिसेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.

सहकार भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

सहकार भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 बद्दल सविस्तर माहिती या एल्खात दिली आहे.