Table of Contents
समूहदर्शक शब्द
समूहदर्शक शब्द: अन्न व नागरी पुरवठा विभाग भरती 2023 साठी मराठी विषयाचे अभ्यास साहित्य. अन्न व नागरी पुरवठा विभाग भरती 2023 मध्ये पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक पदांच्या परीक्षेत मराठी विषयास अनन्य साधारण महत्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे थोड्याशा सरावाने या विषयांमध्ये जास्त गुण मिळवता येतात. आज आपण या लेखात समूहदर्शक शब्दबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहे.
समूहदर्शक शब्द: विहंगावलोकन
समूहदर्शक शब्द: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त |
विषय | मराठी व्याकरण |
लेखाचे नाव | समूहदर्शक शब्द |
समूहदर्शक शब्द
समूहदर्शक शब्द म्हणजे असे शब्द ज्या द्वारे एखाद्या विशिष्ट पदार्थांचा, प्राण्यांचा किंवा घटकांच्या समूहाबद्दल माहिती समजते. जो शब्द ऐकल्यावर विशिष्ट पदार्थांचा, प्राण्यांचा किंवा घटकांचा समूह डोळ्यासमोर येतो.
पालेभाजीची- गड्डी/जुडी
पुस्तकांचा, वह्यांचा- गठ्ठा केसांची- बट, जट पोत्यांची, नोटांची – थप्पी केळयांचा- लोगर/घड पिकत घातलेल्या आंब्यांची- अढी करवंदांची- जाळी फळांचा- घोस काजूंची, माशांची- गाथण फुलझाडांचा- ताटवा किल्ल्यांचा- जुडगा फुलांचा- गुच्छ खेळाडूंचा- संघ बांबूचे- बेट मेंढ्यांचा- कळप नारळांचा- ढीग विमानांचा- ताफा सैनिकांचे / ची- पथक/तुकडी/पलटण |
आंब्यांच्या झाडांची -राई
पक्ष्यांचा-थवा प्रश्नपत्रिकांचा-संच उपकरणांचा-संच उत्तारूंची- झुंबड पाठ्यपुस्तकांचा- संच उंटांचा, लमाणांचा – तांडा प्रवाशांची- झुंबड केसांचा- झुबका, पुंजका गाईगुरांचे- खिल्लार भाकऱ्यांची, रुपयांची- चवड गुरांचा- कळप मडक्यांची -उतरंड गवताचा -भारा महिलांचे- मंडळ वेलींचा- कुंज हत्तीचा- कळप साधूचा- जथा हरिणांचा- कळप |
गवताची- गंजी, पेंढी
यात्रेकरूंची- जत्रा चोरांची/दरोडेखोरांची- टोळी लाकडांची, उसांची- मोळी जहाजांचा- काफिला वस्तूंचा-संच ताऱ्यांचा- पंजका वाद्यांचा- वृंद तारकांचा- पुंज विटांचा, कलिंगडांचा- ढीग द्राक्षांचा- घड, घोस विद्यार्थ्यांचा- गट दुर्वांची- जुडी माणसांचा- जमाव धान्याची- रास मुलांचा- घोळका नोटांचे- पुडके मुंग्यांची- रांग नाण्यांची- चळत |
समूहदर्शक शब्द: नमुना प्रश्न
प्रश्न 1. केळ्यांचा-
(a) लोंगर
(b) रास
(c) ढीग
(d) यापैकी नाही
उत्तर- (a)
प्रश्न 2. चळत असते _____
(a) केसांची
(b) पोत्यांची
(c) नाण्यांची
(d) सुपारीची
उत्तर- (c)
प्रश्न 3. मुलांचा घोळका तसेच विमानांचा
(a) ताफा
(b) सच
(c) कळप
(d) वृंद
उत्तर- (a)
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.