Marathi govt jobs   »   Job Notification   »   SBI PO अधिसूचना 2022
Top Performing

SBI PO भरती 2022 जाहीर, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

SBI PO अधिसूचना 2022: स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट i.e.@sbi.co.in वर 21 सप्टेंबर 2022 रोजी प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या भरतीसंदर्भात SBI PO 2022 अधिसूचना जारी केली होती. SBI PO भरती साठी अर्ज करण्याचा आज म्हणजेच 12 ऑक्टोबर 2022 हा शेवटचा दिवस आहे.

दरवर्षी स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया करते. आर्थिक वर्ष 2022-23 ची अधिसूचना अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जारी करण्यात आली आहे. निवड प्रक्रिया तीन टप्प्यात घेतली जाईल, जसे की प्रेलीम्स (पूर्व), मेन्स (मुख्य) आणि मुलाखत. SBI शाखांमध्ये PO म्हणून निवड होण्यासाठी उमेदवारांना तीनही टप्प्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे. SBI PO अधिसूचना 2022 संबंधी इतर सर्व तपशील या लेखेत सविस्तरपणे देण्यात आले आहे.

SBI PO अधिसूचना 2022: महत्वाच्या तारखा

SBI PO अधिसूचना 2022, महत्वाच्या तारखा: खालील तक्त्यात SBI PO 2022 संदर्भात महत्वाच्या तारखा दिलेल्या आहे. ज्या खूप महत्वाच्या आहेत.

SBI PO 2022 Exam Schedule
SBI PO Activity Dates
SBI PO Notification 2022 21st September 2022
Online Registration Starts From 22nd September 2022
Last date for SBI PO Apply Online 12th October 2022
Last Date to Pay Fee 12th October 2022
SBI PO Admit Card 2022 (Preliminary) 1st /2nd week of December 2022
SBI PO Exam Date- Preliminary 17th/18th/19th/20th of December 2022
SBI PO Result- Preliminary December 2022 / January 2023
SBI PO Mains Admit Card 2022 January 2023 / February 2023
SBI PO Exam Date – Mains January 2023 / February 2023
SBI PO Mains Result 2022 February 2023
Conduct of Group Exercises & Interview February / March 2023
Declaration of Final Result March 2023

SBI PO अधिसूचना 2022 PDF

SBI PO अधिसूचना 2022 PDF: SBI PO 2022 ची अधिसूचना 21 ऑक्टोबर 2022 रोजी sbi.co.in वर जारी करण्यात आली. भारतातील SBI च्या विविध कार्यालयांमध्ये 2056 प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) ची भरती होईल. एसबीआय पीओ 2022 परीक्षेच्या तारखा, ऑनलाईन अर्ज आणि इतर तपशील त्याच्या अधिकृत अधिसूचनेसह जारी करण्यात आले आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये PO पदासाठी उमेदवारांच्या निवडीसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. SBI PO 2022 परीक्षेसाठी अधिकृत अधिसूचना PDF खाली नमूद केली आहे.

SBI PO अधिसूचना 2022 Download करण्यासाठी येथे क्लिक करा

SBI PO 2022 निवड प्रक्रिया

SBI PO 2022 निवड प्रक्रिया: SBI PO ही अत्यंत प्रतिष्टीत बँकिग विभागातील परीक्षा आहे. त्यासाठी भारतातून विद्यार्थी पेपर देतात. तेव्हा आपल्याला SBI PO 2022 च्या निवड प्रक्रियेतील टप्पे माहिती असंणे आवश्यक आहे. SBI PO 2022 च्या निवड प्रक्रियेतील टप्पे खालीलप्रमाणे आहेत.

  • पूर्व परीक्षा (Prelims)
  • मुख्य परीक्षा (Mains)
  • मुलाखत (Interview)

SBI PO रिक्त जागा 2022

SBI PO रिक्त जागा 2022: SBI PO 2022 साठी रिक्त जागा एसबीआय पीओ अधिसूचना 2022 मध्ये जारी करण्यात आली आहे. यावर्षी SBI PO अधिसूचना 2022 मध्ये एकूण 1673 रिक्त पदे जारी करण्यात आली आहेत, वर्ष 2022 च्या श्रेणीवार रिक्त पदांवर एक नजर टाका.

SBI PO Vacancy 2022
Category Vacancy Backlog Total
SC 240 30 270
ST 120 11 132
OBC 432 32 464
EWS 160 160
GEN 648 648
Total 1600 73 1673

SBI PO पात्रता निकष

SBI PO पात्रता निकष: SBI PO 2022 साठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराने पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत ज्यात SBI PO अधिसूचना 2022 नुसार खालील गोष्टींची पूर्तता समाविष्ट आहे:

  • राष्ट्रीयत्व
  • वयोमर्यादा
  • शैक्षणिक पात्रता

वयोमर्यादा (1 एप्रिल 2022 रोजी)

एसबीआय पीओ 2022 परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा 21 वर्षे आहे परंतु नोंदणीच्या वेळी 30 वर्षांपेक्षा जास्त नाही. याशिवाय, एसबीआय पीओ 2022 साठी सरकारी निकषांनुसार श्रेणीनिहाय उमेदवारांसाठी वयोमर्यादामध्ये शिथिलता देण्यात आली आहे.

Category वयात सूट
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) 5 वर्षे
इतर मागास वर्ग (ओबीसी नॉन-क्रीमी लेयर) 3 वर्ष
अपंग व्यक्ती (PWD) 10 वर्षे
माजी सैनिक 5 वर्षे
1-1-1980 ते 31-12-1989 दरम्यान जम्मू आणि काश्मीरचे अधिवास असलेले व्यक्ती 5 वर्षे

राष्ट्रीयत्व

  1. उमेदवार भारतीय नागरिक असावा.
  2. 1 जानेवारी 1962 पूर्वी कायमस्वरूपी बंदोबस्ताच्या उद्देशाने भारतात आलेला एक तिबेटी शरणार्थी
  3. भारतीय वंशाची व्यक्ती (PIO) ज्याने बर्मा, पाकिस्तान, श्रीलंका, व्हिएतनाम किंवा झैरे, केनिया, टांझानिया, युगांडा, झांबिया, इथिओपिया, मलावी या पूर्व आफ्रिकन देशांमधून स्थलांतर केले आहे

शैक्षणिक पात्रता

  1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
  2. अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल अशेच उमेदवार अर्ज करू शकतात.
MSRTC Recruitment 2022
Adda247 Marathi Application

SBI PO 2022 साठीचे परीक्षा शुल्क

SBI PO 2022 साठीचे परीक्षा शुल्क: SBI PO 2022 साठीचे परीक्षा शुल्काबाद्द्ल माहिती खाली दिलेली आहे.

 नं. श्रेणी अर्ज फी
1 General/ OBC 750
2 SC/ST/PWD शून्य

SBI PO 2022 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

SBI PO 2022 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा: एसबीआय पीओसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या चरणांमध्ये दोन टप्पे असतील: 1. नोंदणी 2. लॉगिन.

ऑनलाईन अर्ज करण्याच्या Steps खाली दिल्या आहेत.

नोंदणी

  1. खाली दिलेल्या अधिकृत link वर क्लिक करा किंवा अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. पेजवर दिलेल्या Apply लिंकवर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन विंडो उघडेल.
  3. अर्ज विंडोमध्ये नवीन नोंदणीवर क्लिक करा.
  4. वैयक्तिक ओळखपत्र जसे की नाव, पालकांचे नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर इ. माहिती प्रदान करा.
  5. SBI PO 2022 च्या पूर्ण झालेल्या ऑनलाइन नोंदणी फॉर्मवर सबमिट बटणावर क्लिक करा.
  6. नोंदणी केल्यानंतर, नोंदणी क्रमांक आणि संकेतशब्द तुमच्या मोबाईल क्र. आणि ईमेल आयडी. वर प्राप्त होईल.

लॉगिन करा

  1. SBI PO 2022 साठी नोंदणी पूर्ण करण्यासाठी प्रदान केलेल्या नोंदणी ID, जन्मतारीख आणि पासवर्डसह लॉगिन करा.
  2. खाली नमूद केलेल्या आवश्यकतेनुसार आपले छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  3. पासपोर्ट आकार फोटो (आकार -20 ते 50 Kb) आणि स्वाक्षरी (10 ते 20 Kb) स्कॅन केलेली प्रतिमा JPEG स्वरूपात अपलोड करा.
    छायाचित्राचा आकार: 200 x 230 पिक्सेल
    स्वाक्षरीचा आकार: 140 x 60 पिक्सेल.
  4. छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर उमेदवारांना तपशीलांची पडताळणी करणे आवश्यक असेल. अर्जाचे पूर्वावलोकन करा आणि काळजीपूर्वक सत्यापित करा.
  5. शेवटी, आवश्यक अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.

SBI PO 2022: ऑनलाइन अर्ज लिंक

SBI PO अधिसूचनेसाठी 22 सप्टेंबर 2022 पासून ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे आणि SBI PO अधिसूचना 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 12 ऑक्टोबर 2022 पर्यंत वेळ आहे. SBI क्लर्क साठी ऑनलाइन अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे.

SBI PO अधिसूचना 2022: ऑनलाइन अर्ज लिंक

SBI PO 2022 परीक्षेचे स्वरूप

SBI PO 2022 परीक्षेचे स्वरूप: SBI PO 2021 परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.

SBI PO 2021 पूर्व परीक्षेचे स्वरूप
क्र. विभाग प्रश्नांची संख्या जास्तीत जास्त गुण प्रत्येक  विभागासाठी दिलेला वेळ
1 English 30 30 20 मिनिटे
2 Quantitative Aptitude 35 35 20 मिनिटे
3 Reasoning Ability 35 35 20 मिनिटे
एकूण 100 100 1 तास

 

SBI PO 2021 मुख्य परीक्षेचे स्वरूप
क्र. विभाग प्रश्नांची संख्या जास्तीत जास्त गुण
प्रत्येक 
परीक्षेसाठी दिलेला वेळ

1 Reasoning & Computer Aptitude 45 60 60 मिनिटे
2 General Economy/ Banking Awareness 40 40 35 मिनिटे
3 English Language 35 40 40 मिनिटे
4 Data Analysis & Interpretation 35 60 45 मिनिटे
एकूण 155 200 3 तास
5. English Language
(Letter Writing & Essay)
02 50 30 मिनिटे

Latest Job Alerts

ISP Nashik Recruitment 2022
IISER Pune Recruitment 2022
MPSC Technical Services Notification 2022 Maharashtra Rojgar Melava 2022
SSC IMD वैज्ञानिक सहाय्यक भरती 2022 CDAC Pune Recruitment 2022
MPSC Recruitment 2022 SAMEER Mumbai Recruitment 2022

FAQs SBI PO अधिसूचना 2022

Q1. SBI PO परीक्षा एका वर्षात किती वेळा घेतली जाते?
Ans एसबीआय पीओ परीक्षा वर्षातून एकदा घेतली जाते.

Q2. SBI PO फोर्म ची फी General व OBC उमेदवारांसाठी काय आहे?
Ans SBI PO फोर्म ची फी General व OBC उमेदवारांसाठी 750 आहे.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

adda247 prime
Maharashtra Exam Prime Test Pack

Sharing is caring!

SBI PO भरती 2022 जाहीर, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस_5.1

FAQs

When is the SBI PO 2022 notification released?

SBI PO 2022 notification has been released on 21st September 2022 on its official website.

How much is the application fee for SBI PO 2022?

The application fee for General/OBC/EWS is Rs. 750/- and SC/ ST/ PWD/XS is exempted from the SBI PO application fee.

What is the Age Limit for the SBI PO 2022?

The age limit for SBI PO 2022 is 21-30 years. There is age relaxation for different categories.