Table of Contents
संधी व संधीचे प्रकार : आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य
संधी व संधीचे प्रकार : मराठी व्याकरणातील संधी व संधीचे प्रकार हा विषय आदिवासी विकास विभाग भरती 2023 तसेच महाराष्ट्रातील अन्य भरती परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहे.या लेखात आपण संधी व संधीचे प्रकार याची माहिती पाहणार आहोत. यावर परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात.
संधी व संधीचे प्रकार: विहंगावलोकन
संधी व संधीचे प्रकार : विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
विषय | संधी व संधीचे प्रकार |
उपयोगिता | आदिवासी विकास विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी |
लेखाचे नाव | संधी व संधीचे प्रकार |
लेख तुम्हाला काय प्रदान करतो? | संधी व संधीचे प्रकार याची माहिती |
संधी या शब्दाचा अर्थ ‘संयोजन’ किंवा एकीकरण असा होतो. दोन लगतच्या अक्षरांच्या परस्पर संयोगामुळे जो विकार होतो त्याला संधी म्हणतात.
संधीचे मराठीमध्ये तीन प्रकार पडतात-
- स्वर संधी
- व्यंजन संधी
- विसर्ग संधी
स्वरसंधी
एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील, तर त्यांना ‘स्वरसंधी’ असे म्हणतात.
दीर्घत्व संधी
सजातीय ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर मिळून एकच दीर्घ स्वर तयार होतो त्याला दीर्घत्व संधी म्हणतात.
सूर्यास्त = सूर्य+अस्त
हरीश = हरि+ईश
गुरुपदेश = गुरु+उपदेश
आदेश संधी
दोन विजातीय स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या संधीला आदेश संधी म्हणतात.
आदेश संधीचे प्रकार –
- गुणादेश – अ किंवा आ या स्वरापुढे जर इ किंवा ई स्वर आल्यास तर त्या दोहोंऐवजी ए हा स्वर येतो, जर उ किंवा ऊ हा स्वर आल्यास तर त्या दोहोंऐवजी ओ स्वर येतो आणि जर ऋ हा स्वर आल्यास तर त्या दोहोस्वरांमिळून अर येतो यालाच गुणादेश संधी असे म्हणतात.
उदा- ईश्वरेच्छा = ईश्वर+इच्छा
महोत्सव = महा+उत्सव
- वृद्ध्यादेश – जर अ आणि आ या स्वरापुढे ए किंवा ऐ स्वर आल्यास तर त्याबद्दल ऐ हा स्वर येतो आणि ओ किंवा औ स्वर आल्यास तर त्याबद्दल औ हा स्वर येतो. यालाच वृद्ध्यादेश संधी म्हणतात.
उदा- एकैक = एक+एक
सदैव = सदा+एव
- यणादेश – जर इ, उ, ऋ, (ऱ्हस्व किंवा दीर्घ) या स्वरांपुढे खालीलपैकी कोणताही विजातीय स्वर आल्यास तर इ-ई या विजातीय स्वराऐवजी य हा वर्ण येतो, उ-ऊ विजातीय स्वराऐवजी व हा वर्ण येतो. ऋ या स्वराऐवजी र हा वर्ण येतो आणि पुढील स्वर मिसळून यणादेश संधी तयार होते.
उदा- प्रीत्यर्थ = प्रीति+अर्थ
इत्यादी = इति+आदी
- विशेष आदेश – जर ए, ऐ, ओ किंवा औ या संयुक्त स्वरांपुढे अनुक्रमे ए या संयुक्त स्वराऐवजी आय्, ऐ या संयुक्त स्वराऐवजी आय्, ओ या संयुक्त स्वराऐवजी अव्, औ या संयुक्त स्वराऐवजी आव् असे वर्ण मिसळून आदेश तयार होऊन त्यास पुढील स्वर मिसळून विशेष आदेश संधी तयार होते.
उदा-
नयन = ने+अन
गायन = गै+अन
पूर्वरूप संधी
संधी होत असतांना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसऱ्या स्वराचा लोप होतो,त्याला पूर्वरूप संधी असे म्हणतात.
उदा-
नदीत = नदी+आत
काहीसा = काही+असा
पररूप संधी
एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो. त्याला पररूप संधी असे म्हणतात.
उदा-
करून = कर+ऊन
घामोळे = घाम+ओळे
व्यंजनसंधी
दोन व्यंजने किंवा यापैकी दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला मिळून तयार होणाऱ्या संधीला व्यंजनसंधी म्हणतात.
व्यंजनसंधीचे उपप्रकार –
प्रथम व्यंजन संधी
दोन शब्दाची संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ग, ज, ड, द, ब (मृदु व्यंजन) यांच्यापैकी आल्यास तर संधी होत असतांना त्याचे जागी त्याच वर्गातील पहिले व्यंजन (क, च, ट, त, प) येऊन संधी होते, त्याला प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात.
उदा-
शरत्काल = शरद्+काल
आपत्काल = आपद्+काल
तृतीय व्यंजन संधी
दोन शब्दाची संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क, च, ट, त, प यापैकी कोणताही वर्ण आल्यास त्यापासून संधी होत असतांना त्या वर्णाचे जागी त्याच वर्गातील तृतीय व्यंजन येते या संधीला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात.
उदा-
वागीश = वाक्+ईश
सदिच्छा = सत्+इच्छा
अनुनासिक संधी
पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास, त्याच वर्गातील अनुनासिकाशी व्यंजन संधी होतो त्यास अनुनासिक व्यंजन संधी असे म्हणतात.
उदा-
संमती = सत्+मती
सन्मार्ग = सत्+मार्ग
त ची विशेष व्यंजन संधी
जर त या व्यंजनापुढे –
च किंवा छ आल्यास, त बद्दल च येतो.
ट किंवा ठ आल्यास, ट बद्दल ट येतो.
ज किंवा झ आल्यास, त बद्दल ज येतो.
ल् आल्यास, त बद्दल ल् येतो.
श आल्यास, त बद्दल च होतो व पुढील श बद्दल छ येतो.
उदा-
सच्चरित्र = सत्+चरित्र
उच्छेद = उत्+छेद
म ची संधी
म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो.
व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो.
उदा-
समाचार = सम्+आचार
संगती = सम्+गती
विसर्गसंधी
विसर्ग संधीचे प्रकार –
विसर्ग उकार संधी
विसर्गाच्या पुढे पाच गटापैकी कोणतेही मृदु व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. याला विसर्ग उकार संधी असे म्हणतात.
उदा-
यशोधन = यशः+धन
मनोरथ = मन:+रथ
विसर्ग-र-संधी
विसर्गाच्या मागे अ किंवा आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदु वर्ण आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होणे.
उदा-
निरंतर = निः+अंतर
दुर्जन = दुः+जन
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.